ST Workets Strike : ठाकरे सरकारडून पगारवाढीची घोषणा, एसटी कर्मचारी मात्र विलीनीकरणावर ठाम

आमचा 2016 ते 2020 आणि 2020 ते 2024 असे दोन्ही करार प्रलंबित आहेत. त्यामुळे ही वेतनवाढ तर आम्हाला आपोआप मिळणारच होती. त्यामुळे हा निर्णय आम्हाला मान्य नाही. आभाळ फाटलं आहे आणि तुम्ही ठिगळं लावायला निघाला आहात, असं कुठं असतं का? आमची विलिनीकरणाची प्रमुख मागणी आहे आणि सर्व कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.

ST Workets Strike : ठाकरे सरकारडून पगारवाढीची घोषणा, एसटी कर्मचारी मात्र विलीनीकरणावर ठाम
संपकरी एसटी कर्मचारी
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 7:37 PM

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील तीन आठवड्यांपासून सुरु असलेल्या संपाला आता यश मिळताना पाहायला मिळत आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची मोठी घोषणा केली आहे. अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारचा निर्णय जाहीर केलाय. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतही उपस्थित होते. दरम्यान, अनिल परब यांनी मोठी घोषणा केली असली तरी आझाद मैदानावरील एसटी कर्मचारी अद्यापही विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. (ST employees insist on the merger of ST with the state government)

‘ही वेतनवाढ तर आम्हाला आपोआप मिळणारच होती’

राज्य सरकारनं वेतनवाढीची घोषणाकरुन आमच्या जखमेवर मिठ चोळण्याचंच काम केलं आहे. मी वेतनवाढ तर आम्हाला मिळणारच होती. कारण आमचा 2016 ते 2020 आणि 2020 ते 2024 असे दोन्ही करार प्रलंबित आहेत. त्यामुळे ही वेतनवाढ तर आम्हाला आपोआप मिळणारच होती. त्यामुळे हा निर्णय आम्हाला मान्य नाही. आभाळ फाटलं आहे आणि तुम्ही ठिगळं लावायला निघाला आहात, असं कुठं असतं का? आमची विलिनीकरणाची प्रमुख मागणी आहे आणि सर्व कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे जिंकू किंवा मरू पण आमचं या प्रशासनासोबत युद्ध चालूच राहणार असल्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

‘विलिनीकरण झालं तरंच लालपरी जगेल’

एसटीच्या विलिनीकरणाची मागणी करण्यामागे फक्त आमचा स्वार्थ नाही. तर विलिनीकरणामुळे जनतेचाही फायदा होणार आहे. कारण विलिनीकरणानंतर एसटीच्या तिकीट दरात 40 टक्क्यांची कपात होणार आहे. विलिनीकरण झालं तरंच लालपरी जगणार आहे, अशी भावना दुसऱ्या एका एसटी कर्मचाऱ्याने व्यक्त केली आहे.

अनिल परबांची नेमकी घोषणा काय?

‘संप दिवसेंदिवस लांबत असल्यामुळे सामान्य जनता आणि विद्यार्थ्यांची अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे असावेळी काय करायचं याबाबत सतत विचार करत होतो. नंतर याबाबत आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, माझे सहकारी उदय सामंत यांनी यात बरंच मोठं काम केलं. यावर सरकारतर्फे आम्ही एक प्रस्ताव ठेवला की विलिनीकरणाचा निर्णय समितीने राज्य सरकारनं दिला तर तो आम्हाला मान्य असेल. पण तो निर्णय़ येईपर्यंत हा तिढा कायम ठेवता येणार नाही. म्हणून सरकारनं कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याच्या निर्णय घेतलाय. ही वाढ त्यांच्या मूळ पगारात करण्यात येणार आहे, अशी घोषणा परब यांनी केलीय.

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात नेमकी किती वाढ होणार?

1 ते 10 वर्षे सेवा- मूळ वेतनात 5 हजाराची वाढ, त्यामुळे मूळ वेतन 12 हजार 80 होतं त्याचं वेतन आता 17 हजार 395 रुपये. त्याचं पूर्ण वेतन जे 17 हजार 80 रुपये होतं ते आता 24 हजार 594 रुपये झालं आहे. साधारण 7 हजार दोनशे रुपयांची म्हणजे एकूण 41 टक्के वाढ.

10 ते 20 वर्षे सेवा – मूळ वेतनात 4 हजार रुपयांची वाढ. ज्यांचा पगार 16 हजार रुपये होता त्यांचा पगार 23 हजार 40 रुपये झाला. त्यांचा पूर्ण पगार आता 28 हजार 800 रुपये झालाय.

20 वर्षे आणि त्याहून अधिक सेवा – 2 हजार 500 रुपयांची वाढ. ज्यांचं मूळ वेतन 26 हजार रुपये होतं आणि त्यांचं स्थूल वेतन 37 हजार 440 रुपये होतं. त्यांचा पूर्ण पगार आता 41 हजार 40 झालं आहे. ज्यांचं मूळ वेतन 37 हजार होतं आणि स्थुल वेतन 53 हजार 280 रुपये होतं. त्यांचा मुळ वेतन 39 हजार 500 होईल, तर सुधारित वेतन 56 हजार 880 रुपये होईल.

इतर बातम्या :

बैठकीचे फलीत : सोयाबीन दराबाबत सकारात्मक निर्णय, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपन्यांवर होणार गुन्हे दाखल

आता महिलांनी स्वत:च कायदा हातात घ्यायचा का?; विजया रहाटकर यांचा संतप्त सवाल

ST employees insist on the merger of ST with the state government

मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.