बाप-बेटा किंवा भाऊ, ‘एक घर एक तिकीट’ या धोरणाने दिग्गज अडचणीत?

भाजपचं एक घर एक तिकीट या धोरणामुळे काही मतदारसंघात चिन्ह बदलाचं तोरण बांधलं जाईल का? याची चर्चा रंगत आहे. शिंदेंचे मंत्री दीपक केसरकर कमळावर तर निलेश राणे यंदा धनुष्यबाणावर निवडणूक लढतील, अशा चर्चा रंगत आहेत.

बाप-बेटा किंवा भाऊ, 'एक घर एक तिकीट' या  धोरणाने दिग्गज अडचणीत?
Follow us
| Updated on: Oct 17, 2024 | 9:54 PM

निवडणुका जाहीर झाल्यानंतर उमेदवाऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. पण भाजपच्या एक घर, एक तिकीट धोरणाने अनेकांचा पत्ता कट होण्याची चर्चा रंगत आहे. दुसरीकडे कोकणात काही ठिकाणी चिन्हांची अदलाबदल करुन महायुती निवडणुकांना सामोरं जावू शकते. अहमनगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीचे आमदार आहेत. यंदाही भाजपकडून तेच उमेदवार असतील. पण त्यांचे पुत्र सुजय विखे काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांविरोधात संगमनेरमधून तयारी करत होते. तिकीटासाठी विखेंनी भाजपकडे प्रस्तावही ठेवला होता. मात्र एक घर एक तिकीट धोरणामुळे भाजपने सुजय विखेंना तिकीट नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे संगमनेर लोकसभेत थोरात विरुद्ध विखे लढत रंगण्याची चिन्हं मावळली आहेत.

दुसरी गोष्ट म्हणजे महायुतीच्या वाट्यात संगमनेरची जागा शिवसेना लढवत आल्यामुळे तिथे भाजप स्वतःचा उमेदवार देणार नसल्याचंही सांगितलं जातंय. 2019 ला संगमनेरमध्ये काँग्रेसच्या थोरातांनी अखंड शिवसेनेचे साहेबराव नवलेंवर 62 हजारानं जय मिळवला होता. नगर जिल्ह्यातून एकूण १२ आमदार निवडून जातात. 2019 ला नगरच्या 12 जागांपैकी सर्वाधिक म्हणजे 6 जागा राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. काँग्रेसकडे संगमनेर आणि श्रीरामपूर, नेवासात अपक्ष शंकरराव गडाख तर 3 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी ठरले होते. म्हणजे 2019 ला महायुती विरुद्ध महाआघाडी सामना 12 जागांवर 9 विरुद्ध 3 असा होता. पण 2023 ला अजित पवारांचा गट वेगळा होवून सत्तेत गेल्यामुळे सद्यस्थितीत मविआ 6 तर महायुतीकडे 6 अशी बरोबरीची स्थिती आहे.

नितेश राणे यांना बसू शकतो?

तिकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 3 विधानसभा मतदारसंघांपैकी 2 ठिकाणी चिन्हांचं अदलाबदल करुन उमेदवारीची चर्चा आहे. भाजपचे नितेश राणे आधीपासूनच कणकवलीमधून आमदार आहेत, त्यात यंदा निलेश राणेंनाही तिकीट दिल्यावर भाजपच्या एक घर, एक तिकीट धोरणाला धक्का लागू शकतो. त्यामुळे निलेश राणेंना कुडाळमधून शिंदेंची शिवसेना अर्थात धनुष्यबाणावर लढवलं जाण्याची शक्यता आहे. तर सावंतवाडीतून शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर धनुष्याऐवजी कमळ हाती घेवून लढण्याची चिन्हं आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी हे मतदारसंघ आहेत. यापैकी गेल्यावेळी शिवसेनेनं कुडाळ आणि सावंतवाडी या दोन तर भाजपनं कणकवलीची एक जागा लढवली होती. भाजपनं सिंधुदुर्गात ३ पैकी २ जागांचा आग्रह धरल्याची कणकवली आणि सावंतवाडीतले उमेदवार कमळावर असण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.