Maharashtra Governor vs Thackeray Government LIVE : ‘विमान उपलब्ध नसल्याची माहिती एक दिवस आधीच दिली’, मुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण
Bhagat Singh Koshyari vs CM Uddhav Thackeray LIVE Updates : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी नाकारल्याचं समोर आलं आहे. भाजप नेत्यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीवर टीका सुरुवात केली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी नाकारल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्टीकरण दिलं आहे. “राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्याअगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक नाही”, असं राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली होती. (Maharashtra Governor vs Thackeray Government LIVE)
राज्यपालांना विमान नाकारणं हा प्रकार दुर्दैवी आहे. कुणाच्या मालकीची ही मालमत्ता नाही. माझ्या माहितीप्रमाणे जीएडीला पत्र दिलं होतं. तसंच मुख्यमंत्री कार्यालयाकडे हे पत्र पोहोचलं होतं पण तरीही परवानगी नाकारली. महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात एवढं इगो असलेलं सरकार मी पाहिलं नव्हतं. आपण कुणाचा अपमान करतोय, हे कळालं पाहिजे. राज्यपाल हे संविधानिक पद आहे, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली.
LIVE NEWS & UPDATES
-
देशाच्या कण्यावर घाव घालण्याचा प्रयत्न : राहुल गांधी
फक्त 4 लोक देश चालवत आहेत. कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. शेतकरी, कामगार हा देशाचा कणा, मात्र देशाच्या कण्यावर घाव घालण्याचा प्रयत्न : राहुल गांधी
-
राजभवनाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करत राज्यपालांची बाजू स्पष्ट
राजभवनाकडून एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये राज्यपालांची बाजू सविस्तरपणे मांडण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही आपली बाजू स्पष्ट करणारे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे
राजभवन की मुख्यमंत्री कार्यालय, कुणाचा दावा काय, कोण खरं कोण खोटं? https://t.co/uERFEY83Cd @CMOMaharashtra #bhagatsinghkoshyari @ShivsenaComms @BJP4Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 11, 2021
-
-
हा राज्यपालांचा अवमान : सुधीर मुनगंटीवार
“अशी कोणतीही माहिती राज्यपालांना देण्यात आली नाही. 2 फेब्रुवारीला राज्यपालांच्या प्रवासाबाबत पत्राद्वारे माहिती देण्यात आली. दोन प्रवासांना परवानगी देण्यात आली. तर दुसऱ्या प्रवासाला नंतर सांगू, असं पत्राद्वारे सांगितलं. त्यानंतर तुम्ही ती परवानगी काल रात्री नाकारता? हा राज्यपालांचा अवमान आहे. राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक शासन प्रमुख आहेत. शासन प्रमुखांचा अशाप्रकारे अनादर करणं, योग्य नाही. ज्या राज्यपालांनी तुम्हाला शपथ दिली. त्यांच्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री आहात”, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
-
‘विमान उपलब्ध नसल्याची माहिती एक दिवस आधीच दिली’, मुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण
मुख्यमंत्री कार्यालयाकडून नेमकं स्पष्टीकरण काय?
“राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्याअगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक नाही”, असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.
“राजभवनाने राज्यपाल महोदयांना विमान घेऊन जाण्यास मान्यता देण्याविषयी राज्य शासनास विनंती केली होती. शासकीय विमान घेऊन जाण्यापूर्वी नियमानुसार परवानगी मागितली जाते. मान्यता मिळाल्यानंतरच विमान उपलब्ध केले जाते असा प्रघात आहे. यानुसार काल म्हणजे बुधवार दिनांक 10 फेब्रुवारीस मुख्यमंत्री सचिवालयातून विमान वापराबाबत अद्याप मान्यता दिलेली नसल्याचा निरोप देण्यात आला होता. ही मान्यता मिळाल्यानंतरच राजभवन सचिवालयाने राज्यपाल महोदयांच्या विमान प्रवासाबाबत नियोजन करून त्यांना विमानतळावर आणणे अपेक्षित होते. मात्र राजभवनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मान्यतेविषयी कुठलीही खात्री करून न घेतल्याने राज्यपाल महोदयांना शासकीय विमानाने इच्छित स्थळी जाता आले नाही”, असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
“वस्तूत: राज्यपालांसारख्या महनीय पदावरील व्यक्तींच्या बाबतीत राजभवन सचिवालयाने पुरेशी काळजी घेणे अपेक्षित होते, ते झाले नसल्याने या प्रकाराबाबत शासनाने देखील गंभीर दखल घेतली असून राजभवनातील संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत”, असं मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आलं आहे.
