नागपूरमध्ये शिवसेनेला मोठा धक्का, 15 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनेच्या नव्या शहर कार्यकारणीतील 15 जणांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत आहे.

नागपूरमध्ये शिवसेनेला मोठा धक्का, 15 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 8:37 PM

नागपूर : आगामी पालिका आणि ग्रामपंचाय निवडणुकांच्या तोंडावर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. अशात नागपूरमध्येही राजकीय वातावरण तापल्याचं दिसून येत आहे. नागपुरात शिवसेनेत मोठ्या भूकंपाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनेच्या नव्या शहर कार्यकारणीतील 15 जणांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे निवडणुकांच्या तोंडावर हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. (maharashtra political news 15 shivsena office bearers resigned in Nagpur)

मिळालेल्या माहितीनुसार, नव्या कार्यकारणीत समाविष्ट केलं नाही म्हणून नाराज 15 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचं सांगण्यात येत आहे. जुन्या 40 हून अधिक पदाधिकारऱ्यांनी यासंबंधी स्पष्टीकरणही मागितलं आहे. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तयरीत शिवसेनेचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

नव्या कार्यकारणीत समाविष्ट न केल्यामुळे नाराज 15 पदाधिकाऱ्यांनी पूर्व विदर्भ शिवसेना समन्वयक प्रकाश वाघ यांच्याकडे राजीनामे सोपवले आहेत. पण प्रकाश वाघ यांनी अद्याप राजीनामे स्वीकारले नसल्याचीही माहिती समोर येत आहे. यामुळे शिवसेनेत नेमका कोणता अंतर्गत वाद धुमसत आहे? अशा चर्चांना आता उधाण आलं आहे.

खरंतर, गेल्या काही दिवसांआधीही भाजपनेही मुख्यमंत्र्यांच्या विदर्भ दौऱ्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे विरोधकांना आयत कोलित मिळणार असल्याच्याही राजकीय चर्चा सुरू आहे. अधिक माहितीनुसार, “मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर माझी नाराजी नाही मात्र स्थानिक राजकारणी आणि प्रशासनाने दौऱ्यात स्थानिक आमदाराला बोलावलं नाही,” असा आरोप करत भाजप आमदार बंटी भांगडीया यांनी नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विदर्भ दौऱ्यावर होते. मात्र, ठाकरेंच्या दौऱ्याविषयी बंटी भांगडीया (Banti Bhangdiya) यांना कळवण्यात आले नव्हते. याच कारणामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करत जनतेच्या प्रश्नांवर राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विदर्भ दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी गोसीखुर्द धरण आणि परिसरातील सिंचन व्यवस्थेची पाहणी केली. मात्र ठाकरेंच्या या दौऱ्याबद्दल प्रशासन आणि स्थानिक राजकारण्यांनी कुठलीही माहिती न दिल्याचा आरोप भाजप आमदार बंटी भांगडीया यांनी केला. मुख्यमंत्र्यांचा दौऱ्याबद्दलची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळायला हवी होती. मात्र ती मला माध्यमातून कळत आहे. याबाबत प्रशासनाला विचारले असता आम्ही तुम्हाला का बोलावलं नाही, हे तुम्ही समजू शकता अशा प्रकारचे उत्तरं दिली जात आहेत, असे भांगडीया म्हणाले. तसेच त्या भागातील राजकारण्यांनी मुद्दामहून डावलल्याचा आरोप बंटी भांगडीया यांनी केला होता. (maharashtra political news 15 shivsena office bearers resigned in Nagpur)

संबंधित बातम्या – 

‘नितेश राणे हे पहिले हँग, चाराण्यासारख्या गोष्टी करतात’, अब्दुल सत्तारांची टीका

राज्यात इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जानिर्मितीस चालना : आदित्य ठाकरे

(maharashtra political news 15 shivsena office bearers resigned in Nagpur)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.