Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Cabinet Expansion : अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचं घोडं गंगेत न्हालं! खातेवाटप आजच जाहीर होण्याची शक्यता, कुणाला कोणतं खातं मिळणार?

शंभुराज देसाई, गिरीश महाजन या मंत्र्यांनी खातेवाटपाचा अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाच आहे आणि त्यांचा निर्णय सर्वांना मान्य असेल, असं स्पष्ट केलंय. असं असलं तरी संभाव्य खातेवाटप काय असणार, याची एक यादी टीव्ही 9 मराठीला सूत्रांनी दिलीय.

Maharashtra Cabinet Expansion : अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचं घोडं गंगेत न्हालं! खातेवाटप आजच जाहीर होण्याची शक्यता, कुणाला कोणतं खातं मिळणार?
शिंदे, फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 6:05 PM

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार आलं. मात्र महिनाभरापासून या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) रखडला होता. आज अखेर शिंदे गटातील 9 आणि भाजपच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी या मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मंत्र्यांच्या शपथविधीनंतर (Oath Ceremony) आजच खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, कुणाकडे कोणतं खातं जाणार याबाबत अद्याप निश्चित माहिती समोर आलेली नाही. मात्र, शंभुराज देसाई, गिरीश महाजन या मंत्र्यांनी खातेवाटपाचा अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाच आहे आणि त्यांचा निर्णय सर्वांना मान्य असेल, असं स्पष्ट केलंय. असं असलं तरी संभाव्य खातेवाटप काय असणार, याची एक यादी टीव्ही 9 मराठीला सूत्रांनी दिलीय.

शिंदे-फडणवीस सरकारमधील संभाव्य खातेवाटप?

विधी आणि न्याय – मंगलप्रभात लोढा, मुंबई

नगरविकास खाते – एकनाथ शिंदे, ठाणे

गृह आणि अर्थ – देवेंद्र फडणवीस, नागपूर

गृहनिर्माण – रवींद्र चव्हाण, ठाणे

उद्योग – उदय सामंत, रत्नागिरी

पर्यटन आणि पर्यावरण – दीपक केसरकर, सिंधुदुर्ग

सार्वजनिक बांधकाम – चंद्रकांत पाटील, पुणे

सामाजिक न्याय – सुरेश खाडे, सांगली

महसूल आणि सहकार – राधाकृष्ण विखे पाटील, अहमदनगर

कृषी – दादा भुसे, नाशिक

पाणी पुरवठा – गुलाबराव पाटील, जळगाव

जलसंपदा – गिरीश महाजन, जळगाव

आदिवासी विकास – विजयकुमार गावित, नंदुरबार

अल्पसंख्याक विकास – अब्दुल सत्तार, औरंगाबाद

आरोग्य – अतुल सावे, औरंगाबाद

उच्च व तंत्रशिक्षण – तानाजी सावंत, उस्मानाबाद

ऊर्जा आणि वन – सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूर

ग्रामविकास – संजय राठोड, यवतमाळ

शंभूराजे देसाई, सातारा – ?

संदीपान भुमरे, औरंगाबाद – ?

विरोधकांच्या आरोपांना फडणवीसांचं उत्तर

फडणवीस म्हणाले की मंत्रिमंडळ विस्तार होत नाही म्हणून काही लोक बोलत होते. विस्तार होत नाही, हे सरकार पडेल असंही काही लोक बोलत होते. आता विस्तार झाला, सरकारही मजबूत आहे. काहीही प्रश्न उपस्थित झाला नाही. तसंच महिला मंत्री नाही हा जो आक्षेप आहे तो लवकरच दूर होईल आणि महिलांना योग्य प्रतिनिधित्व आमच्या मंत्रिमंडळात मिळेल. त्यांनीही पहिल्यांदा विस्तार केला तेव्हा पाच मंत्री घेतले, त्यात कुठलीही महिला घेतली नव्हती. त्यांना असं बोलण्याचा काहीही अधिकार नाही, असा पलटवार फडणवीस यांनी केलाय.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.