सदा सरवणकर, अमित ठाकरे या तगड्या उमेदवारांना भिडणारे महेश सावंत सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर म्हणाले…

माहीममध्ये यंदा तिरंगी लढत होत आहे. माहीम विधानसभा मतदारसंघाची संपूर्ण राज्यात चर्चा आहे. कारण माहीम विधानसभा क्षेत्रातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि उद्धव ठाकरे गटाच्या महेश सावंत यांचं आवाहन आहे.

सदा सरवणकर, अमित ठाकरे या तगड्या उमेदवारांना भिडणारे महेश सावंत सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर म्हणाले...
Mahesh Sawant
Follow us
| Updated on: Nov 20, 2024 | 12:24 PM

महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. यंदाच्या निवडणुकीत माहीम विधानसभा मतदारसंघ विशेष चर्चेत आहे. कारण माहिममधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे रिंगणात आहे. माहीममध्ये यंदा तिरंगी लढत होत आहे. शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर, मनसेकडून अमित ठाकरे आणि उद्धव ठाकरे गटाकडून महेश सावंत निवडणूक रिंगणात आहेत. तिन्ही उमेदवारांनी आज प्रभादेवीच्या सिद्धी विनायक मंदिरात येऊन दर्शन घेतलं. प्रचारकाळात मनसे आणि सदा सरवणकर यांच्यामध्ये मोठी कटुता आली होती. पण आज दोन्ही उमेदवारांनी सिद्धीविनायकाच दर्शन घेतल्यानंतर परस्परांशी हस्तांदोलन केलं.

उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत हे सुद्धा सिद्धीविनायकाच दर्शन घेतल्यानंतर TV9 मराठीशी बोलले. “मतदार सूज्ञ आहेत. दादरचे मतदार हे विचारपूर्वक मतदान करतात. इथे कोणाच्या ओघात, प्रेमाखातर जात नाही. जो खरोखर काम करतो, जो उपलब्ध असतो, वेळ बघत नाही, लोकांची सेवा करतो, त्याला लोक निवडतात. लोकांची भावना एवढीच आहे की, घातलेल्या कपड्यानिशी उद्धव ठाकरे साहेबांना बेदखल केलं, या गद्दार आमदारामुळे त्यांच्या ह्दयाला ठेस पोहोचली आहे. उद्धव, बाळासाहेब यांच्या नावाने त्याची पोचपावती मतदार देतील” असं महेश सावंत म्हणाले.

महेश सावंत यांच्या पत्नी काय म्हणाल्या?

यावेळी महेश सावंत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि मुलगा सुद्धा होता. त्यांच्या पत्नी म्हणाल्या की, “महेश सावंत यांचा विजय निश्चित विजय आहे. आम्ही कुटुंब म्हणून सोबत आहोत. आम्ही चांगली तयारी केली आहे. सगळे शिवसैनिक, दादर-प्रभादेवीतील जनता आमच्यासोबत आहे. आम्हाला न्याय देतील, आम्हाला पाठिंबा मिळेल असा विश्वास व्यक्त केला”

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.