यशवंत जाधवांचे दोन कोटींचे व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात, सोमय्यांच्या रडारवर शिवसेनेचे कोण कोण ?

यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी कोलकाता येथील शेल कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार केल्याचं आयकर विभागाच्या यापूर्वीच्या तपासात समोर आलं असल्याची माहिती आहे.

यशवंत जाधवांचे दोन कोटींचे व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात, सोमय्यांच्या रडारवर शिवसेनेचे कोण कोण ?
यशवंत जाधव Image Credit source: google
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 10:03 AM

मुंबई – शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरी केंद्रीय तपास पथक सीआरपीएफ जवानांसह (CRPF Jawan) पोहोचलं आहे. यशवंत जाधव यांच्यावरती 15 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच ती रक्कम युएईला ठेवली असल्याची चर्चा आहे. “यशवंत जाधव यांनी मनपाच्या टेंडरमधून मिळालेले 15 कोटींचं रुपयांचे मनी लॉण्ड्रिंग केलंय, यशवंत जाधवांनी १५ कोटी रुपये रोख स्वरुपात मनी लॉण्ड्रिंग करणाऱ्या मास्टरमाईंड उदय शंकर महावारला (uday shankar mahawar) दिले आहेत. हे पैसे प्रधान डिलर प्रा. लिमिटेडच्या खात्यात जमा करण्यात आले. त्यानंतर या कंपनीचा एक रुपयांचा शेअर आणखी पाच कंपन्यांनी पाचशे रुपये दराने घेतला. त्यानंतर हे 15 कोटी यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबाच्या खात्यामध्ये जमा झाले. त्यानंतर यशवंत जाधव यांनी हे पैसे संयुक्त अरब अमिराती येथे हलवले. त्यामुळे १५ कोटी रुपये रोख यशवंत जाधव यांनी दिले हे स्पष्ट होत”असल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप केला होता.

किरीट सोमय्यांनी केला होता आरोप 

यशवंत जाधव यांच्या खात्यात २ कोटींचं व्यवहार झाल्याचा आरोप, पत्नी यामिनी जाधव यांच्या खात्यात प्रत्येकी एक कोटींचे व्यवहार , मुलगा निखिल जाधव यांच्या खात्यात ५० लाख, मुलगा यतिन जाधव यांची कंपनी शौरुप ट्रेडिंग प्रा. लिमिटेडच्या खात्यातून ३ कोटींचा गैरव्यवहार टेसिडा कंपनीतून २ कोटी, नातेवाईकांची बेनामी कंपनीत ५ कोटी रुपयांचा व्यवहार, सगळे पैसे युएईला पोहोचले असा किरीट सोमय्यांनी आरोप केला होता.

शिवसेनेचे अनेक नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर

नवाब मलिकांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर शिवसेनेचे अनेक नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर असल्याची चर्चा आहे, आमदार प्रताप सरनाईक, परिवनह मंत्री अनिल परब, खासदार भावना गवळी, आनंदराव अडसूळ इत्यादी नेते रडारवर असल्याने यांच्यावरती कधीही छापेमारी होऊ शकते अशी देखील चर्चा आहे. नवाब मलिकांना अटक केल्यापासून महाराष्ट्रात काल महाविकास आघाडीकडून धरणं आंदोलन करण्यात आलं तर भाजपकडून नवाब मलिकांनी राजीनामा द्यावा म्हणून आंदोलन करण्यात आलं.

आर्थिक व्यवहार केल्याचं उघडं

यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी कोलकाता येथील शेल कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार केल्याचं आयकर विभागाच्या यापूर्वीच्या तपासात समोर आलं असल्याची माहिती आहे. यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शेल कंपन्यांबरोबरच्या व्यवहारातून पैसे कमवल्याचा आरोप आहे. यामिनी जाधव यांनी प्रधान डीलर्स नावाच्या कंपनीकडून 1 कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याचा निवडणूक प्रतिज्ञापत्रात उल्लेख, मात्र तपासात ही शेल कंपनी असल्याचं उघड झालं आहे. यामिनी जाधव यांनी कर्ज घेतल्याचं दाखवलेलं आहे पण हा पैसा कर्जाचा नाही तर त्यांचाच असल्याचं आयकर विभागाचं म्हणण आहे.

य़शवंत जाधव राजकीय कारकीर्द 1. १९९७ : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवड 2. २००७ : बृहन्मुंबई महानगरपालिकेत पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले 3. २००८ : बाजार आणि उद्यान समितीच्या अध्यक्षपदी निवड 4. २०११ : उपनेते, शिवसेना 5. २०१७ : बृहन्मुंबई महानगरपालिकेत पुन्हा नगरसेवक म्हणून निवड 6. २०१७ : बृहन्मुंबई महानगरपालिकेत सभागृह नेते म्हणून नियुक्ती 7. २०१८ : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी निवड , एप्रिल २०१८ पासून यशवंत जाधव स्थायी समिती अध्यक्ष आहेत , ही स्थायी समिती अध्यक्ष पदाची त्यांची ३ टर्म आहे

पोषण आहाराचा 281 पोते तांदूळ नाशिकमध्ये जप्त; टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रताप महिला बचत गटामुळे उघड

“मला त्याच्याकडे जायचंय…” मित्राच्या निधनाचा धक्का पचेना, 28 वर्षांच्या तरुणाची आत्महत्या

सुगंधी चंदनाची इनोव्हातून तस्करी; नाशिकमध्ये ‘पुष्पा’ला बेड्या, कितीचे घबाड सापडले?

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....