महाविकासआघाडीचा फॉर्म्युला फायनल, वंचितला सोबत घेणार का?
लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. एकीकडे भाजप अनेक मित्रपक्षांना एनडीएमध्ये सहभागी करुन घेत असताना महाविकासआघाडीचे देखील जागा वाटप फायनल झाल्याचे सांगितले जात आहे. पण यात वंचितला सहभागी करुन घेतील का.
Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप शेवटच्या टप्प्यात आहे. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला फायनल झाला असून आता घोषणा बाकी आहे. वंचित आघाडीची आणखी 2 दिवस महाविकास आघाडी वाट पाहणार असल्याचं कळतंय. तर ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांनी आपले उमेदवार निश्चित केलेत. महाविकास आघाडीत शनिवारीच जागा वाटपाबाबत अंतिम बैठक झाली. आणि याच बैठकीत फॉर्म्युला आणि 1-2 जागांचा वाद सोडला तर जागा वाटपही झालंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार. ठाकरे गट 22 जागांवर लढणार आहे. काँग्रेस 16 जागांवर उमेदवार देणार तर शरद पवार गटाला 10 जागा मिळणार असल्याची माहिती आहे.
ठाकरे गटाकडून सुरुवातीपासूनच 22 जागांचा दावा होता. त्यानुसार ठाकरे गटाला 22 जागा मिळेल असं दाट शक्यता आहे. आणि ठाकरेंनी उमेदवारांची निश्चिती केली असून फक्त घोषणाच बाकी आहे.
TV9ला मिळालेल्या माहितीनुसार,
1. मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दिना पाटील यांचं नाव निश्चित झालंय 2. मुंबई दक्षिण – अरविंद सावंत 3. मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाईंना संधी देण्याचा विचार करण्यात आलाय 4. मुंबई उत्तर पश्चिम – अमोल कीर्तिकर…शिंदे गटाचे विद्यमान खासदार गजानन किर्तीकरांचे पुत्र आहेत 5. उत्तर मुंबईतून विनोद घोसाळकर हे संभाव्य आहेत 6. रत्नागिरी सिंधुदुर्गमधून – विनायक राऊतांचं नाव निश्चित आहे 7. रायगडमधून – अनंत गितेंना उमेदवारी आहे 8. छत्रपती संभाजीनगरमधून – चंद्रकांत खैरेंना तिकीट देण्याचं निश्चित झालंय..इथं अंबादास दानवेही इच्छुक होते…मात्र खैरेंवर ठाकरेंनी विश्वास व्यक्त केलाय 9. यवतमाळ वाशिममधून – संजय देशमुख यांचं नाव निश्चित आहे 10. जळगावमधून ललीता पाटील संभाव्य उमेदवार आहेत 11. बुलडाणा – नरेंद्र खेडेकर 12. हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर 13. परभणीतून संजय जाधव 14. धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर 15. शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरेंना तिकीट देण्याचं निश्चित झालंय. 16. नाशिक – विजय करंजकर 17. ठाण्यातून राजन विचारेंना तिकीट पक्क झालंय 18. कल्याण मध्ये अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाही19. पालघरमध्येही अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाही 20. सांगलीतून – चंद्रहार पाटील 21. हातकणंगलेची जागा स्वाभिमानीच्या राजू शेट्टींना ठाकरे सोडणार आहेत 22. तर मावळमधून – संजोग वाघेरेंना तिकीट मिळेल
ठाकरेंनी निश्चित केलेल्या यादीत सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांना उमेदवारी देण्यात आली आहे. नुकतंच मातोश्रीवर चंद्रहार पाटलांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश केला. मात्र ही जागा काँग्रेस अजूनही सोडण्यास तयार नाही. विश्वजित कदमांनी सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहणार असल्याचं म्हटलंय.
महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा मिळणार असल्याचं कळंतय. आणि या 10 जागांवर उमेदवारही निश्चित झाल्याची माहिती आहे.
- बारामतीतून-सुप्रिया सुळेंना स्वाभाविकपणे उमेदवारी याआधीच घोषित झालीये.
- शिरूर – अमोल कोल्हेंचं तिकीट निश्चितच आहे
- साताऱ्यातून श्रीनिवास पाटील यांचंही तिकीट निश्चित आहे
- माढ्यातून – धैर्यशील मोहिते-पाटील
- अहमदनगर दक्षिण – निलेश लंकेंना तिकीट मिळणार आहे
- दिंडोरींतून – भास्कर भगरे
- वर्ध्यातून- विदर्भातले प्रसिद्ध मास्तर नितेश कराळे संभाव्य उमेदवार असू शकतात
- भिवंडी – बाळ्या मामांचं तिकीट निश्चित आहे
- बीडमधून – ज्योती मेटे आणि बजरंग बाप्पा सोनवणेंपैकी एक उमेदवार असेल
- रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसेंच्या विरोधात संतोष चौधरी संभाव्य उमेदवार असू शकतात.
ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षानं अंतर्गत जागा वाटप केलंय..पण त्याचवेळी प्रकाश आंबेडकरांच्या वंचितसाठी मविआचे दरवाजे उघडे ठेवलेत. प्रकाश आंबेडकर शिवाजी पार्कच्या सभेत आले ही सकारात्मक बाब आहे असं संजय राऊत म्हणालेत. वंचित सोबत आल्यास 4 जागांची तयारी आजही महाविकास आघाडीची आहे.
प्रकाश आंबेडकरांनी मविआला 16 जागांचा प्रस्ताव दिलाय. पण हा प्रस्ताव महाविकास आघाडीला मान्य नाही. त्यामुळं आणखी 1-2दिवस वाट पाहण्याच्या मूडमध्ये महाविकस आघाडी आहे.