Vidhan Parishad Election Result 2022 : चंद्रकांत दादांकडून प्रसाद लाडांचे गालगुच्चे, तर महाजनांची दादांना पप्पी! भाजपचा आनंद गगनात मावेना
भाजपने पक्ष कार्यालयात जल्लोषाला सुरुवात केली.
मुंबई – विधान परिषदेच्या निवडणुकीत (Vidhan Parishad Election) कोणाचा विजय होईल हे कोणीचं सांगू शकत नाही अशी परिस्थिती होती. सकाळी 9 वाजता मतदान सुरू झालं तेव्हापासून आमचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास दोन्ही पक्षांकडून व्यक्त केला जात होता. दिवसभर मतदान देखील व्यवस्थित सुरू होतं. मतदान सुरू असताना देखील भाजप (BJP) आणि महाविकास (MVA) आघाडीतील संघर्ष पाहायला मिळाला. निकालाच्या आगोदर कार्यकर्त्यांसह नेत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. काल ज्यावेळी निकाल जाहीर झाला. त्यावेळी चंद्रकांत दादांकडून प्रसाद लाडांचे गालगुच्चे घेतल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. निकालाची उत्सुकता सगळ्यांना होती. त्यामुळे ज्यावेळी निकाल हाती आला त्यावेळी उत्साहाच्या भरात चंद्रकांत दादांनी प्रसाद लाडांचे गालगुच्चे घेतले. तर तर महाजनांची दादांना पप्पी घेतल्याचं पाहायला मिळालं. पाच उमेदवार विजयी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा नाद करायचा नाय अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांनी दिली.
भाजपचा आनंद गगनात मावेना
कोणाचा विजय होणार यांची दोन्ही पक्षांना उत्सुकता होती. मतमोजणीला सुरुवातीची मतं भाजपच्या पारड्यात पडली. त्यामुळे भाजपचे पाचही उमेदवार निवडून येतील असं नेत्यांनी सांगायला सुरूवात केली. भाजपने पक्ष कार्यालयात जल्लोषाला सुरुवात केली. पहिल्या पसंतीची मतं मिळाल्याने भाजप नेत्यांमध्ये अधिक उत्साह होता. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घोडबाजार झाल्याच्या प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली. नेमकी कुणाची मतं फुटली. भाजपला अधिकची मतं कोणाची मिळाली याची राजकीय चर्चा चांगलीचं रंगली होती. एकनाथ खडसे यांचा विजय झाल्याचे समजताचं त्यांच्या देखील समर्थकांनी जळगाव अनेक भागात जल्लोष केला.
भाजपच्या उमेदवारांना किती मतं मिळाली
प्रवीण दरेकर – 29 मते श्रीकांत भारतीय – 30 मते राम शिंदे – 30 मते उमा खापरे – 27 मते प्रसाद लाड – 28 मते
राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांना किती मिळाली.
रामराजे नाईक निंबाळकर – 29 मते एकनाथ खडसे – 28 मते
काँग्रेसच्या उमेदवारांना किती मतं मिळाली
भाई जगताप – 26 मते चंद्रकांत हंडोरे – 22 मते (पराभूत)
शिवसेनेच्या उमेदवारांना किती मतं मिळाली
सचिन अहिर – 26 मते आमशा पाडवी – 26 मते