सत्यजित तांबेंनी महाराष्ट्र पिंजून काढला, ‘चलो पंचायत’चे 3 हजार कार्यक्रम पूर्ण

मुंबई : तरुणवर्गाला काँग्रेसशी जोडून घेण्यासाठी महाराष्ट्र युवक काँग्रेसने महाराष्ट्र पालथा घातला आहे. सत्यजित तांबे यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र युवक काँग्रेसने ‘चलो पंचायत अभियाना’अंतर्गत तब्बल तीन हजार कार्यक्रमांचा टप्पा पार केला आहे. अजूनही राज्याच्या विविध भागात कार्यक्रम सुरु असून, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होईपर्यंत हे कार्यक्रम सुरु राहणार आहेत. तसेच, राहुल गांधींची विचारधारा महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे […]

सत्यजित तांबेंनी महाराष्ट्र पिंजून काढला, 'चलो पंचायत'चे 3 हजार कार्यक्रम पूर्ण
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

मुंबई : तरुणवर्गाला काँग्रेसशी जोडून घेण्यासाठी महाराष्ट्र युवक काँग्रेसने महाराष्ट्र पालथा घातला आहे. सत्यजित तांबे यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र युवक काँग्रेसने ‘चलो पंचायत अभियाना’अंतर्गत तब्बल तीन हजार कार्यक्रमांचा टप्पा पार केला आहे. अजूनही राज्याच्या विविध भागात कार्यक्रम सुरु असून, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होईपर्यंत हे कार्यक्रम सुरु राहणार आहेत. तसेच, राहुल गांधींची विचारधारा महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे ध्येय आहे, असे युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सांगितले.

चलो पंचायत अभियानाअंतर्गत पाच मुद्द्यांवर विशेष भर देऊन अभियान राबवत आहे. बेरोजगारीचा प्रश्न, शेतीविषय मुद्दे, राफेल घोटाळ्याबाबत जागृती, भाजपच्या आश्वासनांची पोलखोल आणि युवक काँग्रेसशी तळागाळातील तरुणांना जोडून घेण्यासाठी शाखा सुरु करणे, अशा महत्त्वाच्या गोष्टी घेऊन सत्यजित तांबे यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र युवक काँग्रेसची यंग-ब्रिगेड गेले काही महिने महाराष्ट्र पालथा घालत आहेत. विशेष म्हणजे, ठिकठिकाणी स्वत: युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे सहभागी होऊन तरुण कार्यकर्त्यांचा मनोबल वाढवत आहेत.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने या ‘चलो पंचायत अभियाना’अंतर्गत दोन महत्त्वाचे कार्ड लोकांना दिले जात आहे. ‘किसान शक्ती कार्ड’ आणि ‘युवा शक्ती कार्ड’ असे दोन कार्डची नावं आहेत. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर कोणत्या गोष्टी प्राधान्याने केल्या जातील, यांचे वचन या कार्डवरुन देण्यात येत असून, लोकांना ते पटल्यास त्यांना हे कार्ड देण्यात येत आहे.

“तरुण वर्ग राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून युवक काँग्रेसशी जोडला जातच आहे. मात्र, युवक काँग्रेसच्या या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांनीही काँग्रेसवर विश्वास दाखवून किसान शक्ती कार्डच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या अभियानामुळे युवक काँग्रेसमध्ये सकारात्मक वातावरण आहेच. मात्र, जबाबदारीही मोठी आहे.” असे महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या चिटणीस कल्याणी माणगावे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या डिजीटल टीमशी बोलताना सांगितले.

युवा शक्ती कार्डमधून युवक काँग्रेसकडून काय आश्वासनं?

– गरजू बेरोजगार युवकांना मासिक बेरोजगार भत्ता

– जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रांचे सक्षमीकरण करुन खासगी व सरकारी क्षेत्रात रोजगार संधी निर्माण करणार

– मुली आणि नोकरी करणाऱ्या महिला यांच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अदिकाधिक वसतिगृहांची निर्मिती करणार

– कमी व्याज दराने सुलभ प्रक्रियेद्वारे शैक्षणिक कर्जाची व्यवस्था करणार

– नवीन व्यवसाय उभारणीसाठी 10 लाख रुपयांचे विनातारण व बिनव्याजी कर्ज उपलब्ध करणार

किसान शक्ती कार्डमधून युवक काँग्रेसकडून काय आश्वासनं?

– मध्यम किंवा अल्प भूधारक आणि कोरडवाहू शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी

– शेतमालाला खरा आणि वास्तविक हमीभाव देणार

– शेतीसाठी आवश्यक खते, बी-बियाणे आणि शेती अवजारे यांच्या किंमतीवर नियंत्रण

– हवामानाच्या अचूक अंदाजासाठी वेधशाळेचे आधुनिकीकरण

– खाद्य प्रक्रिया उद्योग आणि शितगृहांचे जाळे, कृषी पुरक उद्योगांना चालना

दरम्यान, एकीकडे देशपातळीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी संयमी भाषेत सत्ताधाऱ्यांचा एक-एका मुद्द्याचा फोलपणा समोर मांडत असताना, दुसरीकडे राहुल गांधींचे मुद्दे खेडोपाडी पोहोचवण्याचे काम त्यांची यंग-ब्रिगेड अर्थात युवक काँग्रेसची टीम धडाडीने काम करताना दिसत आहे. त्यात सत्यजित तांबे यांच्या नेतृत्त्वात या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने तर ‘चलो पंचायत अभियाना’अंतर्गत राज्याच्या कानाकोपऱ्यातील तरुणांशी संवाद साधला आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात युवक काँग्रेसच्या या अभियानाचा किती प्रभाव दिसतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.