AUDIO | चांगलं काम करताय, मी फेसबुकवर पाहते, पण रेग्युलरली… शर्मिला ठाकरेंचा मनसे पदाधिकाऱ्याला फोन

शर्मिला ठाकरेंनी जगदिश खांडेकरांच्या कामाची प्रशंसा सुद्धा केली आहे. पुढील काळात नक्कीच तुमच्या भागात येणार, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शर्मिला ठाकरे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचे काम करत असल्याचं दिसून आलं आहे.

AUDIO | चांगलं काम करताय, मी फेसबुकवर पाहते, पण रेग्युलरली... शर्मिला ठाकरेंचा मनसे पदाधिकाऱ्याला फोन
शर्मिला ठाकरे यांचा मनसे पदाधिकारी जगदिश खांडेकरांशी फोनवरुन संवाद
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 8:49 AM

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुका (BMC Election) तोंडावर आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबईसह राज्यातील सर्वच मनपा निवडणुकांना पूर्ण तयारीनिशी सामोरी जाणार आहे. मनसे आध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यावेळी त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यासुद्धा पदाधिकाऱ्यांच्या कामावर लक्ष ठेवून आहेत. मानखुर्द-छत्रपती शिवाजीनगर भागात काही दिवसांपूर्वी मनसेमध्ये बऱ्याच कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला होता. त्याच प्रार्श्वभूमीवर शर्मिला ठाकरे यांनी मानखुर्द विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांच्यासोबत फोनवरुन संवाद साधला. आता ती व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये शर्मिला ठाकरेंनी खांडेकरांच्या कामाची प्रशंसा सुद्धा केली आहे. पुढील काळात नक्कीच तुमच्या भागात येणार, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शर्मिला ठाकरे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचे काम करत असल्याचं दिसून आलं आहे.

काय झाला संवाद?

शर्मिला ठाकरे : कसं चाललंय जगदीश काम, चांगलं चाललंय ना? जगदिश खांडेकर : वहिनी तुमचा आशीर्वाद… शर्मिला ठाकरे : एकदम एकदम छान, मी बघते फेसबुकवरती, कधी हे सगळं लाईकपण करते जगदिश खांडेकर : हो धन्यवाद, तुमच्या एका लाईकमुळे… शर्मिला ठाकरे : चांगले पक्षप्रवेश चालू आहेत जगदिश खांडेकर : हो शंभर टक्के, आणि काय करायचं.. साहेबांचा वेळ मिळाला की सगळ्यांना एकदाच घेऊन येणार आहे तिकडे शर्मिला ठाकरे : हो चालेल जगदिश खांडेकर : आता कसे छोटे छोटे चालू आहेत ना, प्रत्येक वॉर्डमधून. आता संध्याकाळपासून छोटीशी स्क्रीनसुद्धा करतोय मी साहेबांच्या भाषणाची, ते पण इफेक्टिव्ह राहील शर्मिला ठाकरे : हो चांगलंय जगदिश खांडेकर :आपल्याला काय फारशी मेहनत करायला लागत नाही शर्मिला ठाकरे : रेग्युलर ऑफिसमध्ये पण बसत जा कोण ना कोणतरी जगदिश खांडेकर : हो हो, आपले आता विभागात साधारणतः तीन ऑफिसचं काम झालेलं आहे, आणि अजून एक-दोन ऑफिसचं काम सुरु आहे. म्हणजे साधारण चार-पाच ऑफिस होतील. आणि एकदा साहेबांनी वेळ दिलीच, तर खूप मोठ्या प्रमाणावर… शर्मिला ठाकरे : चांगलंय, तुमचं झालं की सांगा, मी वेळ देते जगदिश खांडेकर :हो तुम्हालाही बोलावणार, आपले आशीर्वाद असेच ठेवा आणि आपल्या अंकाचंही झालंय. आपलं मागच्या महिन्यात बोलणं झालेलं. इलेक्शन आहेत, त्यामुळे थोडे ऑफलाईनही करायला लागतील. शर्मिला ठाकरे : हो हो जगदिश खांडेकर : तुमचे आशीर्वाद ठेवा

ऐका ऑडिओ क्लीप :

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्री म्हणाले, ‘आदित्यने माझा ताण कमी केला’, तर भाजप नेते म्हणतात ‘तुमचा कमी झाला पण जनतेचा वाढला’!

भाजपा आपल्याच बळावर जिंकते हा शिवसेनेचा भ्रमाचा भोपळा फुटला, सेना तोंडावर आपटली; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

माझ्यावर होणाऱ्या टीकेला शांतपणे घेतोय, तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा :उद्धव ठाकरे

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.