Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : बंडखोर शिंदे गटाचा आपोआप गेम होणार? तरीही भाजपच्या बाजूनं असेल बहुमताचा आकडा? समजून घ्या नंबरगेम

Eknath Shinde : राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आता नंबर गेमचा खेळ सुरू झाला आहे. शिवसेनेकडे 55 आमदार आहेत. त्यातील 39 आमदारांनी बंड केलं आहे.

Eknath Shinde : बंडखोर शिंदे गटाचा आपोआप गेम होणार? तरीही भाजपच्या बाजूनं असेल बहुमताचा आकडा? समजून घ्या नंबरगेम
बंडखोर शिंदे गटाचा आपोआप गेम होणार? तरीही भाजपच्या बाजूनं होणार बहुमताचा आकडा? समजून घ्या नंबरगेम Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 2:12 PM

मुंबई: गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रावर राजकीय अस्थिरतेचे ढग जमले आहेत. त्यातच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे ठाकरे सरकारवरील संकट अधिक गडद झालं आहे. उद्या 30 जून रोजी सकाळी 11 वाजता बहुमत चाचणी होणार आहे. ही प्रक्रिया उद्या संध्याकाळी 5 वाजपर्यंत सुरू राहणार आहे. राज्यपालांच्या निर्णयाला स्थगिती मिळावी म्हणून शिवसेना कोर्टात गेला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या बाजूने निर्णय येतो की उद्या आघाडीला बहुमत सिद्ध करावे लागते हे पाहावं लागणार आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती चांगली नाही. शिवसेनेच्या 39 आमदारांनी आघाडीतून (maha vikas aghadi) बाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे. तर सात अपक्ष आमदारांनी पत्रं लिहून सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचं जाहीर केलं आहे, अशी माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली आहे.

राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आता नंबर गेमचा खेळ सुरू झाला आहे. शिवसेनेकडे 55 आमदार आहेत. त्यातील 39 आमदारांनी बंड केलं आहे. हे सर्व आमदार गेल्या आठवड्यापासून गुवाहाटीला तळ ठोकून आहेत. तसेच ठाकरे सरकारमधील दोन आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच राष्ट्रवादीचे दोन आमदार तुरुंगात आहेत. म्हणजे 43 आमदार आघाडीच्या हातून निघून गेले आहेत. तसेच प्रहारचे दोन आमदार आणि इतर 7 अपक्ष आमदारांनीही शिंदे गटाला समर्थन दिलं आहे. त्यामुळे एकूण 50 आमदारांची आघाडीला कमतरता भासणार आहे.

हे सुद्धा वाचा

प्लॅन काय?

दुसरीकडे शिवसेनेने 16 आमदारांना अपात्रं ठरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शिंदे गटाने तांत्रिक कारणं पुढे देत शिवसेनेची कृती चुकीची आहे असं म्हटलं असलं तरी बंडखोरांसाठी वाटतो तितका मार्ग सोपा राहिलेला नाही. हे प्रकरण कोर्टात असल्याने कोर्ट काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिंदे गटाकडे शिवसेनेचे 39 आमदार आहेत. म्हणजे शिंदे गटाकडे दोन तृतियांश मते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे वेगळा गट स्थापन करून हे लोक भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आकडे काय सांगतात

महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण 288 आमदार आहेत. त्यापैकी शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्याने हा आकडा 287 झाला आहे. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी 144 आमदारांची गरज आहे. राष्ट्रवादीकडे 53 आमदार आहेत. काँग्रेसकडे 44 आमदार आहेत. शिवसेनेकडे 55 आमदार आहेत. तिन्ही पक्षाच्या एकूण आमदारांची संख्या 152 होते. त्याशिवाय महाविकास आघाडीला बच्चू कडू यांच्या दोन आमदारांनी आणि इतर अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. म्हणजे आघाडीला बविआच्या 3, सपाच्या दोन, पीजेपीच्या दोन आणि पीडब्लूपीच्या एका आणि 8 अपक्षांचा पाठिंबा आहे. मात्र, आता खेळ बिघडला आहे. कारण शिवसेनेच्या 39 आमदारांनी बंड केलं आहे. तर आघाडीच्या सर्व अपक्षांनी आणि प्रहारच्या दोन आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेकडे केवळ 16 आमदार उरले आहेत.

भाजपकडे मॅजिक फिगर

दुसरीकडे भाजपकडे 106 आमदार आहेत. त्यांना सात अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपचा आकडा 113 झाला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी 144 आमदार हवे आहेत. शिंदे गटाकडे 39 आमदार आहेत. हे आमदार उद्या मतदानात सहभागी नाही झाल्यास बहुमतासाठीचा आकडा 121 होईल. अशावेळी भाजपकडे 113 आमदार आहेत. त्यांच्यासोबत 16 अपक्ष आणि इतर आमदारही आहेत. त्यामुळे भाजपचं संख्याबळ 129 वर पोहोचेल. तर 113 आमदाराच हाती असल्याने आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करता येणार नाही.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.