Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांची सलग तिसर्‍यांदा महाराष्ट्राच्या चाणक्यावर मात

Devendra Fadnavis : महाराष्ट्रात कधी नव्हे ती विकास कामे 2014 ते 2019 या कालखंडात झाली. त्यालाच पूर्णत्त्व प्राप्त होताना महाराष्ट्राने 2022 ते 2024 या कालखंडात पाहिले. विरोधक गुजरात, कर्नाटकचे गोडवे गात असताना देवेंद्र फडणवीस यांनी मात्र महाराष्ट्रात सर्वाधिक 52 टक्के गुंतवणूक आणत त्याला सडेतोड उत्तर दिले.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांची सलग तिसर्‍यांदा महाराष्ट्राच्या चाणक्यावर मात
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 1:11 PM

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. महायुतीची मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. त्यात भाजपने महाविजयाकडे कूच केलं आहे. महाराष्ट्रात भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती. आज मिळालेल्या यशाच श्रेय देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येतय. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राजकारणाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. त्यांनी सलग तीन वेळा भाजपाला सर्वाधिक जागा जिंकवल्या आहेत. सलग 3 वेळा भाजपाला शंभरीपार नेलय. 2014 मध्ये 123 तेव्हा ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. 2019 मध्ये 105 आणि 2024 मध्ये हा आकडा मागच्या दोन निवडणुकांपेक्षा जास्त असू शकतो. आजवर असा पराक्रम करणं महाराष्ट्रातल्या कोणत्याच नेत्याला जमलेलं नाही.

देवेंद्र फडणवीस एक समर्पित कार्यकर्ता आहे. 2014 ला मुख्यमंत्री होते, पण, 2019 ला उद्धव ठाकरेंनी कपटाने मुख्यमंत्रीपद हिसकावून घेतले. त्यांनी पक्षाला पुन्हा उभारी दिली. स्वत:तमधला एक आक्रमक विरोधी पक्षनेता महाराष्ट्राला दाखविला. पुन्हा समीकरणे जुळवून आणली. सरकार आणले. हे करताना केवळ पक्षाच्या आदेशावर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. पण, सरकारचे संपूर्ण दायित्त्व घेतलं.

त्या संधीच सोनं

लोकसभेतील दारुण पराभवानंतर अख्ख्या महाराष्ट्रातील कार्यकर्ता खचला होता. त्यावेळी केंद्रीय नेतृत्त्वाने जागावाटप ते प्रचारयंत्रणा संपूर्ण अधिकार फडणवीसांना बहाल केले आणि या संधीचे त्यांनी आज सोने करुन दाखविले.

एकटे देवेंद्र फडणवीस टार्गेट

या निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी आणि त्यांच्या संपूर्ण इकोसिस्टीमने एकट्या देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले होते, पण, महाराष्ट्र कुणासोबत होता, हे आजच्या निकालांनी दाखवून दिले.

इन्फ्रामॅन म्हणून असलेली ओळख

संयमी आणि कणखर नेतृत्त्व: शरद पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांनी सातत्याने टीका केली. पण, त्यांनी कायमच संयमाने उत्तर दिले आणि कधीही तोल ढळू दिला नाही. ही टीका अगदी कुटुंबापर्यंत गेली होती.तरुणाईमध्ये असलेली इन्फ्रामॅन म्हणून असलेली ओळख आणि त्यातून महाराष्ट्राला कशात अधिक रुची आहे, हे या निकालांनी दाखवून दिले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.