नव्याने मंत्री झालेल्या 13 जणांबद्दल थोडक्यात माहिती, वाचा एकाच ठिकाणी
राज्य मंत्रिडळाचा विस्तार पार पडला असून, एकूण 13 नव्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात 8 कॅबिनेट मंत्री आणि 5 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. महायुतीतील भाजपच्या कोट्यातून 10, शिवसेनेतून 2 आणि रिपाइं-आठवले गटातून एका नव्या मंत्र्याचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे.
मुंबई : राज्य मंत्रिडळाचा विस्तार पार पडला असून, एकूण 13 नव्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात 8 कॅबिनेट मंत्री आणि 5 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. महायुतीतील भाजपच्या कोट्यातून 10, शिवसेनेतून 2 आणि रिपाइं-आठवले गटातून एका नव्या मंत्र्याचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे.
काँग्रेसमधून नुकतेच भाजपावासी झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आहे, तर राष्ट्रवादीतून महिन्याभरापूर्वी शिवसेनेत दाखल झालेल्या जयदत्त क्षीरसागर यांनाही कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आहे.
नव्याने मंत्रिमंडळात समाविष्ट झालेल्या मंत्र्यांबद्दल थोडक्यात माहिती :
- राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) – कॅबिनेट मंत्री
- काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये दाखल
- 1997 शिवसेनेत प्रवेश, पोटनिवडणुकीत विजय
- 1997 – 1999 शिवसेनेकडून मंत्रिपदी वर्णी
- जलसंधारण, दुग्ध व्यवसाय, पशुसंवर्धन मंत्री म्हणून काम
- 1999 पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल
- 1999 ते 2009 काँग्रेसचे आमदार
- काँग्रेस सरकारमध्ये विविध मंत्रीपदे भुषवली
- शिक्षण, परिवहन, कृषी इत्यादी मंत्रिपदाचा अनुभव
- 2014 ला विरोधी पक्षनेतेपदी निवड
- 2019 ला विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा
- मुलाच्या लोकसभेतील उमेदवारीवरुन काँग्रेसचा त्याग
- काँग्रेस-शिवसेना-काँग्रेस-भाजप असा राजकीय प्रवास
- शिवसेनेत असताना शिर्डी मतदारसंघात दोन वेळा आमदार
- मोदी लाटेतही 2014 ला 75 हजारांनी विजयी
- जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) – कॅबिनेट मंत्री
- राष्ट्रवादी काँग्रेसमधून नुकताच शिवसेनेत प्रवेश
- बीडच्या केशरकाकू क्षीरसागरांचे पुत्र
- 2009 मध्ये प्रथम विधानसभेवर निवडून गेले
- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री
- 2014 मध्ये पुन्हा विधानसभेवर निवड
- विधानसभेतील राष्ट्रवादीचे विधीमंडळातील उपनेते
- मराठवाड्यात ओबीसीचे राजकारण
- मुंडे घराण्याशी सलोख्याचा संबंध
- तौलिक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्यानं मोदींशी संवाद
- क्षीरसागर कुटुंब उच्चशिक्षित म्हणून प्रसिद्ध
- आशिष शेलार (भाजप) – कॅबिनेट मंत्री
- मुंबईतल्या वांद्रे मतदारसंघाचे आमदार
- अभाविपच्या मुंबई संघटनमंत्री पदाची जबाबदारी
- सध्या मुंबई प्रदेश भाजपचे अध्यक्ष
- राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रथम वर्ष पूर्ण
- RSS, अभाविप मार्गे भाजपामध्ये दाखल
- 2002 ला मुंबई महापालिकेत नगरसेवक
- 2007 मध्येही मुंबई मनपात नगरसेवक
- 2012 ला विधानपरिषदेवर नियुक्ती
- 2015 मध्ये मुंबई क्रिकेट संघटनेच्या उपाध्यक्षपदी
- 2017 मध्ये पवारांचा पराभव करून MCA चे अध्यक्षपद मिळवले
- विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांशी जवळीक
- संजय कुटे (भाजप) – कॅबिनेट मंत्री
- जळगाव-जामोदचे आमदार, बुलढाण्यातला भाजपाचा चेहरा
- 2003 मध्ये जळगाव-जामोदचे तालुका अध्यक्ष
- 2010 मध्ये बुलडाण्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष
- प्रदेश कार्यकारिणीत सरचिटणीस म्हणून नियुक्ती
- 2004, 2009, 2014 या तिन्ही वर्षी सलग विधानसभेवर निवड
- भाऊसाहेब फुंडकरानंतर भाजपाचा आशावादी चेहरा
- मुख्यमंत्र्याच्या कोअर टीमचे सदस्य
- सुरेश खाडे (भाजप) – कॅबिनेट मंत्री
- मिरजचे भाजपा आमदार
