पंतप्रधानांनी कौतुक केल्याच्या ठाकरे सरकारच्या दाव्यावर भाजपचा हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारचं कौतुक केल्याच्या दाव्यावर केशव उपाध्ये यांचा हल्लाबोल
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती हाताळणीबाबत राज्य सरकारकचं कौतुक करण्यात आल्याचा दावा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलाय. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीही पंतप्रधान मोदी राज्य सरकारकचं कौतुक करत आहेत आणि फडणवीस मात्र टीका करत आहेत, असा टोला लगावलाय. त्यावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून जोरदार निशाणा साधलाय. (PM Narendra Modi praises Thackeray government, Keshav Upadhyay criticizes the state government’s claim)
..ही तर राज्य सरकारची त्रिसूत्री!
‘स्वत:च उदोउदो करत फिरायचं., आगा ना पिछा बोलत रहायचं, अपयश आल की केंद्रावर ढकलायच, ही या राज्य सरकारची त्रिसूत्री, सर्वोच्च न्यायालयाची एक टिप्पणी कौतुक म्हणून मिरवायची आणि मुंबई हायकोर्ट जेव्हा म्हणते की जे नंदुरबारला जमले, ते मुंबईला का नाही? तेव्हा मूग गिळून गप्प बसायचं! कोरोना कमी झाला की आम्ही जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार आणि वाढला की जनतेचा निष्काळजीपणा! एकाच आयुष्यात सोंगं करायची तरी किती?’ असा उपरोधिक सवाल उपाध्ये यांनी ठाकरे सरकारला विचारलाय.
स्वःताच उदोउदो करत फिरायच, आगा ना पिछा बोलत रहायचं, अपयश आल की केंद्रावर ठकलायच ही या राज्य सरकारची त्रिसूत्री, सर्वोच्च न्यायालयाची एक टिप्पणी कौतुक म्हणून मिरवायची आणि मुंबई हायकोर्ट जेव्हा म्हणते की जे नंदुरबारला जमले, ते मुंबईला का नाही? तेव्हा मूग गिळून गप्प बसायचं!..२
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 9, 2021
‘प्रत्येक बाबतीत PR agency वापरू नका’
‘आता घरीबसल्या मामाचं पत्र हरवलं ते कुणाला सापडलं, या सारखं पंतप्रधानानी यांचं कौतुक केले, याचा नवा खेळ खेळला जातोय. मुंबई आणि महाराष्ट्राची आजची अवस्था पाहता ते कौतुक करतील, याची सुतराम शक्यता नाही आणि हे सांगतं कोण, तर मुख्यमंत्री कार्यालयाची प्रेसनोट! आता प्रत्येक बाबतीत PR agency वापरू नका, हेच तर देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या पत्रात म्हटले आहे, मग इतके झोंबले का? शिवसेनेचा संगत-गुण राष्ट्रवादीला लागला का कोण जाणे? पण टोपेंनी जालन्यात जास्त लस दिल्याबद्दल जो खुलासा मागितला, त्यावर जयंत पाटील यांनी बोलायला हवे होते’, असं आव्हान उपाध्ये यांनी जयंत पाटील यांना दिलंय.
‘वास्तव माहिती लपवून पंतप्रधानांकडून कौतुक करून घेतल्याच दावा करताना ’मनाचा आतला आवाज’ तरी मुख्यमंत्र्यांनी ऐकायला हवा. येथे बिचारे नितीन राऊत असो की पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात असो की अजून त्यांच्या पत्राचीही कुणी दखल घेत नाही तरी सचिन सावंत मात्र ‘बेगाने शादी में….’ नाचत राहतात. देवेंद्रजी फडणवीस यांच्या पत्राचा ‘लगता है निशाना सही जगह लगा है’, असा जोरदार टोलाही त्यांनी लगावला आहे.
संबंधित बातम्या :
‘पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राचं कौतुक केलं, पण फडणवीस टीका करतायत, मग योग्य कोण?’
कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी अपयशी आणि हतबल; राष्ट्रवादीचा हल्ला बोल
PM Narendra Modi praises Thackeray government, Keshav Upadhyay criticizes the state government’s claim