Bhagatsingh Koshyari : राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना आज डिस्चार्ज मिळणार! डिस्चार्जनंतर थेट राजभवनात जाणार, ठाकरेंचं सरकार पडणार?

Eknath Shinde vs Shiv sena : सत्ता स्थापनेच्या अनुशंगाने महत्त्वपूर्ण चर्चा आणि वाटाघाटींवर बैठक सत्र शिंदे गटाकडूनही सुरु आहे.

Bhagatsingh Koshyari : राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना आज डिस्चार्ज मिळणार! डिस्चार्जनंतर थेट राजभवनात जाणार, ठाकरेंचं सरकार पडणार?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारीImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 7:16 AM

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांची प्रकृती आता बरी झाली असल्यानं त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात येणार आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना मुंबईच्या (Mumbai Political Updates) रिलाईन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, आता त्यांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता भगतसिंह कोश्यारी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल. त्यानंतर ते थेट राजभवनात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांची (Maharashtra Governor) भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु असल्यामुळे सत्तास्थापनेच्या तांत्रिक बाबींना आत वेग येईल, असं सांगितलं जातंय. आता राजभवन हे राजकारण केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे गट भाजपसोबत जात राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.

गुप्त गाठीभेटी..

एकीकडे शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक शनिवारी पार पडली. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वडोदरा इथं बैठक झाल्याचं वृत्तही समोर आलंय. शुक्रवारी रात्री गुप्तपणे ही बैठक पार पडली. त्यामुळे सत्ता स्थापनेच्या अनुशंगाने महत्त्वपूर्ण चर्चा आणि वाटाघाटींवर बैठक सत्र शिंदे गटाकडूनही सुरु आहे.

देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा मुंबईतील सागर या बंगल्यावर परतले आहेत. तर एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांचा गुवाहाटीच्या हॉटेल रेडिसन ब्लूमधील मुक्काम वाढवण्यात आला आहे. आता 30 जूनपर्यंत गुवाहाटीमध्ये बंडखोर आमदार मुक्काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे. कायदेशीर बाबींची पडताळणी केली जात असल्याचं बंडखोरांचा मुक्का वाढवण्यात आल्याचं सांगितलं जातंय.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

शिवसेनेची काय भूमिका?

एकनाथ शिंदे गटाचा निर्णय झाल्यानंतर शिवसेना काय तो निर्णय घेईल, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. भाजपसोबतच युती करण्यात शिवसेनेचं हित आहे, असं शिंदेंच्या बंडखोर गटातील आमदार दीपक केसरकर यांनी म्हटलंय. तर संपूर्ण राज्यात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे समर्थक असा संघर्ष सुरु झालाय. जागोजागी पोस्टर, बॅनर शिंदे आणि ठाकरे यांच्या समर्थकांनी लावले आहेत. तर राज्यात अनेक ठिकाणी ठाकरेंच्या समर्थकांनी वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शनं केली आहे. तर बंडखोर आमदारांची कार्यलयं फोडण्याचेही प्रकार घडले.

वाचा एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना या राजकीय भूकंपाचे लाईव्ह अपडेट्स : Eknath Shinde vs Shiv sena Live

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.