Ajit Pawar : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या वादावर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

Ajit Pawar : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेवरुन वाद झाल्यानंतर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीमध्ये या योजनेवरुन श्रेयवादाची लढाई सुरु आहे. मागच्या आठवड्यात महायुतीमधील विसंवाद समोर आला होता.

Ajit Pawar : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या वादावर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Sep 10, 2024 | 12:41 PM

मागच्या आठवड्यात लाडकी बहिण योजनेवरुन मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाद झाल्याची बातमी होती. शिंदे गटाचे मंत्री श्रेयवादावरुन चांगलेच आक्रमक झाले होते. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ ही महायुती सरकारची योजना आहे. पण अजित पवार यांचा पक्ष सर्वश्रेय आपल्याकडे घेतोय, असा शिंदेंच्या शिवसेनेचा आक्षेप होता. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ नाव असताना फक्त ‘माझी लाडकी बहिण योजना’ असं नाव दिलं जातय, यावर आक्षेप घेण्यात आला. आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात भाजपकडून ठाण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच फोटो आहे. मात्र या बॅनर वर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो लावण्यात आलेला नाही.

मंत्रिमंडळात झालेल्या या वादावादीवर नंतर TV9 मराठीच्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. “ही श्रेयवादाची लढाई नाही. लाडकी बहीण योजना तिन्ही पक्षाच्या सरकारने आणली. कुठल्याही सरकारने कुठलीही योजना आणली, तरी मुख्यमंत्र्यांच श्रेय असतं. तिन्ही पक्ष आपपाल्या पद्धतीने प्रचार करत आहेत. खरं श्रेय बहिणींच आहे. ही श्रेयवादाची लढाई नाही. या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार व्हावा, या दृष्टीने तिन्ही पक्ष प्रचार करतायत” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

अजित पवार काय बोलले?

सध्या भाजपा आणि शिवसेनेच्या बॅनरवर अजित पवार यांचा फोटो दिसत नाहीय यावर अजित पवार आज बोलले. भाजपाने तुमचा फोटो गायब केला? या प्रश्नवार अजित पवार म्हणाले की, “मीच त्यांना सांगितलय की, माझा फोटो लावू नका. माझे फारच फोटो सगळीकडे सुरु झालेत. मी म्हटलं जरा कमी करा. लाडकी बहिण योजना महायुती सरकारने आणली आहे. महायुतीमधील घटक पक्ष या योजना आपल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत आहेत”

बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.
लालबागचा राजा मंडपातून मार्गस्थ, शेवटच्या निरोपासाठी भक्तांची गर्दी
लालबागचा राजा मंडपातून मार्गस्थ, शेवटच्या निरोपासाठी भक्तांची गर्दी.
लालबागच्या राजाची निरोपापूर्वीची आरती, खास tv9 च्या प्रेक्षकांसाठी
लालबागच्या राजाची निरोपापूर्वीची आरती, खास tv9 च्या प्रेक्षकांसाठी.
वडील दादांसोबत सत्तेत अन् मुलं वेगळ्या दिशेनं? बापांचा प्लॅन बी तयार?
वडील दादांसोबत सत्तेत अन् मुलं वेगळ्या दिशेनं? बापांचा प्लॅन बी तयार?.
जरांगेंचं निवडणुकीच्या तोंडावर आमरण उपोषण, आरक्षण नाही तर पाडापाडी
जरांगेंचं निवडणुकीच्या तोंडावर आमरण उपोषण, आरक्षण नाही तर पाडापाडी.
जीभ छाटण्यापासून ते विष्ठेपर्यंत... टीका करताना नेत्यांचा तोल सुटला
जीभ छाटण्यापासून ते विष्ठेपर्यंत... टीका करताना नेत्यांचा तोल सुटला.
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.