48 प्रवासी घेऊन जाणारी बस कर्नाटक सीमेवर रोखली, सीमाप्रश्न पेटला, 2 राज्यांतील बस सेवा विस्कळीत, काय Updates?

शुक्रवारी शिवसेनेच्या ठाकरे गटाने सातारा बस स्थानकात आंदोलन करत कर्नाटक आगाराच्या बसेसवर 'जय महाराष्ट्र' लिहून निषेध केला .

48 प्रवासी घेऊन जाणारी बस कर्नाटक सीमेवर रोखली, सीमाप्रश्न पेटला,  2 राज्यांतील बस सेवा  विस्कळीत, काय Updates?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 26, 2022 | 12:29 PM

शंकर देवकुळे, सांगलीः महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाचा (Maharashtra Karnataka Border issue) वाद चांगलाच उफाळून आलेला दिसतोय. आज अहमदनगरहून गाणगापूरकडे जाणाऱी एक बस सकाळीच रोखण्यात आली. बसमध्ये 48 प्रवासी होते. मात्र कर्नाटकच्या सीमेवर बसला थांबवण्यात आलं. यामुळे अनेक प्रवाशांचा ताटकळत बसावं लागलं. दोन्ही राज्यांतून येणाऱ्या-जाणाऱ्या बस (ST Bus) सेवा काही काळ विस्कळीत झाली होती. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी सांगली, सोलापुरातील काही भागांवर दावा सांगितल्यामुळे महाराष्ट्रातील विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत.

या मुद्द्यावरून वाढती आंदोलनं लक्षात घेता महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी तसेच कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी एसटी बसची सेवा तूर्तास बंद करण्यात आली होती. सांगली, सोलापूर, कोल्हापूरातील सीमांवरील स्थिती पाहता बससेवा काही काळ विस्कळीत राहण्याची शक्यता आहे.  दोन्ही राज्यांतील तणावाचं वातावरण निवळेपर्यंत बससेवा विस्कळीत राहिल, अशी माहिती राज्य परिवहन अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आली आहे.

काल मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे काही अज्ञातांनी एका बसवर दगडफेक केली होती. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर कर्नाटकने दावा सांगितलत्यामुळे दौंड येथे निषेध व्यक्त करण्यात आला. तेथे कर्नाटकच्या बसला काळे फासण्यात आले. तर कर्नाटकातील कलबुर्गी येथेही बसला काळे फासले गेले.

महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कर्नाटक पोलिसांकडून महाराष्ट्र शासनाच्या बसेस शुक्रवारी संध्याकाळी काही काळ अडवण्यात आल्या. सोलापूरहून गाणगापूरला निघालेल्या महाराष्ट्र शासनाची एसटी बस अडवण्यात आली. अक्कलकोट तालुक्यातील सिन्नूर या गावी बसेस अडविल्यात आल्या. मात्र काही काळाने बसेस सोडल्या. कोल्हापुरातील घटनांतर कर्नाटक अलर्ट मोडवर आले आहे.

शुक्रवारी शिवसेनेच्या ठाकरे गटाने सातारा बस स्थानकात आंदोलन करत कर्नाटक आगाराच्या बसेसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून निषेध केला .. सातारा बस स्थानक परिसरात कर्नाटक आणि बेळगाव येथून येणाऱ्या सर्व बसेसवर भगव्या रंगाने जय महाराष्ट्र लिहित आंदोलन केलं.. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारचा धिक्कार करत ‘मुख्यमंत्री बसवराज बोंम्मई मुर्दाबाद शिवसेना जिंदाबाद’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला..

बुलढाणा येथे आज शिवसेना ठाकरे गटातर्फे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची विराट सभा आयोजित करण्यात आली आहे. कर्नाटक सीमा प्रश्नावरून महाराष्ट्र सरकारच्या मवाळ धोरणावर उद्धव ठाकरे जोरदार टीका करण्याची शक्यता आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.