- भाजपाचा प. महाराष्ट्रातला अनुसुचित जातीचा चेहरा
- सांगली जिल्ह्यात काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
- 2004 साली सांगली जिल्ह्यातल्या जतमधून विजयी
- 2009, 2014 या दोन्ही वर्षी सर्व प्रतिस्पर्ध्यांचे डिपॉझिट जप्त करुन मिरजेतून विजयी
- मिरजेतील 37 ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात
- सांगली मिरज-कुपवाड मनपावर भाजपची सत्ता आणण्यात महत्वाचे योगदान
- अनिल बोंडे (भाजप) – कॅबिनेट मंत्री
- अमरावतीतील मोर्शीचे भाजपा आमदार
- मोठ्या फरकाने मोर्शीतून विजयी
- शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण
- विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज
- शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत गोंधळ घातला
- तानाजी सावंत (शिवसेना) – कॅबिनेट मंत्री
- यवतमाळमधून शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार
- 2015 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत
- खासगी साखरसम्राट आणि शिक्षणसम्राट अशी ओळख
- उस्मानाबादच्या राजकारणावर चांगली पकड
- कोणतेही मोठे आंदोलन न करता शिवसेनेत मोठे स्थान
- ‘लक्ष्मी’पुत्र अशी शिवसेनेत खासगीमधली ओळख
- सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील रहिवासी
- राष्ट्रवादीचे बबन शिंदेंविरोधात तीनदा निवडणूक लढवली
- दोनवेळा शिवसेनेकडून निवडणूक लढवली
- एकदा अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली
- राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटील गटाचे समर्थक म्हणून ओळख
- अशोक उईके (भाजप) – कॅबिनेट मंत्री
- भाजपाचा सामान्य कार्यकर्ता ते आमदार
- 2014 मध्ये वसंत पुरकेंचा पराभव करून विजयी
- विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष
- भाजपा आदिवासी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष
- राळेगाव, कळंब, बाभुळगावमधील नगरपंचायती जिंकल्या
- योगेश सागर (भाजप) – राज्यमंत्री
- मुंबईतील चारकोप मतदारसंघातून दोन वेळा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले आहेत.
- योगेश सागर भाजपचे आमदार आहेत.
- योगेश सागर हे प्रसारमाध्यमांमध्ये भाजपची भूमिका ठामपणे मांडत असतात.
- अविनाश महातेकर (रिपाइं-आठवले गट) – राज्यमंत्री
- आंबेडकर चळवळीचे अनुयायी
- रामदास आठवलेंचे समर्थक
- रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस
- दलित पँथरमध्येही सहभाग
- विधिमंडळाचे सदस्य नाहीत
- संजय (बाळा) भेगडे (भाजप) – राज्यमंत्री
- भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष
- पुण्याच्या ग्रामीण भागात चांगले काम
- 2014 मध्ये मावळ मधून विधानसभेवर निवडून आले
- बाळा भेगडे सलग दुसऱ्यांदा आमदार
- परिणय रमेश फुके (भाजप) – राज्यमंत्री
- डॉ. परिणय फुके हे उच्चविद्याविभूषित आहेत, त्यांनी नागपूर विद्यापीठातून पीएचडी केलीय.
- 2007 साली नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडणूक गेले होते.
- भंडारा-गोंदियातून ते विधानपरिषदेचे आमदार आहेत.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे ते निकटवर्तीय मानले जातात.
- भाजपचा तरुण चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
- अतुल सावे (भाजप) – राज्यमंत्री
- औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार
- त्यांनी 2014 ला राजेंद्र दर्डांचा पराभव केला
- अतुल सावेंचे वडील मोरेश्वर सावे,
- औरंगाबादमधील शिवसेनेचे पहिले खासदार
- सावे कुटुंबीय शिवसेना सोडून भाजपात
- भाजपात अतुल सावेंना जिल्हाध्यक्ष, कार्यकारणी सदस्यत्व
संबंधित बातम्या :
संपूर्ण यादी : राज्य मंत्रिमंडळात 13 नवे चेहरे, कोण कॅबिनेट मंत्री, कोण राज्यमंत्री?
शिवसेनेला केवळ दोन कॅबिनेट मंत्रिपदं, दोन्ही राष्ट्रवादीतून आलेल्या नेत्यांना!
जयदत्त क्षीरसागर…. महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश, आणि थेट कॅबिनेट मंत्रिपद
13 नव्या मंत्र्यांनी शपथ घेताच, 6 विद्यमान मंत्र्यांचे राजीनामे