Rajhans Singh | काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला भाजपचं तिकीट, विधानपरिषदेची संधी मिळालेले राजहंस सिंह कोण आहेत?

राजहंस सिंग हे 1992 मध्ये सर्वप्रथम मुंबई महापालिकेच्या नगरसेवक पदी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. वर्ष 1992 ते 1997 या काळात ते नगरसेवक होते. नंतर 2002 पासून 2012 पर्यंत सलग बारा वर्षे ते नगरसेवक होते.

Rajhans Singh | काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला भाजपचं तिकीट, विधानपरिषदेची संधी मिळालेले राजहंस सिंह कोण आहेत?
राजहंस सिंग
Follow us
| Updated on: Nov 20, 2021 | 8:12 AM

मुंबई : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा (BJP Candidates for Maharashtra Legislative Council Election) करण्यात आली आहे. भाजपने कोल्हापूर, नागपूर, धुळे-नंदुरबार, अकोला-बुलडाणा-वाशिम आणि मुंबई अशा पाचही जागांवर भाजपने उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना नागपुरातून संधी देण्यात आली आहे. तर मुंबईतून माजी नगरसेवक राजहंस धनंजय सिंह (Rajhans Dhananjay Singh) यांना तिकीट देण्यात आले आहे.

कोण आहेत राजहंस धनंजय सिंह?

राजहंस सिंग हे 1992 मध्ये सर्वप्रथम मुंबई महापालिकेच्या नगरसेवक पदी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. वर्ष 1992 ते 1997 या काळात ते नगरसेवक होते. नंतर 2002 पासून 2012 पर्यंत सलग बारा वर्षे ते नगरसेवक होते. या कालावधीत 2004 पासून 2012 पर्यंत सलग आठ वर्ष त्यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून पालिकेत कामगिरी बजावली आहे.

2017 मध्ये भाजप प्रवेश

याच दरम्यान 2009 मध्ये मुंबईतील दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून आले. 2009 ते 2014 ते विधानसभा सदस्यही होते. 2017 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. तेव्हापासून आजपर्यंत मुंबई भारतीय जनता पक्षाचा उत्तर भारतीय चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

भाजपचा उत्तर भारतीय चेहरा

मुंबई भारतीय जनता पक्ष आयोजित मुंबईतील चौपाल कार्यक्रमात त्यांची भूमिका अग्रेसर राहिली आहे. रुबाबदार व्यक्तिमत्त्व, मराठी भाषेवरिल प्रभुत्व आणि जोरकस भाषण शैली, अत्यंत कुशाग्र बुद्धी, प्रामाणिक आणि संघनिष्ठ कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे.

मुंबई पालिकेच्या इतिहासात या मतदार संघातून निवडून जाणाऱ्या उमेदवारांपैकी राजहंस सिंग हे मुंबई महापालिकेत तब्बल पंधरा वर्ष नगरसेवक राहिलेले असे पहिलेच उमेदवार असावेत.

विधान परिषदेसाठी भाजप उमेदवारांची यादी

कोल्हापूर : अमल महाडिक

धुळे-नंदुरबार : अमरीश पटेल

नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे

अकोला-बुलडाणा-वाशिम : वसंत खंडेलवाल

मुंबई : राजहंस सिंह

बावनकुळेंना अखेर विधानपरिषदेवर संधी

विधानसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून डावलले गेलेले माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना अखेर संधी मिळाली आहे. दरम्यानच्या काळात बावनकुळे नाराज असल्याच्या चर्चा होत्या मात्र ते सातत्याने पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रीय राहिले. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, वाढीव वीज बिल विरोधी आंदोलन यासारख्या अनेक आंदोलनांचं बावनकुळेंनी नेतृत्व केलं. त्यानंतर आता नागपूर विधान परिषदेसाठी पक्षाकडून बावनकुळे यांना तिकीट देण्यात आले आहे.

कोल्हापुरात सतेज पाटलांना अमल महाडिक पुन्हा भिडणार

कोल्हापूर विधानपरिषद मतदारसंघातून भाजपकडून अमल महाडिक यांना संधी मिळाली आहे. काँग्रेस उमेदवार सतेज पाटील यांच्या विरोधात भाजपकडून कोण उमेदवार असेल, या संदर्भात चर्चा सुरु होत्या. अखेर अमल महाडिक यांचं नाव भाजपनं निश्चित केलं. 2014 मध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात अमल महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशी लढत झाली होती. अमल महाडिक यांनी त्यावेळी सतेज पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर सतेज पाटील कोल्हापूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून गेले होते.

भाजपकडून अमरिश पटेल विधान परिषदेच्या रिंगणात

विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून विद्यमान आमदार अमरिशभाई पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून अजूनही कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही.

संबंधित बातम्या :

विधान परिषदेसाठी भाजपची उमेदवार यादी जाहीर, चंद्रशेखर बावनकुळे, राजहंस सिंह निवडणुकीच्या रिंगणात

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.