Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : 'माझा मुन्ना चांगलाचंय, तो...' विजयानंतर धनंजय महाडिकांच्या आई, पत्नीनं काय म्हटलं?

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : ‘माझा मुन्ना चांगलाचंय, तो…’ विजयानंतर धनंजय महाडिकांच्या आई, पत्नीनं काय म्हटलं?

| Updated on: Jun 11, 2022 | 7:42 AM

राज्यसभा निवडणुकीमध्ये धनंजय महाडिक यांनी बाजी मारलीये. धनंजय महाडिक यांच्या विजयामुळे संपूर्ण महाडिक घराण्याला बळ मिळाल्याची प्रतिक्रिया महाडिक यांच्या आईने दिली आहे.

राज्यसभा निवडणुकीमध्ये धनंजय महाडिक यांनी बाजी मारलीये. तर दुसरीकडे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला आहे. धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर त्यांची पत्नी आणि आईने प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना धनंजय महाडिक यांच्या आई भावूक झाल्या. माझा मुन्ना चागलाच आहे. तो आज निवडून आलाय. त्याच्या या विजयाने संपूर्ण महाडिक घराण्याला बळ मिळालं आहे. मुन्ना आतापर्यंत चांगलं काम करत आला आहे. इथून पुढे देखील लोकांची कायम मदत करेल, चांगले काम करतच राहणार आहे. धनंजय महाडिक यांच्या विजयासाठी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी विशेष प्रयत्न केले, अशी प्रतिक्रिया धनंजय महाडिक यांच्या आईने दिली आहे.

Published on: Jun 11, 2022 07:42 AM