Maharashtra Breaking News LIVE : बटोंगे तो कटोंगे हा योगींचा नारा चुकीचा नाही-देवेंद्र फडणवीस
Maharashtra Election News LIVE : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. आज 15 नोव्हेंबर 2024 राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
LIVE NEWS & UPDATES
-
अभिनेते आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उद्या नांदेडमध्ये
आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे उद्या 16 नोव्हेंबर रोजी नांदेड दौऱ्यावर आहेत. पवन कल्याण यांची नांदेडच्या देगलूर येथे सभा होत आहे. महायुतीचे उमेदवार जितेश अंतापुरकर आणी लोकसभेचे उमेदवार संतुकराव हंबर्डे यांच्या प्रचारार्थ पवन कल्याण यांची जाहीर सभा होणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता पवन कल्याण यांची देगलूर येथील मिल मैदानात सभा घेतील.
-
मुख्यमंत्री आज नांदेडमध्ये
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज नांदेड जिल्ह्यात दोन सभा होत आहे. भोकर विधानसभेच्या भाजप उमेदवार श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्र्यांची बारड येथे सभा आहे. बारड येथील सभेला महाराष्ट्र पोलिसांसह तेलंगणा पोलिसांचा बंदोबस्त आहे.
-
-
बाळासाहेब थोरातांच्या बालेकिल्ल्यात विखे पाटलांची सभा
राधाकृष्ण विखे पाटील संगमनेर मतदारसंघात सभा घेत आहेत. महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्या प्रचारार्थ संगमनेर तालुक्याचा दौरा करत आहेत. सावरगाव तळ, पेमगिरी आणि वडगाव लांडगा गावात सभांचे आयोजन करण्यात आले आहे. बाळासाहेब थोरात यांच्यावर काय टीका करणार याकडे तालुक्याचं लक्ष लागलं आहे.
-
भाजीपाल्याच्या दुकानातून असदुद्दीन ओवैसीचा लाडकी बहीण योजनेवरती निशाना
छत्रपती संभाजी नगर मध्य मतदारसंघात पदयात्रेदरम्यान असदुद्दीन ओवेसी यांनी भाजीपाल्याच्या दुकानावर जाऊन भाजीपाल्यांचे दर विचारात त्याची बेरीज केली भाजीपाला खरेदीलाच जर आठशे रुपये लागत असतील तर दीड हजार रुपयांच्या लाडकी बहीण योजनेचा काय उपयोग असा सवाल विचारत लाडकी बहीण योजनेवरून अनोख्या पद्धतीने सरकारवर टीका केली आहे. असदुद्दीन ओवेसी यांचा पदयात्रेतील व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
-
राम शिंदे, पाशा पटेल यांचा रोहित पवारांकडून निषेध
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेडचे भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारार्थ जामखेड येथे पाशा पटेल यांच्या उपस्थितीत प्रचार सभा झाली. त्यात जवळपास सर्वच वक्त्यांनी अतिशय खालच्या भाषेचा वापर केला. या सभेचा व्हिडीओ समाज माध्यमावर पोस्ट करत रोहित पवारांनी निषेध व्यक्त केला आहे.
-
-
लोकसभेत वोट फॉर जिहादचा नारा
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने वोट फॉर जिहादचा नारा दिला होता, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. तर बटोंगे तो कटोंगे हा योगी आदित्यनाथ यांचा नारा चुकीचा नाही, असा दावा सुद्धा फडणवीस यांनी केला.
