पुढचे 48 तास महत्त्वाचे ! जोरदार लॉबिंग,, सेटिंग, फिल्डिंग सुरू… मंत्रिपदासाठी इच्छुकांच्या भेटीगाठी वाढल्या

देवेंद्र फडणवीस सरकारचा विस्तार येत्या 48 तासांत होणार असून, यासाठी शिंदे गटात जोरदार लॉबिंग सुरू आहे. मंत्रिपदांची संख्या मर्यादित असल्याने इच्छुकांमध्ये स्पर्धा आहे. मंत्रिपद वाटपासाठी प्रदेशनिहाय प्रतिनिधित्व आणि पक्ष बळकटीकरण यावर चर्चा सुरू आहे. अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युलाही चर्चेत असून यामुळे इच्छुकांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे.

पुढचे 48 तास महत्त्वाचे ! जोरदार लॉबिंग,, सेटिंग, फिल्डिंग सुरू... मंत्रिपदासाठी इच्छुकांच्या भेटीगाठी वाढल्या
eknath shindeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 13, 2024 | 5:30 PM

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या दोन दिवसात होणार आहे. हिवाळी अधिवेशनातच रविवारी नागपूरमध्ये मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आपल्याच गळ्यात मंत्रिपदाची माळ पडावी म्हणून इच्छुकांची जोरदार लॉबिंग, सेटिंग, फिल्डिंग सुरू झाली आहे. खासकरून मंत्रिपदासाठी शिंदे गटात मोठी लॉबिंग सुरू आहे. पुढचे 48 तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. तानाजी सावंत, भरत गोगावले, संजय शिरसाट आणि उदय सामंत हे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. कुणाला मंत्रिपदं द्यायची आणि कुणाला नाही याची चर्चा या बैठकीत होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या रविवारी फडणवीस सरकारचा विस्तार होणार आहे. या पार्श्वभूमीवर तानाजी सावंत, भरत गोगावले, संजय शिरसाट आणि उदय सामंत हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गेले आहेत. मंत्रिमंडळात 13 मंत्र्यांनाच स्थान मिळणार असल्याने कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं आणि कुणाला नाही यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यात 14 महापालिकेच्या निवडणुका होणार आहे, त्यामुळे कोणत्या भागात किती मंत्रिपदं द्यायची, प्रदेशनिहाय मंत्रिपदं द्यायची का? पक्ष मजबूत करण्यासाठी कोणत्या भागावर जोर द्यावा लागेल याची चर्चाही या बैठकीत करून नंतरच मंत्रिपदाचं वाटप केलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

इच्छुकांना कसं समजावणार?

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शिंदे गटाचे अनेक आमदार मंत्रीपदाची आस लावून बसले होते. पण त्यातील फार थोड्यांनाच संधी मिळाली होती. अजितदादा यांचा महायुतीत प्रवेश झाल्यानंतर शिंदे गटाच्या वाट्याला येणारी मंत्रिपदे कमी झाली होती. त्यामुळे शिंदे गटाच्या अनेकांचा हिरमोड झाला होता. त्यानंतर सरकारच्या अखेरच्या काळात काही आमदारांना महामंडळ देऊन त्यांची समजूत काढण्यात आली होती. मात्र, आता फडणवीस सरकार पाच वर्षासाठी असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला फुल्ल टर्म मंत्रिपद हवं आहे, ज्यांना मागच्यावेळी मंत्रिपद मिळालं नव्हतं ते आता मंत्रिपदासाठी दावा ठोकून बसले आहेत. त्यामुळे या इच्छुकांची एकनाथ शिंदे कशी समजूत काढतात? किंवा त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ टाकतात का? हे पाहावं लागणार आहे.

मंत्रिपदाचा फॉर्म्युला काय?

फडणवीस सरकार पाच वर्ष राहणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला मंत्री बनायचं आहे. मात्र इच्छुक जास्त आणि मंत्रिपदं कमी अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे अडीच अडीच वर्ष प्रत्येकाला मंत्रिपद देण्याचं शिंदे गटात घटत आहे. हा फॉर्म्युला जर लागू केला तर पहिली अडीच वर्ष आपल्यालाच मिळावी म्हणून इच्छुकांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे.

असा ठरला फॉर्म्युला

फडणवीस सरकारमध्ये भाजपचे 21, शिंदे गटाचे 13 आणि अजितदादा गटाचे 9 मंत्री असणार आहेत. आमदारांच्या संख्याबळानुसार हा फॉर्म्युला तयार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तसेच नव्या सरकारमध्ये कुणाकडे कोणती खाती असणार याचंही वाटप करण्यात आलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.