ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या; आता सेटिंग्ज सुरू
गेल्या आठ दिवसांपासून धडाडणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोफा आज थंडावल्या. (maharashtra Gram Panchayat Elections Campaigning End Today)
पुणे: गेल्या आठ दिवसांपासून धडाडणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोफा आज थंडावल्या. येत्या 15 जानेवारी रोजी आता मतदान होणार असल्याने जास्तीत जास्त मतदान मिळवण्यासाठी आता उमेदवारांनी सेटिंग्ज सुरू केली आहे. त्यात त्यांना कितपत यश मिळतं हे निवडणूक निकालानंतरच समजेल. (maharashtra Gram Panchayat Elections Campaigning End Today)
कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच राज्यात 34 जिल्ह्यांमधील 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून या निवडणुकीचा प्रत्येक उमेदवाराने जोरदार प्रचार केला. अनेक ठिकाणी पॅनेल उभे करून उमेदवारांनी प्रचारात रंग भरला. ग्रामपंचायतीचा मतदारसंघ अत्यंत छोटा असल्याने बहुतेक उमदेवारांनी घरोघरी जाऊन भेटीगाठी घेण्यावरच भर दिला. तर काहींनी शक्तीप्रदर्शन करून गावात आपलीच वट असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला. काही उमदेवारांनी तर शेतात राहणाऱ्या मतदारांची त्यांच्या शेतात जाऊन भेट घेऊन आपल्यालाच मतदान करण्याचा आग्रही केला. गुलालाची उधळण करत मिरवणुका काढण्यावरही यावेळी भर देण्यात आला. काहींनी ट्रॅक्टरवर उभं राहून प्रचार केला. काहींनी बैलगाडीतून प्रचार केला, तर काहींनी पदयात्रेवर भर दिला.
अनेक उमेदवारांनी पत्नी आणि मुलीला प्रचारात उतरवून महिला मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. निवडून आल्यावर गावचा विकास कसा करणार? गावात कशा समस्या आहेत आणि जुन्या सदस्यांनी काम कसं केलं नाही हे अनेक उमेदवार मतदारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तर उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेण्यावर भर दिला. अनेकांनी भावकीतल्या लोकांची भेट घेऊन मतदान करण्याचीही विनंती केली. आता प्रचार संपल्याने आजपासून उद्या रात्री उशिरापर्यंत गावातील गट, मंडळ आणि तरुणांना आपल्याकडे खेचण्यासाठी सेटिंग्ज सुरू होणार आहे. त्यात या उमेदवारांना कितपत यश आलंय हे निकालाच्या दिवशीच समजून येणार आहे. येत्या 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. तर, 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे.
निकाला आधीच निकाल
राज्यात 34 जिल्ह्यांमधील 14 हजार 234 ग्रामपंचायती आहेत. त्यातील अनेक ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोधही झाली आहे. त्यामुळे उरलेल्या ग्रामपंचायतीचा निकाल काय लागतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
>> जळगाव जिल्ह्यात एकूण 1125 ग्रामपंचायत आहेत. त्यापैकी 783 ग्रामपंचायतींची निवडणूक होत. आतापर्यंत 92 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून यात 2003 सदस्य हे बिनविरोध निवडून आले आहेत.
>> गोंदियात एकूण 189 ग्रामपंचायती आहेत. त्यातील 7 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून एका ग्रामपंचायतीने निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.
>> बुलडाण्यात 27 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. (maharashtra Gram Panchayat Elections Campaigning End Today)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 12 January 2021https://t.co/JKSA16Wy2X#MahafastNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 12, 2021
संबंधित बातम्या:
मुदतबाह्य 1566 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली, तर 12,668 ग्रामपंचायत निवडणुकांना स्थगिती
तुमच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर
ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजलं, अर्ज भरण्यास सुरुवात, यंदा महत्त्वाचे दोन बदल कोणते?
ग्रामपंचायत निवडणूक लढवायची आहे? मग तुम्हाला ‘या’ अर्जाची पोचपावती गरजेची
(maharashtra Gram Panchayat Elections Campaigning End Today)