अमोल मिटकरीच्या आरोपांना मी फार किंमत देत नाही, ते कुठल्या विचारांचे पाईक हे अवघा महाराष्ट्र जाणतो- महेश शिंदे
अमोल मिटकरीच्या आरोपांना मी फार किंमत देत नाही, ते कुठल्या विचारांचे पाईक हे अवघा महाराष्ट्र जाणतो, असं शिंदेगटाचे आमदार महेश शिंदे म्हणाले आहेत.
मुंबई : आज विधिमंडळ अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. विधिमंडळाचं कामकाज सुरु होण्याआधीच महाराष्ट्रानं अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. सत्ताधारी अन् विरोधक थेट एकमेकांना भिडले. शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यात जोरदार घमासान झालं. हे दोन सत्ताधारी आणि विरोधक पक्षातील आमदार हमरीतुमरीवर आले. यावेळी सत्ताधारी आणि विरोधीगटातील नेते तिथं होते. त्यावर महेश शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमोल मिटकरीच्या आरोपांना मी फार किंमत देत नाही, ते कुठल्या विचारांचे पाईक हे अवघा महाराष्ट्र जाणतो, असं महेश शिंदे (Mahesh Shinde) म्हणाले आहेत.
अमोल मिटकरीच्या आरोपांना मी फार किंमत देत नाही, ते कुठल्या विचारांचे पाईक हे अवघा महाराष्ट्र जाणतो. त्यांचे विचार किती चुकीचे आहेत हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. त्यामुळे त्यांना मी उत्तर देणार नाही, असं महेश शिंदे म्हणाले आहेत. आम्हाला गद्दार म्हणण्याआधी दोनदा विचार करा. कारण आम्ही गद्दारी केलेली नाही. जनतेचे पैसे तुम्ही खाल्लेत. जनतेशी गद्दारी तुम्ही केलीत. त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही,असंही शिंदे म्हणालेत.
अधिवेशन सुरु व्हायला अवघा काही वेळ राहिला होता. सगळे आमदार विधिमंडळाच्या दिशेने येत होते. मागचे काही दिवस पाहता त्याचप्रमाणे विरोधक आक्रमक होत सरकार विरोधात आंदोलन करणार आणि घोषणबाजी करणार हे जवळपास निश्चित होतं. पण आज सत्ताधारी पक्षही तयारीत होता. त्यांनीही विरोधकांना कडाडून विरोध करायचं ठरवलं होतं. त्यानुसार सत्ताधाऱ्यांनीही घोषणाबाजी केली. अधिवेशनाला सुरूवात झाल्यापासून 50 खोके एकदम ओके! अश्या घोषणा देण्यात येत आहेत. पण या घोषणांवर सत्ताधाऱ्यांचा आवडलेला नाही. त्यामुळे आज विधिमंडळ परिसरात सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले.यावेळी प्रचंड गोधळाचं वातावरण निर्माण झालं. यावेळी सत्ताधारी पक्षानेदेखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. लवासातील खोके एकदम ओके! अश्या घोषणा सत्ताधाऱ्यांनीही दिल्या. त्यावेळी विरोधकही तिथे होते. त्यांनीहीही पुन्हा एकदा 50 खोके एकदम ओके! अश्या घोषणा दिल्या. अन् तिथे अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. अमोल मिटकरी घोषणा देत होते. शिंदे गटाचे आमदार महेश शिंदेही तिथे होते. अन् पाहता-पाहता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं. तो गोंधळ इतका वाढला की पुढे धक्काबुक्की झाली.