Delhi Election : ‘दिल्लीत केजरीवाल जिंकू शकतात’, महाराष्ट्रातील मोठ्या काँग्रेस नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

Delhi Election : काँग्रेसच्या नेत्यांना स्वत:च्या पक्षावर विश्वास उरलेला दिसत नाहीय. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरु झालेला असताना महाराष्ट्रातील एका मोठ्या काँग्रेस नेत्याने भुवया उंचावणार विधान केलं आहे. एकप्रकारे हा पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

Delhi Election : 'दिल्लीत केजरीवाल जिंकू शकतात', महाराष्ट्रातील मोठ्या काँग्रेस नेत्याचा पक्षाला घरचा आहेर
Congress Party
Follow us
| Updated on: Jan 09, 2025 | 1:41 PM

मागच्यावर्षी जून महिन्यात लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निकालानंतर काँग्रेस पक्षामध्ये एक उत्साह होता. हरियाणा विधानसभा निवडणुकीपर्यंत हा उत्साह टिकून होता. पण हरियाणाच्या निवडणूक निकालानंतर सगळ चित्रच बदललं. काँग्रेसच्या नेत्यांनाच आपल्या पक्षाच्या विजयाची खात्री उरलेली नाही. हे त्यांच्या वक्तव्यामधून दिसून येत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावरुन हे दिसून येतं. हरियाणामध्ये हमखास जिंकणार असा काँग्रेसला विश्वास होता. मागच्या दोन टर्मपासून असलेलं भाजपच सरकार जाणार असं ठाम विश्वास या पक्षाला होता. पण निवडणूक निकालात उलटच घडलं. काँग्रेसचा पराभव झाला. भाजपने हरियाणात विजयाची हॅट्ट्रिक केली.

हरियाणानंतर महाराष्ट्रातही तेच झालं. खरंतर लोकसभा निवडणुकीला 13 जागा जिंकून काँग्रेस महाराष्ट्रातला मोठा पक्ष ठरला होता. काँग्रेस नेत्यांकडून थेट मुख्यमंत्री पदावर दावा सुरु झाला होता. पण सहा महिन्यात महाराष्ट्रात असं काही चित्र बदललं की, अजूनही महाविकास आघाडीचे नेते आणि समर्थकांचा विश्वास बसत नाहीय. 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत पुन्हा एकदा महायुतीने सत्ता मिळवली. महत्त्वाच म्हणजे ही सत्ता मिळवताना काँग्रेससह मविआचा दारुण पराभव झाला. महायुतीने 230 पेक्षा जास्त जागा जिंकल्या. भाजपने महाराष्ट्राच्या इतिहासातील घवघवीत यश संपादन केलं. काँग्रेसला सर्वात कमी म्हणजे फक्त 16 जागा मिळाल्या.

निकालाआधीच पराभव मान्य केला का ?

महाराष्ट्राच्या निकालानंतर काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वासच जणू हरवलाय असं दिसतय. दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानातून हे दिसून आलं. “काँग्रेस आणि आप एकत्र असते, तर चांगलं झालं असतं, दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-आपची आघाडी होताना दिसत नाहीय” असं ते म्हणाले. इतकच नाही, तर “दिल्ली विधानसभा निवडणूक महत्त्वाची आहे. अरविंद केजरीवाल ही निवडणूक जिंकू शकतात. काँग्रेसही शर्यतीत आहे. पण इथे बसून मला दिल्लीबद्दल जास्त काही बोलता येणार नाही” असं त्यांनी सांगितलं. पृथ्वीराज चव्हाण यांचं हे विधान म्हणजे निवडणुकीआधीच पराभव मान्य करण्यासारखं आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.