-
हा पक्षाचा नाही तर पदाचा अवमान आहे – गिरीष महाजन
हा पक्षाचा नाही तर पदाचा अवमान आहे, राज्याच्या सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीला तुम्ही बसवून ठेवता मग सांगता की तुम्ही उड्डाण घेऊ शकत नाही, जर हा अपमान नसेल वाटत विरोधी पक्षाला तर राज्यपाल यावर निर्णय घेतील
-
-
राज्यपालांना विमान नाकारणं हा राज्य सरकारचा कद्रुपणा : चंद्रकांतपाटील
राज्यपालांना विमान नाकारणं हा राज्य सरकारचा कद्रुपणा आहे. राज्यपाल हे एक घटनात्मक पद आहे. त्यांच्या पदाचा मान लक्षात ठेऊन तरी सरकारने वागायला हवं पण सरकार अहंकाराने आणि गर्वाने वागतंय, हे चांगली गोष्ट नव्हे, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.
-
राज्य सरकारला राज्यपालांच्या उड्डाणाला नाकारण्याचा अधिकार नाही – गिरीष महाजन
राज्यपाल हे पद राज्यात सर्वात मोठं आहे, ते मुख्यमंत्री, मंत्री मंडळाची नेमणूक करतात, अशा पदावर असताना त्यांना सरकारी कामासाठी जात असताना, राज्य सरकारला त्यांच्या उड्डाणाला नाकारण्याचा अधिकार नाही
-
नियमाचं पालन करणं हा अहंकार आहे का? : संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
उद्धव ठाकरेंच्या जागी कोणीही मुख्यमंत्री असतं, तरी त्यांनी तेच केलं असतं, अहंकार हा शब्द कोण कोणास उद्देशून म्हणाले? नियमाचं पालन करणं हा अहंकार आहे का? : संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
उद्धव ठाकरेंच्या जागी कोणीही मुख्यमंत्री असतं, तरी त्यांनी तेच केलं असतं, अहंकार हा शब्द कोण कोणास उद्देशून म्हणाले? नियमाचं पालन करणं हा अहंकार आहे का? : संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला https://t.co/XSP3nAbmmw #SanjayRaut | #Bhagatsinghkoshyari | @rautsanjay61 pic.twitter.com/oBXGM6Har8
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 11, 2021
-
राज्यपालांचा अपमान करणारं कोणतंही काम मुख्यमंत्री किंवा राज्य सरकारने केलं नाही – संजय राऊत
कोश्यारींना भाजपने एखादं खासगी विमान द्यायला हवं होतं, राज्यपालांचा अपमान करणारं कोणतंही काम मुख्यमंत्री किंवा राज्य सरकारने केलं नाही, खासगी कामासाठी सरकारी विमान वापरण्याबाबत नियम आहेत : संजय राऊत
कोश्यारींना भाजपने एखादं खासगी विमान द्यायला हवं होतं, राज्यपालांचा अपमान करणारं कोणतंही काम मुख्यमंत्री किंवा राज्य सरकारने केलं नाही, खासगी कामासाठी सरकारी विमान वापरण्याबाबत नियम आहेत : संजय राऊत https://t.co/atVRNYeisi #SanjayRaut | #Bhagatsinghkoshyari | @rautsanjay61 pic.twitter.com/sINnczWCxn
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 11, 2021
-
राज्यपालांबाबत आम्हाला आदर, परवानगी का नाकारली, याची माहिती घ्यावी लागेल : राज्यमंत्री बच्चू कडू
राज्याच्या राज्यपालांबाबत आम्हाला आदर आहे. त्यांना हवाई परवानगी का नाकारली याची माहिती घ्यावी लागेल. माहिती घेऊन बोलतो, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.
