झटपट जाणून घ्या मध्यरात्रीपासून आतापर्यंत घडलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणातील पाच महत्त्वाच्या घडामोडी

Maharashtra Vidhan Sabha 2024 : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. त्यातील पाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. कुठे पक्षांतर? कुठे भाजपाचा तोटा, ठाकरेंचा फायदा? एकाच मैदानासाठी किती अर्ज? जाणून घ्या एका क्लिकवर.

झटपट जाणून घ्या मध्यरात्रीपासून आतापर्यंत घडलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणातील पाच महत्त्वाच्या घडामोडी
Mahayuti vs Mva
Follow us
| Updated on: Oct 18, 2024 | 9:36 AM

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांच्या हातात आता महिन्याभराचा कालावधी आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी आहे. निवडणुकीत विजयाच गणित जुळवून आणण्यासाठी उमेदवारांकडून विविध पावलं उचलली जात आहेत. त्यात तिकीट मिळण्याची शक्यता नसल्याने कोणी पक्षांतर करतय, तर कोण मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहे. यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या राजकारणात आरक्षणाचा मुद्दा प्रभावी ठरण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आज, आतापर्यंत कुठल्या पाच महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात ते जाणून घ्या.

भाजपा नेता मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला

भाजपा नेते, माजी आमदार सुरेश धस यांनी मध्यरात्री 1 वाजता मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन ही भेट घेतली. मनोज जरांगे पाटील व सुरेश धस यांच्यात राजकीत विषयावर चर्चा झाली. सुरेश धस हे बीड जिल्ह्यातील आष्टी-पाटोदा मतदार संघातून भाजपाकडून निवडणूक लढवणार आहेत. बीड जिल्ह्यात जरांगे फॅक्टर चालत असल्याने सुरेश धस जरांगे पाटील यांच्या भेटीला. लोकसभा निवडणुकीत याच जरांगे फॅक्टरचा भाजपाला फटका बसला होता.

भाजपाला धक्का, ठाकरे सेनेचा फायदा

सिंधुदुर्गात भाजपाला धक्का बसला आहे. राजन तेली भाजप सोडणार ही TV9 ची बातमी खरी ठरली आहे. राजन तेली यांनी प्राथमिक सदस्यत्व व पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या मतदारसंघात चालत असलेली घराणेशाही (केसरकर) आपल्याला मान्य नाही तसेच राणे परिवाराकडून होत असलेले अंतर्गत खच्चीकरण, याला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचे तेली यांनी म्हटलं आहे. राजन तेली सावंतवाडीतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. पण दीपक केसरकर असल्याने त्यांना उमेदवारी मिळणार नव्हती. राजन तेली आज ठाकरे सेनेत प्रवेश करणार आहे.

अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर कुठून लढणार?

शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर राजर्षी शाहू विकास आघाडी पक्षातर्फेच निवडणूक लढवणार?. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी tv9 शी बोलताना दिले संकेत. चार दिवसात जाहीर मेळावा घेऊन अधिकृत भूमिका स्पष्ट करणार. यड्रावकर यांची माहिती. राजर्षी शाहू विकास आघाडीतर्फे निवडणूक लढवली तरी महायुती माझ्याच पाठीशी राहील. यड्रावकर यांनी व्यक्त केला विश्वास. महायुतीकडून राजेंद्र पाटील यड्रावकर यांना बाहेरून पाठिंबा दिला जाण्याची शक्यता. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडी पक्षाला नुकतीच निवडणूक आयोगाने दिली आहे मान्यता. पक्षाला आता निवडणूक चिन्हाची प्रतिक्षा. दोन ते तीन दिवसात निवडणूक चिन्ह मिळताच यड्रावकर गटाचा जाहीर मेळावा होणार.

चारही पक्षांना एकाच दिवशी शिवाजी पार्कमध्ये घ्यायचीय सभा, मैदान कोणाला मिळणार?

17 नोव्हेंबरला शिवाजी पार्क मैदानात सभा घेण्यासाठी चार अर्ज दाखल. मनसे, शिवसेना, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि भाजप या चारही राजकीय पक्षांतर्फे शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज. मुंबई महानगरपालिकेच्या नियमानुसार पहिला अर्ज दाखल करणाऱ्याला मैदान मिळण्याबाबत प्राधान्य. मनसेनं प्रथम अर्ज केल्यामुळे मनसेला शिवाजी पार्क मैदान मिळणार असल्याची शक्यता.

पुण्यात भाजपामध्ये बंड रोखण्यासाठी बावनकुळे Active

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कालपासून पुण्यात आहेत. काल सायंकाळी पुण्यातील इच्छुक उमेदवारांसोबत केली चर्चा. रात्री उशिरापर्यंत बावनकुळे यांनी अनेक इच्छुकांच्या घेतल्या भेटीगाठी. पुणे शहरातील अनेक विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी नगरसेवक आहेत इच्छुक. पर्वती, खडकवासला, वडगावशेरी, कसबा विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बावनकुळे यांनी अनेक इच्छुक उमेदवारांची भेट घेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भाजपमधील इच्छुक थांबणार की बंड करणार याकडे लक्ष.

Non Stop LIVE Update
जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार? राजकीय एन्काऊंटर करण्याचा थेट इशारा
जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार? राजकीय एन्काऊंटर करण्याचा थेट इशारा.
लाडकी बहीण योजनेचे नियम मोडले? डिसेंबरनंतर अर्ज तपासणी, होणार वसुली?
लाडकी बहीण योजनेचे नियम मोडले? डिसेंबरनंतर अर्ज तपासणी, होणार वसुली?.
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'.
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.