क्रॉस व्होटिंग करणारे आमदार होणार निलंबित? काँग्रेसच्या बैठकीत घेतला जाणार मोठा निर्णय

महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची असल्याचे बोललं जात आहे.

क्रॉस व्होटिंग करणारे आमदार होणार निलंबित? काँग्रेसच्या बैठकीत घेतला जाणार मोठा निर्णय
काँग्रेसची बैठक
Follow us
| Updated on: Jul 19, 2024 | 10:14 AM

Maharashtra Congress Meeting : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची असल्याचे बोललं जात आहे. या बैठकीला काँग्रेस पक्षाचे महासचिव केसी वेणुगोपाल, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांसह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

काँग्रेस कमिटीच्या प्रमुख नेत्यांची बैठक

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रमुख नेत्यांची बैठक मुंबईतील गरवारे क्लब या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. आज सकाळी 10 वाजता ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला काँग्रेस पक्षाचे महासचिव केसी वेणुगोपाल, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, नसीम खान, विश्वजीत कदम यांसह अनेक नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.

विधानसभेच्या निवडणुकीबद्दल चर्चा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची असल्याचे मानलं जात आहे. या बैठकीत आगामी काळाती विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस राज्यातील किती जागांवर दावा करणार, याबद्दल चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीला कोणकोणते नेते उपस्थित असणार

केसरी वेणुगोपाल रमेश चन्नीथला नाना पटोले बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार सुशील कुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण मुकुल वासनिक अविनाश पांडे माणिकराव ठाकरे इम्रान प्रतापगडी वर्षा गायकवाड सतेज पाटील शिवाजीराव मोघे आरिफ नसीम खान चंद्रकांत हंडोरे प्रणिती शिंदे कुणाल पाटील अमीन पटेल यशोमती ठाकूर रजनीताई पाटील नितीन राऊत केसी पाडवी सुनील केदार अमित देशमुख अस्लम शेख विश्वजीत कदम भाई जगताप चरणसिंग सप्रा नाना गावंडे संजय दत्त हर्षवर्धन सकपाळ पृथ्वीराज साठे रामकृष्ण ओझा आशिष दुवा संपत कुमार सोनल पटेल बी एम संदीप

काँग्रेसकडून सर्वात जास्त जागांची मागणी

लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने सर्वात जास्त 13 लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसकडून सर्वात जास्त जागांची मागणी करण्यात येणार असल्याचे बोललं जात आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकासआघाडीत काँग्रेस 120 जागांची मागणी करु शकते किंवा त्याबद्दलचा प्रस्ताव ठेवू शकते, अशी माहिती समोर येत आहे.

क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई

त्यासोबत या बैठकीमध्ये विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या ज्या ७ आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं होतं. त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आमदारांवर काही मोठी कारवाई होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

काँग्रेस हायकमांडकडून विधानपरिषद निवडणुकीच्या संदर्भात ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं, तो प्रकार फार गांभीर्यांने घेण्यात आला आहे. यासंदर्भात दिल्लीत सुद्धा एक बैठक पार पडली होती. त्यामुळे आजच्या बैठकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या ५ ते ७ आमदारांवर काँग्रेस निलंबनाची कारवाई करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.