Mahayuti | मोठी बातमी, ताज लॅन्डस हॉटेलममध्ये महत्त्वाच्या घडामोडी, राज ठाकरे पोहोचले, कोणासोबत बैठक?
Mahayuti | मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात पुढच्या काही तासात घडामोडी घडणार आहेत. राज ठाकरे यांची अमित शहासोबत बैठक झाल्यावर आजची बैठक महत्वाची आहे. राज ठाकरे यांची आज शिवतीर्थ या निवासस्थानी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत महत्त्वाची बैठक होणार आहे.
मुंबई (दिनेश दुखंडे) : महाराष्ट्राच्या राजकारणात आज महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीला गेले होते. तिथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह यांची भेट घेतली होती. मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्याविषयी दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे संकेत मिळाले होते. काल रात्री सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये एक गुप्त बैठक झाली. राज ठाकरे यांच्या भाजपा नेत्यांसोबत या ज्या भेटीगाठी सुरु आहेत, त्याचा अद्याप नेमका तपशील समोर आलेला नाही. राज ठाकरे यांची आज शिवतीर्थ या निवासस्थानी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत महत्त्वाची बैठक होणार आहे. त्याआधी वांद्रे येथील ताज लॅन्डस एंड हॉटेलमध्ये एक बैठक होत आहे. महायुतीची ही महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित आहेत.
मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात पुढच्या काही तासात महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती दोघांचा अजून जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीय. मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा असल्याने कदाचित अजून जागा वाटपा जाहीर झालेलं नाही. आता ताज लॅन्डस एंडमध्ये जी बैठक होत आहे, त्यात मनसेच्या वाट्याला किती जागा येणार? या विषयी चर्चा होऊ शकते. राज ठाकरे यांची अमित शहासोबत बैठक झाल्यावर आजची बैठक महत्वाची आहे. फडणवीस, मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यात बैठक सुरु. लोकसभेसाठी युतीच समीकरण कस जुळवायचं यावर चर्चा सुरु. मनसे सोबत आल्यावर महायुतीचा कार्यक्रम ठरवला जाईल. मनसेला लोकसभेची कोणती जागा द्यायची का यावर हि होणार चर्चा.
मनसेला काय मिळणार?
मनसेच्या वाट्याला लोकसभेच्या दोन जागा येणार अशी चर्चा आहे. त्यात दक्षिण मुंबईची जागा मनसेला मिळू शकते. दक्षिण मुंबई हा मराठीबहुल मतदारसंघ आहे. इथे मराठी मतदारांची संख्या जास्त आहे. ठाकरे गट आणि मविआकडून इथून अरविंद सावंत उमेदवार असतील. या भागातील मराठी मतांमध्ये मनसे खिंडार पाडू शकते. राज ठाकरे महायुतीमध्ये आल्यास त्यांना तीन पक्षाच बळ मिळेल, शिवाय मराठी मत सुद्धा मनसेकडून वळू शकतात. अशा स्थितीत मनसे आणि एनडीएची एक जागा वाढू शकते. शिवाय राज ठाकरे यांचा महायुतीला प्रचारासाठी फायदा होऊ शकतो.