Maharashtra Political Crisis: पुण्यात SRPF च्या २ तुकड्या दाखल, राजकीय परिस्थिती पाहता निर्णय!
शहरात कुठे ही कायदा सुव्यवस्था बिघडली तर या तुकड्यांना पाचारण करण्यात येणार आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता हा निर्णय घेतल्याची पुणे पोलिसांनी माहिती दिलीये.
पुणे: सध्या महाराष्ट्रात राजकीय (Polotics) भूकंप सुरु आहेत. एक झाला एक हादरा जनतेला, राजकीय पक्षांना सगळ्यांनाच बसतोय. रोज एका ठिकाणी आंदोलन, मोर्चे, कुणाचं ना कुणाचं कार्यालय फोडणं हे सत्र सुरु आहे. या सगळ्या गदारोळात आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे पुण्यात सध्याची राजकीय परिस्थिती पाहता 2 एसआरपीएफ (SRPF) च्या तुकड्या दाखल झालेल्या आहेत. पुणे पोलिस (Pune Police) आयुक्तालयात या दोन्ही तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. शहरात कुठे ही कायदा सुव्यवस्था बिघडली तर या तुकड्यांना पाचारण करण्यात येणार आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता हा निर्णय घेतल्याची पुणे पोलिसांनी माहिती दिलीये.
मुक्कामाचं ठिकाणी सुद्धा सुरक्षेच्या कारणास्तव गुप्त
महाराष्ट्रातील राजकारणासाठी येणारे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे पत्र पाठवले आहे. उद्याच बहुमत सिद्ध करण्यास देखील सांगितले आहे. बंडखोर आमदार गुवाहाटीला असतानाच शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांची कार्यालये फोडली. कुणी बंडखोर आमदारांच्या समर्थानार्थ तर कुणी विरोधात मोठी आंदोलनं केली त्यामुळे आता जेव्हा बहुमत चाचणीत सहभागी होण्यासाठी हेच बंडखोर आमदार मुंबईत दाखल होतायत तेव्हा त्यांनी आपल्या मुक्कामाचं ठिकाणी सुद्धा सुरक्षेच्या कारणास्तव गुप्त ठेवलेलं आहे.
शिवसेनेची सुप्रीम कोर्टात धाव
दरम्यान उद्याच बहुमत चाचणी होऊ नये, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार उद्या विधानभवनात बहुमत चाचणीला सामोरं जाईल की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे. महाविकास आघाडी सरकारला उद्या बुहमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. या आदेशाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात पोहोचली आहे. जर सुप्रीम कोर्टानं महाविकास आघाडी सरकारच्या बाजूने निर्णय दिला तर उद्या होणारी बहुमत चाचणी पुढे ढकलली जाऊ शकते. किंवा शिवसेनेची याचिका फेटाळली तर कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला उद्या उरल्या सुरल्या आमदारांच्या बळावर बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. भाजपच्या नेत्यांनी कालच राज्यपालांची भेट घेऊन महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याने त्यांना बहुमत चाचणीस सामोरं जाण्यास सांगावे, अशी मागणी केली. त्यानुसार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारला उद्या बहुमत चाचणीला सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत. याच आदेशाविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.