सोलापूर : राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका अद्यापही कायम असताना राजकीय वातावरणही तापलं आहे. अशात दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. एकीकडे आंदोलनामध्ये थेट धरणं करण्यासाठी बसलेल्या आंदोलकांना तलवारीचा धाक दाखवण्यात आला तर दुसरीकडे विकासकामाच्या ठिकाणी एका व्यक्तीने थेट हवेत गोळीबार केला. या दोन्ही घटनांमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. (maharashtra braking news firing in malegaon and in agitation two persons show sword in solapur)
स्वाभिमानीचे आंदोलन मोडून काढण्यासाठी अज्ञात दुचाकीस्वारानी तलवारीचा धाक दाखवल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऊस दर जाहीर करण्याच्या मागणीसाठी दामाजी साखर कारखान्याच्या प्रवेश द्वारासमोर आंदोलन सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून इथं बेमुदत धरणं आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन सुरू असतानाच अज्ञात दोन व्यक्तींनी तलवारीची भीती दाखवत आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात दोन व्यक्तींविरोधात मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानुसार पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, एकीकडे अशा पद्धतीने आंदोलनात चाकूचा धार दाखवण्यात आला तर दुसरीकडे मालेगावातही धक्कादायक घटना समोर आली आहे. वार्डात कित्येक वर्षानंतर विकास कामं होत असल्यानं विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी एका प्रतिष्ठित नागरिकाने हवेत गोळीबार केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे.
मालेगाव शहरातील जाफर नगर भागातील वार्ड क्र 13 मधील ही घटना आहे. गोळीबार करण्यात आल्याने शहारत खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गोळीबार करणाऱ्यांचा पोलीस घेत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. (maharashtra braking news firing in malegaon and in agitation two persons show sword in solapur)
इतर बातम्या –
Balasaheb Sanap: भाजपचं इनकमिंग उद्धव ठाकरेंनी रोखलं? बाळासाहेब सानपांची नाराजी दूर करण्यात यश?
शिवसेनेचा ‘परळ ब्रँड’ काळाच्या पडद्याआड; मोहन रावले यांचे निधन
Raju Shetti | शेतकरी आंदोलनाला दिल्लीच्या सीमेवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबाhttps://t.co/zM2RbSxIUo
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 13, 2020
(maharashtra braking news firing in malegaon and in agitation two persons show sword in solapur)