Maharashtra Assembly Monsoon Session Live : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर; सुनावणी कधी होणार यावर प्रश्नचिन्ह

| Updated on: Aug 23, 2022 | 12:14 AM

Maharashtra Assembly Monsoon Session Live Updates : आज पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. तीन दिवसांच्या सुट्यानंतर आज पुन्हा एकदा पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्यापूर्वीचे दोन दिवस वादळी ठरले आहेत. आजचा दिवस देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे.

Maharashtra Assembly Monsoon Session Live : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर; सुनावणी कधी होणार यावर प्रश्नचिन्ह

Monsoon Session Live :  आज पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस (Monsoon Session Live Updates) आहे. तीन दिवसांच्या सुट्यानंतर आज पुन्हा एकदा पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session Live) सुरुवात झाली आहे. त्यापूर्वीचे दोन दिवस वादळी ठरले आहेत. विविध मागण्यांवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. विरोधकांकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात आंदोलन करण्यात  आले. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षांनी देखील विरोधकांच्या प्रश्नाला तोडीस तोड उत्तर दिले. आज आधिवेशनाचा तिसरा दिवस आहे (maharashtra monsoon session 2022 Live). सभागृहात आज अनेक महत्त्वांच्या प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. विरोधक आज देखील सत्ताधाऱ्यांना विविध प्रश्न उपस्थित करत धारेवर धरण्याची शक्यता आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा आज सभागृहात पुन्हा एकदा गाजू  शकतो. जाणून घेऊयात पावसाळी अधिवेशनाची प्रत्येक अपडेट

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 Aug 2022 05:27 PM (IST)

    तुम्ही नाव शिवसेनेचं घेताय आणि सर्व कार्यक्रम भाजपचे राबवताय, भास्कर जाधवांचा शिंदेंना टोला

    एकनाथराव शिंदे, तुम्ही नाव शिवसेनेचं घेताय आणि सर्व निर्णय व कार्यक्रम भाजपचे राबवताय. गेल्या दीड दोन महिन्यातील असा एक निर्णय दाखवा, असा एक निर्णय दाखवा जो तुम्ही तुमच्या स्वत:च्या मनाने घेतलाय. तुम्हीच घेतलेले सर्व निर्णय ते तुमच्याकडून बदलून घेत आहेत, असा टोला भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदेंना लगावलाय.

  • 22 Aug 2022 02:36 PM (IST)

    एकनाथ शिंदेंच्या खात्याचे निर्णय वरूण सरदेसाईच घ्यायचे – नितेश राणे

    एकनाथ शिंदेंच्या खात्याचे निर्णय वरूण सरदेसाईच घ्यायचे – नितेश राणे

  • 22 Aug 2022 02:13 PM (IST)

    Maharashtra Monsoon Session live : पावसाळी अधिवेशन लाईव्ह

    पावसाळी अधिवेशन लाईव्ह

  • 22 Aug 2022 01:49 PM (IST)

    थेट सरपंच निवडीला विरोधाकांचा विरोध, विधेयक रद्द करण्याची मागणी

    मुख्यमंत्र्यांनी आज थेट जनतेतून सरपंच निवडीचे विधेयक मांडले. या विधेयकाला विरोधकांनी जोरदार विरोध केला आहे. विधेयक मागे घ्यावे अशी मागणी विरोधकांनी केली आहे. हे विधेयक पास झाल्यास ‘हम करे सो कायदा’ अशी स्थिती होईल’ असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

  • 22 Aug 2022 01:27 PM (IST)

    Assembly Monsoon Session Live : शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी राज्य सरकार जबाबदार – नाना पटोले

    कँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पोटले यांनी शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. हे सरकार आमच्यासोबत नाही अशी मानसिकता शेतकऱ्यांची झाली आहे. याच मानसिकतेतून शेतकरी आत्महत्या करत असल्याचे पटोले यांनी म्हटलं आहे.

  • 22 Aug 2022 12:58 PM (IST)

    Monsoon Session Live : मग अजित पवारांच्या नावे खडे का फोडता; मुश्रीफांचा गुलाबराव पाटलांना सवाल

    हसन मुश्रीफांचं गुलाबराव पाटलांना सभागृहात जोरदार प्रत्युत्तर

    अजित पवरांनी आम्हाला मदत केली अंस गुलाबराव पाटलांनी म्हटलं होतं

    हाच धाक पकडत मुश्रीफांचा गुलाबराव पाटलांना सवाल

    बंड केल्यानंतर सभागृहात अजित पवारांच्या नावे खडे का फोडले? – मुश्रीफ

  • 22 Aug 2022 12:40 PM (IST)

    Monsoon Session Live : जनतेतून थेट सरंपच निवड विधेयक; छगन भुजबळ लाईव्ह

    जनतेतून थेट सरंपच निवड विधेयक; छगन भुजबळ लाईव्ह

  • 22 Aug 2022 12:30 PM (IST)

    Monsoon Session Live: ठाकरे सरकारमध्ये असताना एकनाथ शिंदे यांनीच थेट सरपंच निवडीला विरोध केला – अजित पवार

    ठाकरे सरकारमध्ये असताना एकनाथ शिंदे यांनीच थेट सरपंच निवडीला विरोध केला – अजित पवार

  • 22 Aug 2022 12:24 PM (IST)

    Monsoon Session Live : जनतेतून थेट सरपंच निवडीचं विधेयक मुख्यमंत्र्यांनी मांडलं

    जनतेतून थेट सरपंच निवडीचं विधेयक मुख्यमंत्र्यांनी मांडलं

    जेतनेतून थेट सरपंच निवडीला विरोधकांचा विरोध

  • 22 Aug 2022 12:08 PM (IST)

    Monsoon Session Live : आर्थिक स्वार्थसाठी सरकार सत्तेवर आले, भास्कर जाधवांचा टोला

    आज पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. तिसरा दिवस देखील वादळी ठरत आहे. सरकारविरोधात विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. दरम्यान  आर्थिक स्वार्थसाठी सरकार सत्तेत आले, यात कुठे महाराष्ट्राच्या हिताचा मुद्दा दिसत नाही असा घणाघात भास्कर जाधव यांनी केला आहे.

  • 22 Aug 2022 11:52 AM (IST)

    Monsoon Session Live : पन्नास खोके एकदम ओक्के, खावून खावून माजले गद्दार बोके; विरोधकांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी

    Monsoon Session Live पन्नास खोके एकदम ओक्के, खावून खावून माजले गद्दार बोके; विरोधकांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी

  • 22 Aug 2022 11:29 AM (IST)

    Assembly Monsoon Session Live : मेटेंचा ड्रायव्हर सातत्यानं जबाब बदलतो त्यामुळे शंका उपस्थित होते – अजित पवार

    आज विनायक मेटे यांच्या अपघाताचा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्यात आला. त्यावर चर्चा सुरू असताना अजित पवार यांनी म्हटलं आहे की, ड्रायव्हर सातत्याने जबाब बदलत  असल्यामुळे त्यांच्या अपघाताबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.

  • 22 Aug 2022 11:17 AM (IST)

    Assembly Session Live : विरोधक पुन्हा आक्रमक; विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

    आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. अपेक्षेप्रमाणे तिसरा दिवस देखील वादळी ठरत असून, विरोधक राज्य सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. विरोधकांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Published On - Aug 22,2022 11:05 AM

Follow us
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.