Sharad Pawar : शरद पवारांची राजकीय पेरणी अशी की, 30 वर्षानंतर पवारांच्या घरात मुख्यमंत्रीपद येणार का?

Sharad Pawar : महाराष्ट्रात शरद पवार यांच्या कुटुंबाकडे शेवटची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची 1993 ते 1995 होती. शरद पवार हेच शेवटचे 1993 ते 1995 दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तेव्हापासून पवार कुटुंबाकडे मुख्यमंत्रीपद आलेलं नाही. पवार यांनी यावेळी मुख्यमंत्रीपद डोळ्यासमोर ठेऊन राजकीय पेरणी केली आहे.

Sharad Pawar : शरद पवारांची राजकीय पेरणी अशी की, 30 वर्षानंतर पवारांच्या घरात मुख्यमंत्रीपद येणार का?
Sharad Pawar
Follow us
| Updated on: Oct 25, 2024 | 8:02 AM

महाराष्ट्राच राजकारण हे शरद पवार या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. शरद पवार हे फक्त महाराष्ट्रच नाही, देशाच्या राजकारणातील दिग्गज नेते आहेत. शरद पवार आज 83 वर्षांचे आहेत. पण या वयातही पवार आपल्या राजकीय खेळीने भल्या-भल्या दिग्गजांना चीतपट करतात. आतापर्यंतच्या राजकीय करियरमध्ये शरद पवारांच्या अनेक निर्णयांनी राजकीय नेतेच नाही, तर सर्वसामान्य सुद्धा हैराण झालेत. सिनियर पवारांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या सीट शेयरिंगमध्ये सगळ्यांना धक्का दिलाय. तिन्ही पक्षांमध्ये कमी जनाधार असूनही शरद पवारांच्या पक्षाला बरोबरीच्या जागा मिळाल्या आहेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये सध्या 85-85-85 असं जागा वाटप झालय.

शरद पवारांच्या पक्षाला 85 जागा मिळाल्यानंतर आता काही प्रश्न निर्माण झालेत. शरद पवारांनी त्यांच्या पक्षासाठी इतक्या जागा कशा मिळवल्या? पवारांना या द्वारे काय साध्य करायचं आहे? मविआमध्ये 85 जागा मिळवणाऱ्या शरद पवारांची नजर मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर तर नाही ना? अशी चर्चा होण्यामागे दोन मोठी कारणं आहेत.

लोकसभेच्या स्ट्राइक रेटने शरद पवारांचा पक्ष किती जागांवर जिंकेल?

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाचा विजयाचा स्ट्राइक रेट सर्वात जास्त होता. लोकसभेला 9 जागा लढवणाऱ्या शरद पवार यांच्या पक्षाला 8 जागांवर विजय मिळाला. या स्ट्राइक रेटने विचार करायचा झाल्यास शरद पवार यांचा पक्ष 60-70 जागांवर विजय मिळवू शकतो. असं झाल्यास शरद पवार यांच्या पक्षाचा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरील दावा अधिक मजबूत होऊ शकतो.

शरद पवारांनी आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा का घोषित केला नाही?

शरद पवार यांनी अलीकडेच जयंत पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीबद्दल भाष्य केलं होतं. मविआ या निवडणुकीआधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करणार नाहीय. यामागे 2004 च्या विधानसभा निवडणुकीतील एक प्रसंग आहे. 2004 मध्ये पवार यांनी निवडणुकीआधी काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवण्याची घोषणा केली होती. 2004 मध्ये राष्ट्रवादीला दोन जागा जास्त मिळाल्या. मात्र, तरीही पवारांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची काँग्रेसला दिली.

सध्याची पवारांची राजकीय खेळी काय?

शरद पवार यांच्या कुटुंबाकडे मागच्या 30 वर्षांपासून सीएम पदाची खुर्ची नाहीय. शरद पवार हे शेवटचे 1993 ते 1995 दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.

शरद पवार सध्या ज्या पद्धतीची राजकीय पेरणी करतायत, त्यावर असं म्हटलं जातय की, भविष्यात पवार यांच्या हाती सत्तेची चावी आली, तर सुप्रिया सुळे यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तीन दिवसात विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. या तीन दिवसांत पक्षांकडे निगोसिएशनसाठी फार वेळ नसेल.

जागा वाटपावरुन शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जे टोकाचे मतभेद झाले, त्यामुळे शरद पवार मविआमध्ये अजून बळकट झालेत.

Non Stop LIVE Update
'या' दिग्गजांनी भरले अर्ज, कुठे तडगी फाईट अन् कोणी केला विजयाचा दावा?
'या' दिग्गजांनी भरले अर्ज, कुठे तडगी फाईट अन् कोणी केला विजयाचा दावा?.
जरांगेंकडून इच्छुकांच्या भेटीगाठी सुरू असताना धमकी, '10 मिनिटांत...'
जरांगेंकडून इच्छुकांच्या भेटीगाठी सुरू असताना धमकी, '10 मिनिटांत...'.
नवाब मलिक यांना सर्वात मोठा धक्का, अजितदादा गटाचा मोठा निर्णय काय?
नवाब मलिक यांना सर्वात मोठा धक्का, अजितदादा गटाचा मोठा निर्णय काय?.
अमित शाहांना वेगळंच टेन्शन, भाजप नेत्यांना काय केल्या थेट सूचना?
अमित शाहांना वेगळंच टेन्शन, भाजप नेत्यांना काय केल्या थेट सूचना?.
राष्ट्रवादीच्या पक्ष-चिन्हाची 6 नोव्हेंबरला सुनावणी, कोर्टात काय घडलं?
राष्ट्रवादीच्या पक्ष-चिन्हाची 6 नोव्हेंबरला सुनावणी, कोर्टात काय घडलं?.
विधानसभेच्या रिंगणात उतरताच रोहित पाटलांच तुफान भाषण, आबांची आठवण अन्
विधानसभेच्या रिंगणात उतरताच रोहित पाटलांच तुफान भाषण, आबांची आठवण अन्.
महायुतीच्या 18 जागांचा पेच शाहांच्या दरबारी सुटणार? CM आणि DCM दिल्लीत
महायुतीच्या 18 जागांचा पेच शाहांच्या दरबारी सुटणार? CM आणि DCM दिल्लीत.
धनंजय मुंडे परळीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर म्हणाले, 'आज माझी बहीण..'
धनंजय मुंडे परळीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर म्हणाले, 'आज माझी बहीण..'.
10 मिनिटांत कार्यक्रम.. जरांगेंच्या जीवाला धोका, बिश्नोई गँगकडून धमकी?
10 मिनिटांत कार्यक्रम.. जरांगेंच्या जीवाला धोका, बिश्नोई गँगकडून धमकी?.
यशोमती ठाकूर यांची बाईक रॅली, अर्ज दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन
यशोमती ठाकूर यांची बाईक रॅली, अर्ज दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन.