Maharashtra Cabinet Expansion : 5 ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्तार, सूत्रांची माहिती, वाचा भाजप आणि शिंदे गटातील संभाव्य मंत्र्यांची यादी

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक महत्वाची बातमी सूत्रांनी दिलीय. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 5 ऑगस्टला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर 12 संभाव्य मंत्र्यांची यादीही समोर आलीय. त्यात भाजपकडून 7 आणि शिंदे गटातील 5 नावांचा समावेश आहे.

Maharashtra Cabinet Expansion : 5 ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्तार, सूत्रांची माहिती, वाचा भाजप आणि शिंदे गटातील संभाव्य मंत्र्यांची यादी
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 9:26 PM

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे सरकार येऊन महिना लोटला. मात्र अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होऊ शकला नाही. त्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) विरोधकांकडून जोरदार टीका केली जातेय. अशावेळी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक महत्वाची बातमी सूत्रांनी दिलीय. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 5 ऑगस्टला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर 12 संभाव्य मंत्र्यांची यादीही समोर आलीय. त्यात भाजपकडून 7 आणि शिंदे गटातील 5 नावांचा समावेश आहे. त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा समावेश आहे. तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, दादा भुसेंचाही समावेश करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

शिंदे गटातील कुणाची लॉटरी लागणार?

  1. गुलाबराव पाटील
  2. उदय सामंत
  3. अब्दुल सत्तार
  4. दादा भुसे
  5. शंभुराज देसाई

भाजपकडून कुणाला संधी मिळणार?

  1. चंद्रकांत पाटील
  2. सुधीर मुनगंटीवार
  3. गिरीश महाजन
  4. चंद्रशेखर बावनकुळे
  5. राधाकृष्ण विखे पाटील
  6. आशिष शेलार
  7. प्रवीण दरेकर

दीपक केसरकर विस्ताराबाबत काय म्हणाले?

राज्यातील सत्तापालटाला आता महिना उलटून गेलाय. मात्र अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात येतेय. अशावेळी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. येत्या रविवारपर्यंत राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल, असा दावाच दीपक केसरकर  यांनी केलाय. इतकंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबतची अधिकृत घोषणा करतील, अशी माहितीही केसरकर यांनी दिलीय.

शिंदे सरकारचा फैसला उद्या होणार?

एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे या सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या प्रकरणावर उद्या म्हणजेच 04 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. आज दोन्ही पक्षातील वकिलांनी विविध मुद्द्यांवर जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर उद्या सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. गुरुवारी सुप्रीम कोर्टाच्या पटलावर पहिलीच केस घेतली जाईल. कोर्टाचं कामकाज सकाळी 10.30 वाजता सुरु होतं. त्यामुळे उद्या सकाळपासून पुन्हा एकदा दोन्ही गटाचे वकील आपापल्या मुद्द्यांवर युक्तिवाद करतील. आज उद्धव ठाकरे यांच्या गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे गटातील आमदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार, अपात्रतेची कारवाई झाली पाहिजे, यासाठी जोरदार युक्तिवाद केला. तर शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांनीदेखील आम्ही अजून पक्ष सोडला नसल्याने पक्षांतर बंदी कायदा आम्हाला लागूच होऊ शकत नाही, असा युक्तिवाद केला. त्यानंतर कोर्टानेही दोन्ही पक्षांच्या वकिलांसमोर काही प्रश्न उपस्थित केले.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.