सर्वात मोठी बातमी ! मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त हुकला; आता विस्तार अधिवेशनानंतर

दिल्लीत मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं सांगितलं जात होतं. आज किंवा उद्याच हा विस्तार होईल असंही सांगितलं जात होतं.

सर्वात मोठी बातमी ! मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त हुकला; आता विस्तार अधिवेशनानंतर
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 10:15 AM

मुंबई : दिल्लीत मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं सांगितलं जात होतं. आज किंवा उद्याच हा विस्तार होईल असंही सांगितलं जात होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर संभाव्या मंत्र्यांना मुंबईतच थांबण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त हुकला आहे. पावसाळी अधिवेशनानंतरच विस्तार होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे इच्छुकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

गेल्या आठ दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार आणि नव्या मंत्र्यांच्या खाते वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीच्या जोरबैठका सुरू होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी या बैठका सुरू होत्या. मात्र, अर्थ खातं, सहकार आणि ग्रामीण या तीन खात्यावरून वाद होता. शिंदे गटाने अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास विरोध केल्याने हा तिढा अधिकच वाढला होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाचा तिढा सुटला होता. त्यामुळे आज किंवा उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा होती.

हे सुद्धा वाचा

फोनाफोनी

मंत्रिमंडळाचा विस्तार आज किंवा उद्या होणार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना फोन करून मुंबईतच राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच वर्षावर बैठकीचं आयोजनही केलं होतं. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार आजच होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, खाते वाटप आणि विस्तारावर शिंदे गट आक्रमक झाल्याने हा विस्तार रखडला आहे. तसेच शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी मंत्रिपद मिळत नसल्याने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. बच्चू कडू यांनी तर पत्रकार परिषद घेऊन निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आमदारांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

विस्तार अधिवेशनानंतर

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिवेशनात आमदारांची नाराजी नसावी आणि अधिवेशन सुखरूप पार पडावं म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे ढकलण्यात आल्याचीही चर्चा आहे. आता विस्तार अधिवेशनानंतरच केला जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या विस्ताराकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.