Maharashtra Election Results 2024 : मनसे खातं उघडणार? किती जागांवर आघाडीवर, कुठे मिळतोय दिलासा?

Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. मतमोजणी सुरु होऊन दीड तासापेक्षा जास्त वेळ झालाय. यंदाच्या निवडणुकीत मनसेचा परफॉर्मन्स कसा आहे? ते जाणून घ्या.

Maharashtra Election Results 2024 : मनसे खातं उघडणार? किती जागांवर आघाडीवर, कुठे मिळतोय दिलासा?
मनसे, राज ठाकरे
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 9:46 AM

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. आज मतमोजणी सुरु आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने मैदानात उतरली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात 49 सभा घेतल्या होत्या. मनसेने 130 पेक्षा जास्त जागांवर उमेदवार उभे केले होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेला अनुकूल वातावरण असं दिसत होतं. पण प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अशी स्थिती दिसत नाहीय.

मतमोजणी सुरु होऊन आता दीड तासापेक्षा जास्त वेळ झालाय. पण मनसेचा उमेदवार एकाही जागेवर आघाडीवर नाहीय. सुरुवातीला माहीम विधानसभा मतदारसंघात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी आघाडी घेतली होती. पण आता ते पिछाडीवर आहेत. शिवडीत काँटे की टक्कर सुरु आहे. बाळा नांदगावकर यांना अजूनपर्यंत अजय चौधरींची आघाडी मोडता आलेली नाहीय. ठाणे शहर या मतदारसंघातून मनसेला अपेक्षा होत्या. ठाणे शहरमधून जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव निवडणूक लढवत आहेत. पण भाजपचे संजय केळकर आघाडीवर आहेत.

मुंबईत भाजपच मोठा पक्ष

मुंबईत मनसेचा परिणाम दिसून येईल ही अपेक्षा फोल ठरली आहे. मुंबईत भाजपच मोठा पक्ष ठरलाय. त्यांचे उमेदवार 18 जागांवर आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गट 3 जागांवर आघाडीवर आहेत. काँग्रेस 4 आणि उद्धव ठाकरे गट 6 जागांवर आघाडीवर आहे.

बातमी लिहितानाचे अपडेट्स

Mahim Election Result 2024 : माहीममध्ये गणित बदललं, आता कोण आघाडीवर? माहीम विधानसभा मतदारसंघातून आता उद्धव ठाकरे गटाच्या महेश सावंत यांनी आघाडी घेतली आहे. मनसेच्या अमित ठाकरे आणि महेश सावंत यांच्या मतांमध्ये फार थोडा फरक आहे. अमित ठाकरे यांच्याकडे 2156 तर महेश सावंत यांना 2,270 मतं आहेत. सदा सरवणकर तिसऱ्या स्थानावर आहेत.

Shivdi Election Result 2024 : शिवडीत अजय चौधरी यांच्याकडे फार छोटी आघाडी

शिवडीतून अजय चौधरी फक्त 356 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्यासमोर मनसेच्या बाळा नांदगावकर यांचं आव्हान आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.