Devendra Fadnavis : ‘शरद पवार चाणक्य, जेव्हा तुम्ही ठामपणे बोलता की…’ मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis : . "RSS ने महाराष्ट्रातील निवडणुकीत अराजकतावादी शक्ती विरोधात लढण्यासाठी राष्ट्रीय शक्तींना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली" असं देवेद्र फडणवीस यांनी सांगितलं.
नुकतच शरद पवार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या भव्य यशाबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच कौतुक केलं होतं. त्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. “शरद पवार हे चाणक्य आहेत. त्यांना लक्षात आलं असेल की, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये सेट केलेलं फेक नरेटिव विधानसभा निवडणुकीत कसं पंचर झालं. राष्ट्रीय स्वय़ंसेवक संघ ही राजकारण करणारी नाही, तर राष्ट्र निर्माण करणारी शक्ती आहे, हे शरद पवार यांना समजलं असेल. आपल्या स्पर्धकाच सुद्धा कौतुक करावं लागतं. म्हणून त्यांनी RSS च कौतुक केलं असावं” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शरद पवार आणि अजित पवार यांचे पक्ष जवळ येण्यासंबंधी किंवा एकत्र येण्याच्या शक्यतेवरही देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. “2019 नंतर तुम्ही माझी वक्तव्य ऐकली असतील. 2019 ते 2024 मध्ये ज्या घटना घडल्या, त्यावरुन मला एक गोष्ट समजली की, काहीही अशक्य नाहीय. कुठली गोष्ट होणार नाही, असं मानून कधी चालू नये. काहीही होऊ शकतं. उद्धव ठाकरे तिथे जाऊ शकतात, अजित पवार इथे येऊ शकतात. राजकारणात काहीही होऊ शकतं. एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे, जेव्हा तुम्ही ठामपणे बोलता, असं होणार नाही, त्यावेळी राजकीय परिस्थिती तुम्हाला कुठे नेऊन ठेवेल हे सांगता येत नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
फडणवीसांनी निवडणुकीतील RSS चा रोल सांगितला
वरिष्ठ आरएसएस नेते विलास फडणवीस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नागपूरमध्ये आयोजित पुरस्कार सोहळ्यात देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. तिथे भाषण करताना त्यांनी ही राजकीय वक्तव्य केली. “RSS ने महाराष्ट्रातील निवडणुकीत अराजकतावादी शक्ती विरोधात लढण्यासाठी राष्ट्रीय शक्तींना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली” असं देवेद्र फडणवीस म्हणाले. “महाराष्ट्रातील निवडणुकीत आम्ही आरएसएसची विचारधारा मानणाऱ्यांना विनंती केली होती की, अराजकतावादी शक्तींविरोधात राष्ट्रीय शक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे. संघ परिवारातील विविध क्षेत्रातील लोकांनी अराजकतेविरोधात लढण्यासाठी आपपाल्या क्षेत्रात भूमिका बजावली” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.