महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्याचा नाना पटोलेंचा दावा, भाजप नेत्यांवर जोरदार निशाणा
भाजप शेतकऱ्यांच्या हत्तेचं समर्थन करत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा बंदला विरोध पाहता त्यांची भूमिका स्पष्ट होते. भाजप नेते रस्त्यावर आले नाहीत म्हणून त्यांना बंद कळाला नसेल, असा टोला पटोले यांनी लगावला आहे.
मुंबई : लखीमपूर हिंसाचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज सत्ताधारी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. या बंदमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. मुंबईसह राज्यात अनेक भागात महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्याचा दावा केलाय. (Nana Patole claims that Maharashtra Band was successful)
आज महाविकास आघाडीच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला जनतेनं प्रतिसाद दिला. भाजपनं बंदला विरोध केला. भाजप शेतकऱ्यांच्या हत्तेचं समर्थन करत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा बंदला विरोध पाहता त्यांची भूमिका स्पष्ट होते. भाजप नेते रस्त्यावर आले नाहीत म्हणून त्यांना बंद कळाला नसेल, असा टोला पटोले यांनी लगावला आहे.
‘शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारची भूमिका’
मागील वर्षी नैसर्गिक आपत्ती झाली. त्याची पाहणी करायला केंद्राची टीम आता आली आहे. मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टी झालेल्या भागाला मदत करण्याची सरकारची भूमिका आहे, असंही पटोले यावेळी म्हणाले. महाराष्ट्र बंदसाठी जबरदस्ती झाली असेल तर त्याचं समर्थन काँग्रेस करत नाही. ज्या कुणी जाळपोळ आणि बसची तोडफोड केली त्याचं आम्ही समर्थन करत नाही. ज्या कुणी जाळपोळ आणि बसेसची तोडफोड केली, त्याचं आम्ही समर्थन करत नाही. हा सरकारचा बंद नव्हता तर पक्षीय बंद होता, असं पटोले म्हणाले.
अमृता फडणवीसांच्या टीकेला उत्तर
दरम्यान, महाराष्ट्र बंदवरुन महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्या अमृता फडणवीस यांनाही नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. वसुलीची जाणीवर अमृता फडणवीस यांना अधिक असेल. त्या माझ्या सुनेप्रमाणे आहेत, अशा शब्दात पटोले यांनी अमृता फडणवीसांना टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीसांची महाविकास आघाडीवर टीका
‘महाविकास आघाडी प्रायोजिक आजच्या बंदमध्ये मविआ सरकारचा ढोंगीपणा समाजासमोर उघड झाला. हे पूर्णपणे ढोंगी सरकार. लखीमपूरच्या घटनेकरिता महाराष्ट्रात बंद केला जातो. मात्र महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना एका नव्या पैशाची मदत हे सरकार करत नाही. महाराष्ट्रातील शेतकरी अभूतपूर्व संकटात. हे सरकार आल्यापासून 2 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या महाराष्ट्रात केल्या. सरकारने बांधावर जाऊन 25 हजार आणि 50 हजाराच्या केलेल्या घोषणा हवेत विरल्या, कर्जमाफीच्या घोषणा हवेत विरल्या, मदतीच्या घोषणा हवेत विरल्या, वेगवेगळी संकटं आली, त्यावेळी केलेल्या मदतीच्या घोषणा हवेत विरल्या. त्यांच्या घटकपक्षातील लोकही म्हणतात, पूर्वीचं भाजप सरकार मदत करत होतं, पण ज्या सरकारला आम्ही मदत करतोय, ते मदत करायला तयार नाहीत. त्यामुळे आजचा बंद आहे हा ढोंगीपणाचा कळस आहे. ही तीच मंडळी आहेत, मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. त्यांना आंदोलनाचा नैतिक अधिकार आहे का?, असा सवाल फडणवीस यांनी केलाय.
इतर बातम्या :
आज वसुली चालू आहे की बंद? अमृता फडणवीसांचा खोचक सवाल, आता रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर
Maharashtra Band : ठाण्यात उपमहापौरांच्या पतीची रिक्षाचालकांना मारहाण! व्हिडीओ उजेडात
Nana Patole claims that Maharashtra Band was successful