-
आपण कुणाचा अपमान करतोय, हे कळालं पाहिजे, हे इगो असलेलं सरकार, फडणवीसांचा हल्लाबोल
राज्यपालांना विमान नाकारणं हा प्रकार दुर्दैवी आहे. कुणाच्या मालकीची ही मालमत्ता नाही. माझ्या माहितीप्रमाणे जीएडीला पत्र दिलं होतं. तसंच मुख्यमंत्री कार्यालयाकडे हे पत्र पोहोचलं होतं पण तरीही परवानगी नाकारली. महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात एवढं इगो असलेलं सरकार मी पाहिलं नव्हतं. आपण कुणाचा अपमान करतोय, हे कळालं पाहिजे. राज्यपाल हे संविधानिक पद आहे, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली.
-
ही तांत्रिक गोष्ट, लगोलग प्रतिक्रिया देणं घाईचं : माणिकराव ठाकरे
ही तांत्रिक गोष्ट, लगोलग प्रतिक्रिया देणं घाईचं ठरेल. माहिती घेऊन यावर बोलणंं उचित ठरेल
-
राज्यपालांना हवाई प्रवास नाकारल्याची घटना मला माहिती नाही : अजित पवार
मला याबाबत काहीच माहिती नाही. आता तुमच्याशी बोलल्यानंतर मला ही घटना कळलीय. माहिती घेऊन या घटनेवर बोलेन, असं अजित पवार राज्यपालांच्या विमानप्रवासाबाबत म्हणाले.
-
परवानगी नसताना तांत्रिकदृष्ट्या प्रवास करणे योग्य नाही : शिवसेना खासदार विनायक राऊत
राज्यपालांना अद्यापही महाराष्ट्र सरकारच्या विमान वापरण्याची परवानगी दिली नव्हती. त्यांनी परवानगी मागितली होती. पण ते विमान उड्डाणास सक्षम आहे की नाही यासंदर्भात पुरेपूर माहिती नव्हती. त्यामुळे कदाचित परवानगी दिली नसेल. परवानगी नसताना तांत्रिकदृष्ट्या प्रवास करणे योग्य नाही. मी अधिक माहिती नक्की घेईन. आम्ही महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांचा नेहमीच आदर केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांचा आदर केला आहे, त्यांचा अवमान कदापिही होणार नाही, असं शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले.
-
राज्यपालांना हवाई परवानगी नाकारुन ठाकरे सरकारनं सूडभावनेचा अतिरेक केला : प्रवीण दरेकर
राजकारणातील मतभेद समजू शकतो, राज्यपाल घटनात्मक पद आहे. राज्य सरकारनं अतिरेक केला आहे. सूड भावना त्यांच्यामध्ये किती भरलीय हे स्पष्ट होत आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये केंद्राकडे बोट दाखवायचं. त्यांचं अपयश लोकांपुढे जाऊ नये यासाठी वाद निर्माण करायचा त्यावर लोकांचं लक्ष वळवायचं असा या सरकारचा कार्यक्रम आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
-
राज्यपालांना विमानातून उतरवलं, जनता तुम्हाला सत्तेतून खाली खेचेल : सुधीर मुनगंटीवार
राज्यपालांना विमानातून उतरवण्यातं आलं, जनता सरकारला सत्तेतून उतरवेल, अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. इतकंच नाही तर राज्यपालांची सरकारनं क्षमा मागावी, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली.
Published On - Feb 11,2021 5:59 PM