Amrish Patel | चार वेळा विधानसभा, विधानपरिषदेचीही हॅटट्रिक, भाजपचे धुरंधर उमेदवार अमरिश पटेल कोण आहेत?

अमरिश पटेल हे मूळचे काँग्रेसचे. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द एक स्वतंत्र राजकारणी म्हणून शिरपूरमध्ये सुरू केली आणि शिरपूर नगरपालिकेचे अध्यक्ष, चार वेळा (1990 ते 2009) शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेससाठी काम केले.

Amrish Patel | चार वेळा विधानसभा, विधानपरिषदेचीही हॅटट्रिक, भाजपचे धुरंधर उमेदवार अमरिश पटेल कोण आहेत?
अमरिश पटेल
Follow us
| Updated on: Nov 20, 2021 | 8:03 AM

मुंबई : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा (BJP Candidates for Maharashtra Legislative Council Election) करण्यात आली आहे. भाजपने कोल्हापूर, नागपूर, धुळे-नंदुरबार, अकोला-बुलडाणा-वाशिम आणि मुंबई अशा पाचही जागांवर उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. धुळे-नंदुरबार मतदारसंघातून भाजपकडून पुन्हा अमरिश पटेल (Amrish Patel) मैदानात उतरले आहेत. पटेल या मतदारसंघातून चौथ्यांदा विजय मिळवण्यास उत्सुक आहेत.

कोण आहेत अमरिश पटेल?

अमरिश पटेल हे मूळचे काँग्रेसचे. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द एक स्वतंत्र राजकारणी म्हणून शिरपूरमध्ये सुरू केली आणि शिरपूर नगरपालिकेचे अध्यक्ष, चार वेळा (1990 ते 2009) शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेससाठी काम केले. काँग्रेसचा उमेदवार, जो कधीही विधानसभा निवडणूक हरला नाही, असा त्यांचा लौकिक. राज्य सरकारचे कॅबिनेट मंत्री म्हणूनही त्यांनी पद भूषवले.

अमरिश पटेल यांनी शालेय शिक्षण, संस्कृती, क्रीडा कॅबिनेट मंत्री म्हणूनही काम केले होते. व युवक कार्य (महाराष्ट्र शासन) 2003-04 मध्ये तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले. 2009 मध्ये, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांना महाराष्ट्र विधान परिषदेचे बिनविरोध निवडून आलेले सदस्य घोषित करण्यात आले.

काँग्रेसला अलविदा, भाजपात प्रवेश

गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी त्यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला. अमरिश पटेल यांनी 30 सप्टेंबर 2019 रोजी राजीनामा दिल्यामुळे, विधानपरिषदेची त्यांची जागा रिक्त झाली. खरं तर अमरिश पटेल यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांचा कार्यकाळ 14 डिसेंबर 2021 पर्यंत होता. पण राजीनाम्यामुळे पुन्हा निवडणूक लागली. ही निवडणूक मार्च 2020 मध्ये नियोजित होती, पण कोरोना संकटामुळे ती पुढे ढकलली. ही निवडणूक डिसेंबर 2020 मध्ये पार पडली आणि केवळ 12 महिन्यांसाठी निवडणूक लागली.

अमरिश पटेल यांचा तिसरा विजय

अमरिश पटेल यांनी पहिल्यांदा 2009 मध्ये बिनविरोध विजय मिळवला होता. मग 2015 मधील विधानपरिषद निवडणुकीत अमरिश पटेल हे 321 मतांनी विजयी झाले. त्यानंतर 2020 च्या पोटनिवडणुकीत अमरिश पटेल यांनी 234 मतांनी विजयी मिळवून, आपली ताकद दाखवून दिली.

अमरिश पटेल यांची कारकीर्द

अमरिश पटेल हे उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे महत्वपूर्ण नेते होते. त्यांनी मंत्रिपदही भूषवले होते. धुळे नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेत त्यांना महत्त्वपूर्ण स्थान होते. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला.

  • 1985 -शिरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष
  • 1990 -शिरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार
  • 1995 – शिरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार
  • 2000 – शिरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार
  • 2005 – शिरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार
  • 2009 -धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर सदस्य
  • 2015 – धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर सदस्य
  • 2019 मध्ये काँग्रेस सोडली
  • 2020 मध्ये भाजपच्या तिकीटावर धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था पोटनिवडणुकीत विजय मिळवत विधानपरिषदेवर

अमरीश पटेल हे SVKM च्या NMIMS चे कुलपती आणि श्री विलेपार्ले केळवणी मंडळाचे अध्यक्ष आहेत, मुंबई स्थित एज्युकेशनल ट्रस्ट, जे मिठीबाई कॉलेज, नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, SVKM चे NMIMS आणि संगविदास अभियंता द्वारकादास कॉलेज यासह अनेक संस्था चालवतात. ते शिरपूर एज्युकेशन सोसायटीचेही संस्थापक आहेत.

संबंधित बातम्या :

विधान परिषदेसाठी भाजपची उमेदवार यादी जाहीर, चंद्रशेखर बावनकुळे, राजहंस सिंह निवडणुकीच्या रिंगणात

काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला भाजपचं तिकीट, विधानपरिषदेची संधी मिळालेले राजहंस सिंह कोण आहेत?

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.