Maharashtra Assembly Session: जावई म्हणून माझी काळजी घेण्याची तुमचीच जबाबदारी अधिक; नार्वेकरांचा अजितदादांना टोला

Maharashtra Assembly Session : राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. यावेळी सर्वच सदस्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी अभिनंदन ठरावाला उत्तर दिलं.

Maharashtra Assembly Session: जावई म्हणून माझी काळजी घेण्याची तुमचीच जबाबदारी अधिक; नार्वेकरांचा अजितदादांना टोला
जावई म्हणून माझी काळजी घेण्याची तुमचीच जबाबदारी अधिक; नार्वेकरांचा अजितदादांना टोलाImage Credit source: ani
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 2:38 PM

मुंबई: राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार (ajit pawar) आणि जयंत पाटील (jayant patil) यांनी विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर (rahul narvekar) यांचा जावई असा उल्लेख केला. तुम्ही आमचे जावई आहात. त्यामुळे सासरकडच्यांची काळजी घ्या, असा सल्ला अजित पवार यांनी नार्वेकर यांना दिला होता. त्यावर राहुल नार्वेकर यांनी उत्तर दिलं आहे. अजित पवारांनी माझा उल्लेख जावई असा केला. जावई असल्यामुळे लेफ्ट बाजूची काळजी घेण्याची माझी जबाबदारी आहे, असं अजित पवार म्हणाले. उलट जावई म्हणून माझी काळजी घेणं तुमच्या सर्वांवर अधिक जबाबदारी आहे. त्यामुळे तुमच्याकडून सहकार्य मिळेल याची अपेक्षा आहे, असं नार्वेकर म्हणाले. त्यामुळे विधानसभेत एकच खसखस पिकली. खाली बसताना मी जास्त ऐकायचो आणि बोलायचो कमी. आता वर बसतानाही मला तीच भूमिका बजवावी लागणार आहे, असंही राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.

राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. यावेळी सर्वच सदस्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी अभिनंदन ठरावाला उत्तर दिलं. विधानसभा ज्या मतदारसंघात येते त्याच मतदारसंघाचा मी आमदार आहे. त्यामुळे सत्र काळात आणि निसत्रं काळात अध्यक्ष म्हणून चोवीस तास तुम्हाला भेटणार आहे. या सभागृहात चार माजी विधानसभा अध्यक्ष आहेत. हरिभाऊ बागडे, नाना पटोले, दिलीप वळसे पाटील आणि कार्याध्यक्ष नरहरी झिरवळ हे आहेत. माझ्यासाठी ही बहुमानाची गोष्ट आहे, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

धक्क्यांचा महिना

हा धक्क्यांचा महिना होता. अनेक धक्के राज्यात आले. भूकंप झाले. त्यातील एक धक्का मला लागला. पक्षाने माझी अध्यक्षपदाची उमेदवारी दिली. त्याबद्दल आभारी आहे, असं ते म्हणाले.

विधेयके चर्चेनेच पारित व्हावेत

लोकांच्या इच्छा आकांशांचे हे सभागृह आहे. त्यामुळे या लोकांच्या इच्छा आकांक्षा या सभागृहात मांडल्या जाव्यात. गोंधळामुळे सभागृहाचा वेळ वाया जाणं जनतेच्या भावनांची प्रतारणा आहे. त्यामुळे सभागृहाचे कामकाज प्रत्येक क्षण जनतेच्या सेवेसाठी, विकासासाठी आणि वंचितांच्या हक्कासाठी वापरले जाईल. कायदा करणे हे आपलं काम आहे. त्यामुळे विवेकाने चर्चा व्हावी आणि कायदा परिणमकारक व्हावा. पण दुर्देवाने अनेकदा विधेयके चर्चेविना पारित होतात. हे अशोभनिय आहे. त्यामुळे ही परिस्थिती बदलावी लागणार आहे. त्यासाठी काही व्यवस्था केली जाईल, असं सूचक

भाजपच्या जुन्या नेत्यांना जे जमले नाही

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं. भाजपच्या जुन्याजाणत्या नेत्यांना जे जमलं नाही. ते नार्वेकरांना जमलं. सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार आणि इतर कोणाला जमले नाही. ते राहुल नार्वेकरांनी 3 महिन्यात करून दाखवलं आहे. राहुल नार्वेकर आमचे जावाई आहेत. त्यांचे सर्व जावई हट्ट आम्ही पुरवले आहेत. आत त्यांना आमचे हट्ट पुरवावे लागतील. मूळ भाजापकडे बघून मला वाईट वाटतं, असा चिमटा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काढला. दीपक केसरकर हे चांगले प्रवक्ते झाले. आम्ही शिकवलेले काही वाया गेले नाही. ते आता कामी आले, असं अजितदादांनी म्हणताच एकच खसखस पिकली.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.