बाळासाहेब थोरात म्हणाले, विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच, पवार म्हणतात, निवडणुकीबाबत तिन्ही पक्षांनी एकत्र निर्णय घ्यावा!
महाविकास आघाडीमध्ये विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. निवडणूक घेण्यास तिन्ही पक्षांनी एकत्र निर्णय घ्यावा. काँग्रेसने त्यांचा उमेदवार ठरवावा आम्ही त्याला पाठिंबा देऊ, असं शरद पवार म्हणाले.
मुंबई : राज्याचं पावसाळी अधिवेशन येत्या पाच आणि सहा जुलैला होत आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची (Assembly Speaker Election) निवड होणार आहे. हे पद रिक्त असल्याने भाजपने (BJP) थेट राज्यपालांकडे धाव घेऊन, तातडीने अध्यक्षांची निवड कऱण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता काँग्रेसकडून ही निवड याच अधिवेशनात होणार असल्याची माहिती दिली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी काँग्रेसचाच अध्यक्ष होईल आणि याच अधिवेशनात निवड होईल अशी माहिती दिली. यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra Assembly Speaker Election NCP chief Sharad Pawar said three party will discuss and take decision monsoon session)
महाविकास आघाडीमध्ये विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. निवडणूक घेण्यास तिन्ही पक्षांनी एकत्र निर्णय घ्यावा. काँग्रेसने त्यांचा उमेदवार ठरवावा आम्ही त्याला पाठिंबा देऊ, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
ज्यावेळी आम्ही सरकार बनवलं, त्यावेळी विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे देण्याचं ठरलं. ती काँग्रेसची जागा आहे. त्याची निवडणूक घ्यायची असेल तर तिन्ही पक्षांनी निर्णय घ्यावा, काँग्रेस देईल तो निर्णय सिलेक्ट करावा, असं शरद पवार म्हणाले.
बाळासाहेब थोरात काय म्हणाले होते?
बाळासाहेब थोरात यांनी काल टीव्ही 9 मराठीशी बोलताना, “विधानसभा अध्यक्षांची निवड याच अधिवेशनात होणार आहे आणि तो अध्यक्ष काँग्रेसचा असेल. हे सरकार भक्कम आहे. दोन वर्षे सरकार चाललं आहे, पुढच्या काळातही सरकार चांगल्या पद्धतीने चालेल, महाविकास आघाडीमध्ये मतभेद नाहीत” असं सांगितलं होतं.
नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. मात्र विधानसभा अध्यक्षपद इतक्या अधिवेशनानंतरही रिक्त ठेवणे हे असंविधानिक असल्याचं म्हणत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. राज्यपालांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
संग्राम थोपटे यांचं नाव चर्चेत
काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी काही नावं शर्यतीत आहेत. यामध्ये सर्वात आघाडीवर असलेलं नाव म्हणजे संग्राम थोपटे. संग्राम थोपटे हे पुण्यातील भोर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत. थोपटे आतापर्यंत भोर मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
VIDEO : शरद पवार यांची पत्रकार परिषद
महाविकास आघाडीचे संख्याबळ
शिवसेना – 56 राष्ट्रवादी – 53 काँग्रेस – 43 तिन्ही पक्षांचे मिळून – 152
महाविकास आघाडीला पाठिंबा असलेले पक्ष
बहुजन विकास आघाडी – 3 समाजवादी पार्टी – 2 प्रहार जनशक्ती पार्टी – 2 माकप – 1 शेकाप – 1 स्वाभिमानी पक्ष – 1 क्रांतिकारी शेतकरी पार्टी – 1 163 अपक्ष – 8 171
विरोधकांकडे असलेले संख्याबळ
भाजप – 106 जनसुराज्य शक्ती – 1 राष्ट्रीय समाज पक्ष – 1 अपक्ष – 5 एकूण – 113
तटस्थ
महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 1 एमआयएम – 2
संबंधित बातम्या
विधानसभा अध्यक्षांची निवड कधी, अध्यक्षपद कोणाकडे?, बाळासाहेब थोरातांनी कोंडी फोडली