Akola MLC Election Result: अकोल्यातून शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया पराभूत, भाजपचे वंसत खंडेलवाल विजयी

Akola MLC Election Result: महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad Election Result) नागपूर (Nagpur) आणि अकोला वाशिम बुलडाणा (Akola Washim Buldana ) स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी झाली.

Akola MLC Election Result: अकोल्यातून शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया पराभूत, भाजपचे वंसत खंडेलवाल विजयी
वसंत खंडेलवाल व गोपिकीसन बाजोरिया
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 11:07 AM

अकोला: महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad Election Result) नागपूर (Nagpur) आणि अकोला वाशिम बुलडाणा (Akola Washim Buldana ) स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी झाली. अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) आणि भाजपचे वसंत खंडेलवाल (Vasant Khandelwal) यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत भाजपचे वंसत खंडेलवाल हे विजयी झाले आहेत.अकोला बुलडाणा वाशिम विधान परिषद मतदार संघात गोपिकिशन बाजोरिया यांना 334, वंसत खंडेलवाल यांना 443 मतं मिळाली. तर 31 मतं बाद झाली आहेत.

गोपिकिशन बाजोरियांचा पराभव

अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत झाली यामध्ये गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभव झाला आहे. अकोला – बुलडाणा – वाशिम विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नव्हते.  अकोला – बुलडाणा – वाशिम या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना यंदा रंगला आहे.

वसंत खंडेलवाल विजयानं शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

भाजप आणि शिवसेना या निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदा समोर आले होते. वसंत खंडेलवाल हे नितीन गडकरींचे निकटवर्तीय मानले जातात. वसंत खंडेलवाल यांचा तीन जिल्ह्यातील जनसंपर्क त्यांच्या विजयासाठी कारणीभूत ठरला आहे. भाजपच्या वसंत खंडेलवाल यांच्या विजयामुळं मतमोजणी केंद्रावर जमलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. निराश झालेल्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्र सोडलं आहे.

भाजपचा मोठा विजय 

शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया हे गेल्या तीन टर्मपासून या मतदारसंघाचे आमदार होते. गेल्या 18 वर्षापासून इथं भाजपच्या उमदेवाराचा विजय झाला आहे. शिवसेना भाजप यांची युती असल्यानं भाजपला तिथं यापूर्वी निवडणूक लढवता आली नव्हती. 18 वर्षानंतर भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे.

अकोला वाशिम बुलडाण्यात कमळ फुललं

विधान परिषद निवडणूकीसाठी अकोला,वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील 22 मतदानकेंद्रावर मतदान घेण्यात आले होते. तिन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य असलेल्या 822 मतदारांपैकी 808 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभव करत वसंत खंडेलवाल यांनी विधान परिषदेत दिमाखात प्रवेश केला आहे. नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा येथील पराभवामुळं महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

इतर बातम्या: 

Nagpur MLC Election Result 2021: भाजपचं प्लॅनिंग यशस्वी, नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळे विजयी

Maharashtra MLC Election Result 2021 Live : नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळे विजयी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.