सगळं कामकाम बाजूला ठेवा, MPSC वर चर्चा करा, किती स्वप्निलच्या आत्महत्येची वाट पाहणार? फडणवीस आक्रमक

विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात झाली आणि विरोधकांनी सुरुवातीलाच एमपीएससी आणि स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येवरुन सरकारला धारेवर धरलं. सगळं कामकाम बाजूला ठेवा, MPSC वर चर्चा करा, असं फडणवीस म्हणाले. | Maharashtra Monsoon Session 2021 Devendra fadanvis

सगळं कामकाम बाजूला ठेवा, MPSC वर चर्चा करा, किती स्वप्निलच्या आत्महत्येची वाट पाहणार? फडणवीस आक्रमक
देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 12:13 PM

मुंबई : विधिमंडळाच्या (Maharashtra Monsoon Session 2021) कामकाजाला सुरुवात झाली आणि विरोधकांनी सुरुवातीलाच एमपीएससी (MPSC) आणि स्वप्निल लोणकरच्या (Swapnil Lonkar) आत्महत्येवरुन सरकारला धारेवर धरलं. “सगळं कामकाज बाजूला ठेवा पण MPSC वर चर्चा व्हायलाच हवी. कारण आज राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या, युवकांच्या मनातील हा प्रश्न आहे. एमपीएससी आपल्या पावलाने चालतीय, तिला एका स्वप्निलने आत्महत्या केली काय, जगला काय आणि मेला काय… काहीही फरक पडत नाही…. एमपीएससीला स्वायत्तता दिली आहे म्हणजे स्वैराचार नाही.. अशी आक्रमक भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी घेतली. (Maharashtra Legislature Assembly And Council Two Days Monsoon session 2021 Devendra fadanvis Attacked thackeray Government Over MPSC Swapnil lonkar Suicide)

सगळं कामकाम बाजूला ठेवा, MPSC वर चर्चा करा

स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येचे पडसाद आज विधिमंडळात उमटलेले पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत सरकार एमपीएससीवर काय पावलं उचलणार आहे, हे जाहीर करावं, असं आव्हान दिलं. तसंच सुरुवातीलाच स्वप्निल लोणकरची सुसाईड नोट फडणवीसांनी सभागृहात वाचून दाखवली. ही सुसाईट नोट अतिशय संवेदनशील आहे. कोणाच्याही हृदयाला पाझर फुटेल असं हे पत्र आहे. सरकारला पाझर फुटणार आहे की नाही?, असं विचारत एमपीएससीवर त्वरित चर्चा घ्यावी, असं फडणवीस म्हणाले.

सरकार किती स्वप्निलच्या आत्महत्येची वाट बघत आहे?

एमपीएससीला स्वायत्तता दिली आहे. परंतु स्वायत्तता म्हणजे स्वैराचार नाही… दीड दोन वर्ष परीक्षा होत नाहीयेत… मुलाखती होत नाहीत… मुलाखती झाल्या तर नियुक्त्या नाहीत… असे अनेक विद्यार्थी निराशेच्या गर्तेत सापडलेले आहेत.. एमपीएससी बोर्डावर लोक नाहीयेत… सरकार पावले उचलायला तयार नाहीये… सरकार विद्यार्थ्यांच्या व्यथा ऐकायला तयार नाहीये, असा हल्लाबोल फडणवीसांनी सरकारवर केला. आणखी किती स्वप्नील लोणकरने आत्महत्या करायला पाहिजे म्हणजे सरकारला जाग येईल, असा खडा सवाल देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सरकारला विचारला.

MPSC ची कार्यपद्धती नव्याने ठरविण्याची आवश्यकता

एमपीएससीची कार्यपद्धती नव्याने ठरविण्याची आवश्यकता आहे, असंही फडणवीस म्हणाले. एमपीएससी च्या परीक्षेचा ,वेळा निकालाच्या वेळा स्ट्रिकली ठरवण्याची गरज निर्माण झाली असल्याचं देखील फडणवीस यांनी नमूद केलं. एमपीएससी संदर्भात राज्यभरात अनेक आंदोलने झाली त्यानंतर सरकारने काय केलं आणि आता सरकार काय करणार आहे याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.

(Maharashtra Legislature Assembly And Council Two Days Monsoon session 2021 Devendra fadanvis Attacked thackeray Government Over MPSC Swapnil lonkar Suicide)

हे ही वाचा :

स्वप्नीलच्या आईचा व्हिडीओ स्क्रीनवर लावा, त्याच्या कुटुंबीयांना सरकारनं 50 लाख द्यावेत, सुधीर मुनगंटीवार विधानसभेत आक्रमक

अनिल देशमुख असेच मधात बोलले आता आत जात आहेत; मुनगंटीवारांच्या धमकीवरून सभागृहात गोंधळ

सरकारने लोकशाहीला कुलूप लावलं; प्रश्नोत्तरे, तारांकित प्रश्न नसल्याने विरोधी पक्षनेते फडणवीस आक्रमक

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.