दोन मोठ्या घडामोडी… फडणवीस आणि आदित्य ठाकरे भेट, नार्वेकर आणि दरेकरांची गळाभेट; राजकारणाचे संकेत काय?

मुंबईतील विधानभवनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे एकमेकांना भेटल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे नेते मिलिंद नार्वेकर आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा गळाभेट घेतानाचा एक व्हिडीओही समोर आला आहे.

दोन मोठ्या घडामोडी... फडणवीस आणि आदित्य ठाकरे भेट, नार्वेकर आणि दरेकरांची गळाभेट; राजकारणाचे संकेत काय?
फडणवीस आणि आदित्य ठाकरे भेट, नार्वेकर आणि दरेकरांची गळाभेट; राजकारणाचे संकेत काय?
Follow us
| Updated on: Jul 02, 2024 | 2:37 PM

Devendra Fadnavis Meet Aaditya Thackeray : सध्या राज्यात सर्वत्र निवडणुकांचे सत्र सुरु आहे. त्यातच आता दोन मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. आता मुंबईतील विधानभवनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे एकमेकांना भेटल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे नेते मिलिंद नार्वेकर आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा गळाभेट घेतानाचा एक व्हिडीओही समोर आला आहे. यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन्हीही नेते विधानभवनात

देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची भेट विधानभवनाच्या लॉबीत झाली आहे. मिलिंद नार्वेकरांना ठाकरे गटाकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मिलिंद नार्वेकरांचा महाराष्ट्र विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे विधानभवनात गेले होते. यावेळी आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकरांसोबत अनेक शिवसेना नेते उपस्थित होते.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या व्हिडीओत देवेंद्र फडणवीस हे विधानभवनाच्या लॉबीतून जाताना दिसत आहेत. त्यावेळी आदित्य ठाकरेंना पाहून ते थांबतात आणि त्यावर आदित्य ठाकरे त्यांच्याशी संवाद साधतात. ते ऐकून फडणवीस जोराजोरात हसू लागतात. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंनी एकमेकांना शुभेच्छा दिल्याचेही पाहायला मिळत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

यापूर्वीही शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची एकत्र लिफ्टमध्ये भेट झाली होती. या दोन्हीही नेत्यांनी एकाच लिफ्टने प्रवास केला होता. यावेळी त्यांच्यात काय संवाद झाला याची चर्चा सर्वत्र रंगली होती. त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते.

प्रवीण दरेकर आणि मिलिंद नार्वेकरांचीही भेट

तर दुसरीकडे विधानभवनात प्रवीण दरेकर आणि मिलिंद नार्वेकरांचीही भेट झाली आहे. मिलिंद नार्वेकर आणि प्रवीण दरेकरांच्या भेटीचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मिलिंद नार्वेकर आणि प्रवीण दरेकर एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून उभे असल्याचे दिसत आहेत. यावेळी ते एखाद्या महत्त्वाच्या विषयांवरही संवाद साधत आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काय सुरु आहे, याबद्दल तर्क-वितर्क लावले जात आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.