शिथिलतेबाबत सरकार सकारात्मक, हॉटेल चालक, व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी विचार सुरु – अस्लम शेख
शिथिलतेबाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करत आहे. हॉटेल, कापड उद्योग, व्यापाऱ्यांना कशाप्रकारे सुविधा द्यायच्या यावर सरकार विचार करत असल्याचा दावा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलाय.
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई लोकल आणि व्यापाऱ्यांना दिलासा देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण असा कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. अशावेळी शिथिलतेबाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करत आहे. हॉटेल, कापड उद्योग, व्यापाऱ्यांना कशाप्रकारे सुविधा द्यायच्या यावर सरकार विचार करत असल्याचा दावा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलाय. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून कोरोना लसीचा पुरेसा साठा मिळत नसल्यामुळे अनलॉकचा निर्णय पूर्णपणे अमलात येऊ शकत नसल्याचंही शेख यांनी म्हटलंय. (Aslam Sheikh claims that the state government is positive about the relaxation of Corona restrictions)
राज्याला लस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. पण केंद्राकडून लसीचा पुरेसा साठा मिळत नाही. खासगी रुग्णालयांना लस उपलब्ध होते. मात्र, सरकारी रुग्णालयांना लस मिळत नाही. देशात ज्या राज्यात भाजपचं सरकार नाही तिखे अशीच स्थिती असल्याचा आरोपही अस्लम शेख यांनी केलाय. कोरोना संकटापूर्वी कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. कोरोना काळात कित्येक लोकांचं नुकसान झालं, याला केंद्र सरकार जबाबदार आहे. केंद्र सरकारचा नियोजनशुन्य कारभार यातून दिसून आल्याची टीका शेख यांनी केलीय.
विरोधकांच्या दाव्याचाही समाचार
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्राकडे लस पुरवठ्यासाठी पाठपुरावा करावा, राज्य सरकारचा हक्काचा जीएसचीटा पैसा आणण्यासाठी प्रयत्न करावा, असा टोलाही अस्लम शेख यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे. राज्य सरकार आपल्या ओझ्यानं पडेल या विरोधकांच्या दाव्याचाही त्यांनी समाचार घेतला. निराशा इतकी वाढली आहे की तारीख पे तारीख देणं सुरु आहे. आपले आमदार, कार्यकर्त्यांना कसं जपून ठेवायचं यासाठी केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. डायलॉगबाजी केली नाही तर त्यांच्या पक्षात कोण राहणार? असा टोलाही त्यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत मुंबई लोकल व्यापाऱ्यांबाबत निर्णय नाही
बुधवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वसामान्य नागरिकांसाठी नियमावलीसह लोकल सुरु करण्याबाबत निर्णय होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात होता. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी लोकल प्रवासाचा विचार व्हावा, अशी मागणी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली होती. मात्र, त्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही.
दुसरीकडे राज्यभरात व्यापारी वर्ग कोरोना निर्बंधांविरोधात आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहे. अनेक शहरात व्यापाऱ्यांनी सरकारविरोधात निदर्शनं केली. त्यामुळे व्यापारी वर्गाचा संताप पाहता व्यापाऱ्यांबाबत काही सकारात्मक निर्णय होऊ शकतो, अशीही एक शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, त्याबाबतही या बैठकीत निर्णय झालेला नाही.
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 15 July 2021https://t.co/ZtfMvhdpG8 | #MahaFastNews100 | #DevendraFadnavis | #ChandrakantPatil | #pankajamunde | #Maharashtra |
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 15, 2021
संबंधित बातम्या :
ऋषभ पंतला कोरोना, आता विराट कोहलीचा हुकमी एक्का इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरणार?
Maharashtra SSC Result 2021: दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, उद्या दुपारी निकाल!
Aslam Sheikh claims that the state government is positive about the relaxation of Corona restrictions