‘कर्नाटकात मराठी भाषिकांवर अन्याय, महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याचा डाव’ राष्ट्रवादी आक्रमक

देशाच्या प्रत्येक नागरिकाला कशापद्धतीने जगायचे हा मूलभूत अधिकार असताना यावर गदा आणण्याचे काम कर्नाटक सरकार करत असेल तर मराठी भाषिक जनता ते सहन करणार नाही. मराठी संस्था बंद करण्याचा प्रस्ताव त्यांनी तात्काळ स्थगित करावा, असं मलिक म्हणाले.

'कर्नाटकात मराठी भाषिकांवर अन्याय, महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याचा डाव' राष्ट्रवादी आक्रमक
बसवराज बोम्मई, नवाब मलिक
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 5:54 PM

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे. असं असताना आता कर्नाटक सरकारने (Karnataka Government) मराठी संस्था बंदीचा प्रस्ताव विधानसभेत मांडला आहे. हा प्रस्ताव तात्काळ मागे घ्यावा, अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केलीय. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कर्नाटकात मराठी भाषिकांवर मोठा अन्याय होत असल्याचा आरोपही केला आहे.

कर्नाटकात मराठी भाषिक नागरिकांवर अन्याय होत आहे. आता हा अन्याय मर्यादेपलीकडे जात आहे. भाषेवर प्रेम करणारे लोक देशभर असतात. कर्नाटक राज्यात मराठी भाषा आणि महाराष्ट्राला विरोध होत असताना आता यापलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबनाही करण्यात आली. या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री ही छोटी-मोठी घटना असल्याचे म्हणत आहेत. मात्र छत्रपती शिवाजी महाराज ही देशाची अस्मिता आहेत. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आपले वक्तव्य मागे घेऊन यावर तात्काळ माफी मागावी अशी मागणीही नवाब मलिक यांनी यावेळी केली आहे.

मूलभूत अधिकारांवर गदा आणण्याचं काम, मलिकांचा आरोप

कर्नाटकात मराठी नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाचा निषेध करत मलिक यांनी महाराष्ट्रात उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय व इतर लोकांच्या वेगवेगळ्या संघटना असल्याचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले. देशाच्या प्रत्येक नागरिकाला कशापद्धतीने जगायचे हा मूलभूत अधिकार असताना यावर गदा आणण्याचे काम कर्नाटक सरकार करत असेल तर मराठी भाषिक जनता ते सहन करणार नाही. मराठी संस्था बंद करण्याचा प्रस्ताव त्यांनी तात्काळ स्थगित करावा, असं मलिक म्हणाले.

समाजकंटकांकडून दुही माजवण्याचा प्रयत्न – बोम्मई

दरम्यान, बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर बेळगावसह राज्यातील वातावरण तापलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. यावर बोलताना बोम्मई म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीवीर सांगोळी रायण्णा आणि राणी चेनम्मा यांनी देशाच्या गौरवासाठी आणि रक्षणासाठी केलेलं कार्य महान आहे. दोघेही आमच्यासाठी आदर्शच आहे. आम्ही त्यांचा आदर करतो. त्यांच्या आदर्शावरच आमची वाटचाल सुरू आहे. त्यांचा आदर राखणं हे प्रत्येकाचं काम आहे. मात्र काही समाजकंटकांकडून वाद निर्माण केला जात आहे. भाषा आणि इतर मुद्द्यांवरून हे लोक फूट पाडत आहे.

इतर बातम्या :

नागपुरातील पराभव काँग्रेसच्या जिव्हारी! पटोले, राऊत, केदार यांना दिल्लीचं बोलावणं

Priyanka Gandhi: माझ्या मुलांचं Instagram हॅक केलं जातंय, सरकारकडे काही कामधंदा नाहीये का?; प्रियंका गांधी भडकल्या

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...