Maharashtra Assembly Election 2024 : पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाच्या मतदारसंघात कौटुंबिक वाद मिटला, भाजपाला मोठा दिलासा

Maharashtra Assembly Election 2024 : अनेक वर्ष भाजपामध्ये राहिल्यानंतर समरजीत घाटगे यांनी नुकताच शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. महायुतीमधून तिकीट मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांनी हे पाऊल उचललं. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातून भाजपासाठी एक दिलासादायक बाब आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाच्या मतदारसंघात कौटुंबिक वाद मिटला, भाजपाला मोठा दिलासा
ashwini laxman jagtap
Follow us
| Updated on: Sep 04, 2024 | 12:39 PM

विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आली आहे. या दरम्यान पुणे जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या मतदारसंघावरुन सुरु असलेला कौटुंबिक वाद मिटला आहे. भाजपासाठी ही दिलासादायक बाब आहे. लोकसभा निवडणुकीला जे घडलं, ते विधानसभेला होऊ नये हाच भाजपाचा प्रयत्न आहे. पुणे जिल्ह्यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघ जगताप कुटुंबाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. चिंचवडमधून सर्वप्रथम लक्ष्मण जगताप यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली. त्यानंतर 2019 पर्यंत लक्ष्मण जगताप यांनाच मतदारांनी निवडून दिलं. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी चिंचवडमधून पोटनिवडणूक जिंकली. आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांचे बंधु शंकर जगताप हे चिंचवडमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. दिवंगत लक्ष्मण जगताप यांची राजकीय उत्तराधिकारी मीच आहे, असं अश्विनी जगताप म्हणाल्या होत्या.

भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप आणि दीर शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यात चिंचवड विधानसभेवरून समझोता झाल्याची माहिती आहे. पोटनिवडणुकीपासून दीर-भावजय यांच्यात सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघ त्याचबरोबर भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये याबद्दल जोरदार चर्चा आहे.

समर्थकांची गोची झाली

अश्विनी जगताप यांनी नुकतंच लक्ष्मण जगताप यांचा राजकीय वारसदार मीच असल्याचे विधान करत चिंचवड विधानसभा लढण्यावर ठाम असल्याच म्हटलं होतं. दुसरीकडे भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी चिंचवड विधानसभा लढवण्यावर ठाम असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या वादावर पडदा पडल्यामुळे अश्विनी जगताप समर्थकांची गोची झाली आहे. जगताप कुटुंबातच चिंचवडच्या उमेदवारीवरुन वाद होता. आता हा वाद संपल्याची माहिती मिळत आहे.

'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.