-
एकनाथ शिंदे यांचं काम आता संपलं- संजय राऊत
एकनाथ शिंदे यांचं काम आता संपलं आहे. 20 नोव्हेंबरनंतर त्यांची गरज नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
-
-
Maharashtra News: 2014 मध्ये युती तोडून भाजपची शत प्रतिशतची घोषणा – अरविंद सावंत
2014 मध्ये युती तोडून भाजपची शत प्रतिशतची घोषणा… शत प्रतिशत भाजपा अशी घोषणा दिल्यावरत खरा घात झाला… ठाकरे गटाते खासदार अरविंद सावंत यांची भाजपवर टीका…
-
Maharashtra News: अडीच वर्ष तुम्ही शिवसेनेतल्या एका गद्दाराला मुख्यमंत्री केलं – संजय राऊत
अडीच वर्ष तुम्ही शिवसेनेतल्या एका गद्दाराला मुख्यमंत्री केलं. पण शिवसेनेबरोबर 25 वर्ष युती असताना शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यास नकार दिला. त्याच्यामुळे फडणवीस खोट बोलत आहेत. मी त्या चर्चेच्या प्रक्रियेमध्ये होतो. हे चर्चाच करायला तयार नव्हते. मुख्यमंत्रीपदावर कोणतीच चर्चा होणार नाही, हे वारंवार सांगितलं जात होतं” असं खासदार संजय राऊत म्हणाले.
-
Maharashtra News: उद्धव ठाकरे यांची आज सिल्लोडमध्ये जाहीर सभा
उद्धव ठाकरे यांची आज सिल्लोड मध्ये जाहीर सभा… ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश बनकर यांच्या प्रचारार्थ सिल्लोडमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार… 5 वर्षांपूर्वी अब्दुल सत्तार यांच्या प्रचार सभेसाठी ठाकरे सिल्लोडमध्ये आले होते… सिल्लोड आणि वैजापूरमध्ये ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशा प्रमुख लढती होणार आहेत…
-
Maharashtra Election 2024 : वाहनातून जवळपास 19 कोटी रुपयांचे सोन्या, चांदीचे दागिने जप्त
सिल्लोड येथील निवडणूक तपासणी पथकाने संभाजीनगरहून जळगावकडे जाणाऱ्या वाहनातून जवळपास 19 कोटी रुपयांचे सोन्या, चांदीचे दागिने जप्त केले. ही कारवाई सिल्लोड तालुक्यातील निल्लोड फाट्यावरील चेकपोस्टवर करण्यात आली. सिल्लोड येथील स्थिर पथकाच्या कर्मचाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरकडून जळगावकडे जाणाऱ्या एका वाहनाची तपासणी केली.
-
संगणक टंकलेखन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल
संगणक टंकलेखन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल. 9 डिसेंबरपासून परीक्षा. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या संगणक टंकलेखन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार या परीक्षा येत्या 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत घेण्यात येणार होत्या. मात्र, आता या परीक्षा 9 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत.
-
Maharashtra Election 2024 : कल्याण पूर्व शहर प्रमुखपदावरुन महेश गायकवाड यांना हटवलं
कल्याण पूर्वेत महेश गायकवाड यांच्याजागी कल्याण पूर्व शहर प्रमुखपदी निलेश शिंदे यांची नियुक्ती. पक्षासोबत बंडखोरी करुन अपक्ष उमेदवारी भरल्याने महेश गायकवाड यांच्यावर कारवाई करत पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी जाहीर केल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या.
-
Maharashtra Election 2024 – ‘अडीच वर्षांपासून फडणवीसांना खोट बोलण्याचा रोग’
“फडणवीस खोट बोलतायत. अडीच वर्षांपासून फडणवीसांना खोट बोलण्याचा रोग. मोदींच्या कालच्या सभेत 5 हजार लोकही नव्हते” असं संजय राऊत म्हणाले.
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मनसेचे नेते राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंची अंबाजोगाई मधील रद्द झालेल्या सभेवरून सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे कदाचित झोपेतून उठले नसतील, असा टोला लगावला. उल्हास भोईर यांच्या प्रचारासाठी कल्याण पश्चिम विधानसभेच्या यशवंतराव चव्हाण क्रीडा संकुल मॅक्सी ग्राउंड येथे राज ठाकरेंची जाहीर प्रचार सभा होणार आहे. शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांतून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची शनिवारी (१६ नोव्हेंबर) जाहीर सभा होणार आहे. नाना पेठ येथील डिप्रेस्ड क्लास मिशन संस्थेच्या अहिल्याश्रम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या पटांगणावर सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे.
Published On - Nov 15,2024 8:43 AM