Maharashtra Politics : मोठी बातमी! राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, उद्या सकाळी 11 वा. बहुमत चाचणी
Maharashtra Political News : बहुमत सिद्ध करा, या आशयाचं हे पत्र आहे. काल रात्रीच हे पत्र पाठवण्यात आलं आहे. राज्यपालांनी हे पत्र पाठवल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जावं लागेल.
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. बहुमत सिद्ध करा, या आशयाचं हे पत्र आहे. काल रात्रीच हे पत्र पाठवण्यात आलं होतं. राज्यपालांनी हे पत्र पाठवल्यानंतर आता महाविकास आघाडी (Maharashtra Politics News Today) सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जावं लागेल. बहुमत सिद्ध करण्याच्या उद्देशानं हे पत्र पाठवण्यत आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लवकर आता विशेष अधिवेशन लावलं जाण्याची शक्यता आहे. 39 आमदारांनी पाठिंबा काढल्यानं सरकार अल्पमतात आल्याची माहिती राज्यपालांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली होती. मात्र आता सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. नेमकी ही बहुमत चाचणी कधी होणार, हे देखील स्पष्ट करण्यात आलंय. उद्या (30 जून) ही बहुमत चाचणी पार पडेल.
शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी 21 जूनला बंडखोरी केली होती. त्यानंतर त्यांना शिवसेनेतल्या आमदारांचा पाठिंबा वाढत गेला. गुवाहाटीतमध्ये असलेल्या एकनाथ शिंदे गटाकडे एकूण 39 आमदारांचा पाठिंबा आहे. या आमदारांनी उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत सरकार करण्यासाठी हाक दिली होती. तर महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची आग्रही मागणी केली होती. आज या बंडाचा नववा दिवस आहे. या बंडाच्या आठव्या दिवशी म्हणजेच काल, देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांनी रात्री उशिरा भेट घेतली होती. सरकार अल्पमतात असल्याची माहिती त्यांनी राज्यपाल यांनी प्रत्यक्ष भेटून दिली होती. त्यामुळे राज्यपालांनी याबाबत योग्य तो निर्णय़ घ्यावा आणि सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावं, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
उद्या एकनाथ शिंदे मुंबईत जाणार
दरम्यान, गुवाहाटी येथे बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्या मुंबईला पोहोचणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे आता उद्याच बहुमत चाचणीला महाविकास आघाडी सरकराला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी विशेष अधिवेशन बोललं जाईल आणि त्यानंतर आता उद्याच बहुमत चाचणी होणार असल्याचं स्पष्ट झालंय. गुवाहाटीच कामाक्षी देवीच्या मंदिरासाठी गेले असता ते माध्यमांशी बोलत होते.
राज्यपालांनी लिहिलेल्या पत्रात काय?
- उद्या 11 वाजता विशेष अधिवेशन बोलवावं आणि त्यानंतर अधिवेशनाची कारवाई 5 वाजेपर्यंत पूर्ण केलं जावं
- अधिवेशनाच्या बहुमत चाचणीचं थेट प्रक्षेपण केलं जावं
- अधिवेशनावेळी जीवाला धोका असलेल्या सर्व बंडखोर आमदारांना सुरक्षा पुरवली जावी
महाविकास आघाडी कोर्टात जाणार?
दरम्यान, आता कोर्टात काही गोष्टी असताना, विशेष अधिवेशन बोलवण्यात आलंय. त्यामुळे महाविकास आघाडी आता सुप्रीम कोर्टात याप्रकरणी दाद मागण्याची शक्यता आहे. कारण विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव असल्यानं नेमकं काय घडतं, हे पाहणं महत्त्वाचंय.
आमदाराचं नाव | मतदारसंघ | |
---|---|---|
1 | एकनाथ शिंदे | कोपरी-पाचपाखाडी |
2 | भरत गोगावले | महाड |
3 | उदय सामंत | रत्नागिरी |
4 | संदीपान भुमरे | पैठण |
5 | गुलाबराव पाटील | जळगाव ग्रामीण |
6 | दादा भुसे | मालेगाव बाह्य |
7 | अब्दुल सत्तार | सिल्लोड |
8 | दीपक केसरकर | सावंतवाडी |
9 | शहाजी पाटील | सांगोला |
10 | शंभुराज देसाई | पाटण |
11 | अनिल बाबर | खानापूर |
12 | तानाजी सावंत | परांडा |
13 | चिमणराव पाटील | एरंडोल |
14 | प्रकाश सुर्वे | मागाठाणे |
15 | विश्वनाथ भोईर | कल्याण पश्चिम |
16 | संजय गायकवाड | बुलडाणा |
17 | प्रताप सरनाईक | माजीवडा |
18 | महेंद्र दळवी | अलिबाग |
19 | महेंद्र थोरवे | कर्जत |
20 | प्रदीप जयस्वाल | औरंगाबाद मध्य |
21 | ज्ञानराज चौगुले | उमरगा |
22 | श्रीनिवास वनगा | पालघर |
23 | संजय रायमूलकर | मेहेकर |
24 | बालाजी कल्याणकर | नांदेड उत्तर |
25 | शांताराम मोरे | भिवंडी ग्रामीण |
26 | संजय शिरसाट | औरंगाबाद पश्चिम |
27 | प्रकाश आबिटकर | राधानगरी |
28 | योगेश कदम | दापोली |
29 | सदा सरवणकर | माहिम |
30 | मंगेश कुडाळकर | कुर्ला |
31 | यामिनी जाधव | भायखळा |
32 | लता सोनावणे | चोपडा |
33 | किशोरी पाटील | पाचोरा |
34 | रमेश बोरनारे | वैजापूर |
35 | सुहास कांदे | नांदगाव |
36 | बालाजी किणीकर | अंबरनाथ |
37 | दिलीप लांडे | चांदिवली |
38 | आशिष जयस्वाल | रामटेक |
39 | महेश शिंदे | कोरेगाव |