Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापालिका निवडणुकांमध्ये आघाडी करायची का?, काँग्रेसचं तीन दिवस मंथन; मॅरेथॉन बैठकीकडे सर्वांचं लक्ष

राज्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत काँग्रेस आघाडी करणार का? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. (maharashtra congress holds party meeting in mumbai )

महापालिका निवडणुकांमध्ये आघाडी करायची का?, काँग्रेसचं तीन दिवस मंथन; मॅरेथॉन बैठकीकडे सर्वांचं लक्ष
nana patole
Follow us
| Updated on: Feb 21, 2021 | 1:46 PM

मुंबई: राज्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत काँग्रेस आघाडी करणार का? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. या प्रश्नाचं लवकरच उत्तर मिळण्याची शक्यता आहे. कारण येत्या 24 फेब्रुवारीपासून ते 26 फेब्रुवारीपर्यंत काँग्रेसची मुंबईत मॅरेथॉन बैठक होणार असून त्यात महापालिका निवडणुकांबाबतच्या आघाडीवर चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे या तीन दिवसाच्या बैठकीत काँग्रेस काय निर्णय घेणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. (maharashtra congress holds party meeting in mumbai )

पटोलेंची पहिलीच बैठक

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार 23 फेब्रुवारी रोजी प्रदेश काँग्रेसच्या निवड मंडळाची (पार्लमेंटरी बोर्ड) बैठक महिला विकास महामंडळ, नरिमन पाईंट येथे होणार आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून पटोले यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही पहिलीच बैठक आहे. या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह निवड मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.

कृषी कायद्यांवरही चर्चा

या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. शेतकरी विरोधी काळे कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात आंदोलन व जनजागृती मोहिम राबविण्याबाबतही या बैठकीत रणनिती ठरवली जाणार आहे.

मुंबई-ठाण्यातील जिल्हा कमिट्यांशी चर्चा

राज्यातील आगामी ५ महानगरपालिका तसेच ९८ नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बांधणीसंदर्भातनाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीबरोबर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई काँग्रेसचे कार्यालय राजीव गांधी भवन येथे 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता नवी मुंबई शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, दुपारी 12 वाजता कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, दुपारी 2 वाजता वसई विरार जिल्हा काँग्रेस कमिटी व दुपारी 4 वाजता कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक घेतली जाणार आहे. तर गुरुवार 25 रोजी औरंगाबाद ग्रामीण व शहर, भंडारा, गोंदिया व ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक होत आहे. शुक्रवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी यवतमाळ, चंद्रपूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक घेऊन संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला जाणार आहे तर संध्याकाळी 4 वाजता भिवंडी येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. (maharashtra congress holds party meeting in mumbai )

संबंधित बातम्या:

ठरलं ! मुख्यमंत्री महाराष्ट्राशी रात्री 7 वाजता बोलणार, लॉकडाऊनचा संभ्रमही दूर करणार?

लॉकडाऊन, संचारबंदी, नवे हॉटस्पॉट, नवे निर्बंध, विदर्भात कोणत्या जिल्ह्यात काय?; वाचा स्पेशल रिपोर्ट

मोठा निर्णय! पुण्यात सोमवारपासून ‘नियंत्रित संचार’, विवाह सोहळे, हॉटेल, महाविद्यालांना बंधने; वाचा काय काय असतील निर्बंध

(maharashtra congress holds party meeting in mumbai )

धस खोक्याचे आका...त्यांना हिरो व्हायचंय, तृप्ती देसाईंचा धसांवर निशाणा
धस खोक्याचे आका...त्यांना हिरो व्हायचंय, तृप्ती देसाईंचा धसांवर निशाणा.
धसांच्या गंभीर आरोपांवर दमानिया म्हणाल्या, बुद्धीला हे न पटण्यासारखं..
धसांच्या गंभीर आरोपांवर दमानिया म्हणाल्या, बुद्धीला हे न पटण्यासारखं...
'माझ्या खुनाचा कट अन् मला व्हिलन ठरवून...', धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
'माझ्या खुनाचा कट अन् मला व्हिलन ठरवून...', धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट.
राज ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचं मनसेचं 'इंजिन' कोणत्या दिशेनं?
राज ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचं मनसेचं 'इंजिन' कोणत्या दिशेनं?.
वाल्मिक कराडला कोणी चोपलं? बीडच्या जेलमध्ये तुफान राडा, घडलं काय?
वाल्मिक कराडला कोणी चोपलं? बीडच्या जेलमध्ये तुफान राडा, घडलं काय?.
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.