नातूच आजोबांचा विचार पाळत नसेल तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी का पाळावा? नितेश राणेंचा रोहित पवारांना खोचक टोला
माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्यानंतर आता आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी रोहित पवारांना टोला लगावलाय. तसंच अजित पवार यांना नारायण राणेंवर केलेल्या टीकेलाही नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
सिंधुदुर्ग : राज्यातील पूरस्थिती आणि नेतेमंडळींचे पाहणी दौरे यावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्या भागाशी संबंध नसलेल्या नेत्यांनी दौरे टाळण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. रोहित पवारांच्या या दौऱ्यावरुन आता विरोधक त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवताना पाहायला मिळत आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्यानंतर आता आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी रोहित पवारांना टोला लगावलाय. तसंच अजित पवार यांना नारायण राणेंवर केलेल्या टीकेलाही नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. (Nitesh Rane criticizes Rohit Pawar’s visit to flood-hit areas)
रोहित पवारांना टोला
सातत्याने पवार कुटुंबात विसंगती दिसते. अवेळी बोलणं, जास्त बोलणं हे कधीच पवार कुटुंबीय करत नाही. पार्थ पवार ,सुप्रिया सुळे अस बोलताना कधी दिसले नाहीत. रोहीत पवारांनी आपल्या आजोबांकडून योग्य गोष्टी शिकल्या पाहिजेत. त्यांचं ऐकलं पाहिजे. नातूच आजोबांचा विचार पाळत नसेल तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी का पाळावे असा प्रश्न सगळ्यांच्या समोर येतो. म्हणून रोहीतजींनी थोडं शिकून मगच पावलं टाकावीत असा माझा मैत्रीचा सल्ला आहे, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.
अजित पवारांवर जोरदार टीका
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या खालच्या भाषेतील टीकेवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर आता भाजप आमदार आणि नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणे यांनी अजित पवारांवर जहरी टीका केली. “कुठली भाषा वापरावी हे अजितदादांनी सांगावं हे म्हणजे राज कुंद्रांनी कुठला चित्रपट बघावा असं सांगण्यासारखं आहे. म्हणून भाषेबद्दल अजितदादांनी बोलू नये”, अशी टीका नितेश राणेंनी केली. ते सिंधुदुर्गात बोलत होते.
मनसे- भाजप युतीबाबत नितेश राणे काय म्हणाले?
माझं मत विचारण्यापेक्षा आमचे पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात हे महत्वाचं आहे. देवेंद्रजीनी अतिशय स्पष्ट भूमिका मांडलेली आहे.राज ठाकरे हे चांगले नेते असेल तरी मनसे ची भूमिका आणि आयडोलोजी एकसारखी नाही आहे.उत्तर भारतीय आणि बिहारींबद्दल घेतलेली भूमिका बदलत नाही तोपर्यंत भाजपा ने त्यांच्याबद्दल विचार करण्याचा प्रश्नच नाही.
Big News: मेडिकल अभ्यासक्रमात OBC आणि EWS आरक्षण लागू, मोदी सरकारचं मोठं पाऊलhttps://t.co/mND7f22f5L#OBC | #EWS | #ModiGovernment | #MedicalCourses
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 29, 2021
संबंधित बातम्या :
मुख्यमंत्री कोयनेला पोहोचू शकत नाहीत, दिल्लीला काय पोहोचणार, संदीप देशपांडेंकडून खिल्ली
Nitesh Rane criticizes Rohit Pawar’s visit to flood-hit areas