VIDEO: सर्व महिला आमदार नेत्या एका फ्रेममध्ये; वाचा, प्रत्येकीची खास कहाणी!
जागतिक महिला दिनानिमित्ताने आज अधिवेशनाच्या प्रवेशद्वारावर महिला आमदार एकवटल्या. (maharashtra women mla in one frame, read about her success story)
मुंबई: जागतिक महिला दिनानिमित्ताने आज अधिवेशनाच्या प्रवेशद्वारावर महिला आमदार एकवटल्या. हास्यविनोद करत या महिला आमदारांनी एकत्रित सेल्फीही घेतला. सर्वपक्षीय महिला आमदारांनी एकत्र येऊन एकमेकांना महिला दिनानिमित्ताने शुभेच्छा देण्याचा हा प्रसंग सुखद असाच होता. (maharashtra women mla in one frame, read about her success story)
जागतिक महिला दिन असल्याने आज सर्व पक्षीय महिला आमदारांनी एकत्रित येऊन विधानभवनाच्या गेटवर सेल्फी घेतला. रायगडच्या पालकमंत्री, आमदार विद्या ठाकूर, श्वेता महाले, मनिषा चौधरी, माधुरी मिसाळ, भारती लव्हेकर, मुक्ता टिळक, देवयांनी फरांदे, सीमा हिरे, नमिता मुदंडा आणि मोनिका राजळे आदी महिला आमदारांनी एकत्रित येऊन सेल्फी घेत आजचा दिवस संस्मरणीय केला. एरव्ही विधानसभेत विविध मुद्दयांवर अभ्यासू आणि आक्रमकपणे भाषण करणाऱ्या या महिला आमदार आज हास्यविनोदात रमताना दिसल्या.
जाणून घ्या या महिला आमदारांविषयी
आदिती तटकरे या राष्ट्रवादीच्या आमदार आहेत. त्या कोकणातील श्रीवर्धन मतदारसंघातून निवडून आलेल्या आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे यांच्या त्या कन्या आहेत. आदिती यांच्याकडे राज्याच्या उद्योग, खनिकर्म, क्रीडा व युवक, कल्याण, पर्यटन, फलोत्पादन, माहिती व जनसंपर्क आणि राजशिष्टाचार खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे. शिवाय त्यांच्याकडे विधी व न्याय खात्याची जबाबदारीही असून त्या रायगडच्या पालकमंत्री आहेत.
मनिषा चौधरी या भाजपच्या आमदार आहेत. त्या दहिसर विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. त्या मुंबई महापालिकेच्या नगरसेविकाही होत्या. तसेच त्या नगराध्यक्षाही होत्या.
विद्या ठाकूर या भाजपच्या आमदार आहेत. त्या गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. मागच्या वेळी त्यांनी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांचा पराभव केला होता. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये विद्या ठाकूर या महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री होत्या. त्याशिवाय त्यांनी मुंबई महापालिकेचे उपमहापौरपदही भूषविले आहे.
भारती लव्हेकर या भाजपच्या आमदार असून वर्सोवा येथून त्या दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. डॉ. भारती लव्हेकर या भारतातील महिलांसाठी सॅनिटरी पॅडची बँक सुरू करणाऱ्या महिला व आमदार आहेत. त्यांना भारताच्या फर्स्ट लेडी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
माधुरी मिसाळ या सुद्धा भाजपच्या आमदार आहे. 2009पासून सलग तीन वेळा त्या पुण्याच्या पर्वती मतदारसंघातून भाजपचे प्रतिनिधीत्व करत आहेत. विधानसभेत त्या भाजपच्या प्रतोद आहेत.
मुक्ता टिळक या पुण्यातील कसबापेठ येथील आमदार आहेत. भाजपच्या तिकिटावर त्या निवडून आल्या आहेत. पुण्याच्या माजी महापौर म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
देवयानी फरांदे या विधानपरिषदेचे माजी सभापती प्रा. ना. स. फरांदे यांच्या सून आहेत. देवयानी फरांदे गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ भाजपमधून कार्यरत आहेत. तीन वेळा नगरसेविका, उपमहापौरपद भूषविलेल्या फरांदे या दोनदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्या नाशिकमध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत.
श्वेता महाले या बुलडाण्यातील चिखली विधानसभेच्या आमदार आहेत. भाजपच्या तिकीटावर त्या निवडून आल्या आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या राहुल बोंद्रे यांचा पराभव केला होता. 2004 नंतर चिखली मतदारसंघात पहिल्यांदाच भाजप उमेदवाराचा इथे विजय झाला होता. श्वेता महाले या जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण सभापती होत्या. त्यांना भाजपने 2019 मध्ये विधानसभेचं तिकीट दिलं आणि मिळालेल्या संधीचं सोने करुन त्या विधानसभेत पोहोचल्या.
नमिता मुंदडा या दिवंगत नेत्या विमल मुंदडा यांच्या सूनबाई आहेत. शरद पवारांनी बीडमध्ये जाहीर केलेल्या राष्ट्रवादीच्या विधानसभा उमेदवारांमध्ये मुंदडा यांचा समावेश होता. परंतु ऐनवेळी नमिता मुंदडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जाहीर केलेला उमेदवार बदलण्याची नामुष्की पवारांवर आली होती. नमिता मुंदडा या बीडमधील केज मतदारसंघातून भाजप आमदार आहेत.
मोनिका राजळे या भाजपच्या आमदार आहेत. त्या पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेवरही बिनविरोध निवडून आल्या आहेत. (maharashtra women mla in one frame, read about her success story)
संबंधित बातम्या:
कोकणासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करा, भाजप नेत्याची मागणी
वरळीच्या NSCI क्लबच्या उपकंत्राटदाराचा बेसमेंटमध्ये गळफास, सुसाईड नोट सापडली
पाचवेळा आमदार, तरीही पक्षातच ‘उपरे’ ठरविले गेले; वाचा, प्रकाश भारसाकळेंचा संघर्ष
(maharashtra women mla in one frame, read about her success story)